जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती!
आपल्या शेतात जाण्यासाठी एखादा नवा रस्ता काढायचा असेल किंवा आपल्या जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा (Land Map) असणे आवश्यक असतं. आता महाराष्ट्र सरकारने सातबारा आणि आठ-अ उताऱ्यासोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. आता आपण गावाचा किंव्हा शेतजमिनीचा नकाशा कसा काढायचा?, तो वाचायचा कसा आणि सरकारचा ई-नकाशा हा प्रकल्प काय आहे, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
जमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस – Land Map:
आपल्या जमिनीचा नकाशा (Land Map) ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला खालील महाभूनाकाशाची वेबसाईट ओपन करायची आहे.
http://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp
- त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला Location (स्थान) हा रकाना दिसेल. या रकान्यात तुम्हाला तुमचं राज्य, कॅटेगरी (Category) मध्ये Rural आणि Urban असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात असाल, तर Rural हा पर्याय निवडायचा आहे आणि शहरी भागात असाल, तर Urban हा पर्याय निवडायचा आहे.
- त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे आणि सगळ्यात शेवटी Village Map यावर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर आपली जमीन ज्या गावात येते, त्या गावाचा नकाशा ओपन होतो.
- होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीनमध्ये पाहू शकता.
- त्यानंतर डावीकडील + किंवा – या बटणावर क्लिक करून हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारातही पाहता येतो म्हणजेच झूम इन किंवा झूम आऊट करता येतो.
- पुढे डावीकडे ज्या तीन एका खाली एक आडव्या रेषा दिसत आहेत, त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पहिल्या पेजवर वापस जायचं आहे.

आता जमिनीचा नकाशा कशा काढायचा ते पाहूया?
त्याच वेबसाईटवर Search By Plot Number या नावानं एक रकाना दिलेला आहे.
इथं तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर मग तुमच्या जमिनीचा गट नकाशा (Land Map) ओपन होतो.
आता डावीकडे Plot Info या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.
एका गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याची सविस्तर माहिती इथं दिलेली असते.
ही माहिती पाहून झाली की डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी Map Report नावाचा पर्याय असतो.
यावर क्लिक केलं की, तुमच्या जमिनीचा Plot Report तुमच्यासमोर ओपन होतो. त्यावरच्या उजवीकडील खाली दिशा असलेल्या (downward arrow) बाणावर क्लिक केलं तो तुम्ही डाऊनलोड करू शकता.
त्याखाली तुमच्या गटाला लागून असलेल्या शेतजमिनीचे गट क्रमांक दिलेले असतात. जसं की इथं 481 या गटाशेजारी 480, 482, 483, 484, 487, 479 हे गट क्रमांक नमूद केलेले दिसतात.
आणि मग खालच्या भागात या गट नकाशात कोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.

ई-नकाशा प्रकल्प काय?
महाराष्ट्र भूमि अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे साठवून ठेवलेले असतात. याच नकाशांच्या आधारे जमिनीच्या हददी कायम करण्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे हे नकाशे महत्त्वाचे असतात.
पण, हे नकाशे फार वर्षांपूर्वी म्हणजेच 1880 पासून तयार केलेले असल्यामुळे ते नाजूक स्थितीत आहेत. त्यामुळे त्यांना डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देण्यासाठी ई-नकाशा (Land Map) हा प्रकल्प हाती महाराष्ट्र सरकारनं हाती घेतला आहे.
या अंतर्गत तालुका स्तरावरील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील फाळणी नकाशे, भूसंपादन नकाशे, बिनशेती नकाशे इ. नकाशांचं डिजिटायजेशन करण्यात येत आहे.
त्यामुळे डिजिटल सातबारा, डिजिटल आठ-अ यासोबतच जनतेला आता डिजिटल (Land Map) नकाशाही ऑनलाईन पद्धतीनं पाहता येणार आहे.
पुढील लेख देखील वाचा!
- डिजिटल जमिनीचा नकाशा 2026 : महाराष्ट्रात सर्व्हे-गट नंबर, गावठाण-भूमापन नकाशे आता API द्वारे उपलब्ध!
- महाराष्ट्र सीलिंग जमीन हस्तांतरण नियम 2026 : सीलिंग जमिनीच्या हस्तांतरण, शर्तभंग नियमितीकरण, दंड आणि नवीन प्रक्रियेची संपूर्ण माहिती!
- महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 138: सीमारेषा निश्चितीनंतर अतिक्रमण हटविण्याची नवीन कार्यपद्धती!
- कुळवहिवाट व शेतजमीन कायदे 2026: नवीन नियम व मोठे बदल!
- वनहक्क GR 2026: 7/12 वर 7-E आणि 12-E नोंदणीचे नवे नियम!
- जमीन मोजणी फी 2026 : नवीन शुल्क, पोटहिस्सा फी व संपूर्ण GR माहिती!
- जमीन मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस !
- जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? जमीन मोजणीसाठी किती शुल्क आकारले जाते? जाणून घ्या सविस्तर माहिती
- गाव नमुना सातबारा (७/१२) उतारा म्हणजे काय? सातबारा उताऱ्या विषयीची संपूर्ण माहिती !
- 1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर!
- सातबारा (7/12) वरील चुकांची दुरुस्ती कशी करावी? जाणून घ्या सविस्तर
- सातबारा (7/12) उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
- सर्व्हे नंबर, भूमापन क्रमांक आणि गट नंबर याबाबत सविस्तर माहिती !
- जमिनीची सरकारी किंमत ऑनलाईन कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर
- जमीन किंवा बिगर शेती जमीन (NA Plot) खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी ? जाणून घ्या सविस्तर
- जमिनीचे वारस नोंद करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती
- तलाठी कार्यालयातील गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती
- डिजिटल स्वाक्षरीचा ८अ खाते उतारा ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा? जाणून घ्या सविस्तर
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

