15 मार्च रोजी, जागतिक ग्राहक हक्क दिन !
ग्राहक व्यवहार विभाग बुधवार, 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन, (World Consumer Rights Day) साजरा करणार आहे. यासंदर्भात, ग्राहक व्यवहार विभागाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी आज नवी दिल्ली इथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला आणि सांगितले की, “स्वच्छ ऊर्जा संक्रमणाद्वारे ग्राहकांचे सक्षमीकरण”, ही जागतिक ग्राहक हक्क दिन, ची संकल्पना आहे.
15 मार्च रोजी, जागतिक ग्राहक हक्क दिन ! – World Consumer Rights Day:
जीवाश्म इंधनासारख्या पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, आणि शाश्वतता, सुरक्षितता, किफायतशीरपणा, आणि ग्राहकांसाठी दीर्घ काळ उपलब्धतेला प्रोत्साहन देणाऱ्या स्वच्छ ऊर्जा उपायांकडे जलद संक्रमण करता यावे, यासाठीच्या संकल्पनेला अनुसरून, तंत्रज्ञानाच्या वापरावर प्राथमिक भर दिला जाणार आहे.
ई-कॉमर्स हे ग्राहकांसाठी खरेदीचे सर्वाधिक पसंतीचे माध्यम म्हणून उदयाला आले आहे. त्याच वेळी, राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांकावर (एनसीएच) वर ग्राहकांनी नोंदवलेल्या ई-कॉमर्स बाबत तक्रारींच्या संख्येतही वाढ झाली आहे. यासाठी, राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांकावर तक्रारींच्या नोंदीबरोबरच परतावा, बदली आणि सेवेतील कमतरता यासारख्या ग्राहकांच्या सामान्य तक्रारींचे जलद निराकरणही होते, याची खात्री करण्यासाठी, राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांकाला तांत्रिकदृष्ट्या मजबूत केले जात आहे.
राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांक, खटला दाखल करण्या पूर्वीच्या स्तरावर पर्यायी विवाद निवारण यंत्रणा म्हणून काम करते, ज्यामध्ये ग्राहक ‘1915’ वर कॉल करून किंवा मोबाइल अॅपद्वारे सहजपणे त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात. राष्ट्रीय ग्राहक मदत क्रमांक, याच्याशी अलीकडेच जोडण्यात आलेल्या मैथिली, काश्मिरी आणि संथाली या भाषांसह देशातील एकूण 17 भाषांमध्ये सेवा देतो.
ग्राहकांना ऑनलाइन माध्यमातून तक्रार दाखल करण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी, ई-दाखिल पोर्टलची स्थापना करण्यात आली आहे. हे पोर्टल, संबंधित ग्राहक मंचाबरोबर सोयीस्करपणे संपर्क साधण्यासाठी त्रास-मुक्त, जलद आणि स्वस्त सुविधा प्रदान करते, तसेच तक्रारी दाखल करण्यासाठी प्रवास करण्याची अथवा प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज रहात नाही. डिजिटायझेशन आणि ग्राहकांसाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने न्याय प्राप्ती सुलभ करणे, हे याचे उद्दिष्ट आहे.
माननीय पंतप्रधानांनी सुरू केलेल्या LIFE (पर्यावरणाला अनुकूल जीवनशैली) चळवळीच्या अनुषंगाने, विभागाने “दुरुस्तीचा अधिकार पोर्टल” सुरू केले आहे. ई कचऱ्याच्या समस्येत वाढ करणाऱ्या, मर्यादित आयुष्य असलेल्या उत्पादनापासून ग्राहकाला यामुळे संरक्षण मिळेल. या पोर्टलमुळे सुट्या भागांची किंमत, अस्सलपणा आणि वॉरंटी यासंबंधीच्या समस्यांचे निराकरण होईल. घटकांचा अस्सलपणा आणि मूळ देशाची माहिती तपासण्याचे मार्ग निर्दिष्ट करून ते ग्राहकांना उत्पादनाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे माहिती देण्यास सक्षम करेल. पोर्टलची लिंक https://righttorepairindia.gov.in/ आहे.
हे पोर्टल ग्राहकांना स्वतः दुरुस्ती करण्यास सक्षम करण्यासाठी, अधिकृत दुरुस्ती करणार्यांचा शोध घेण्यासाठी आणि इतर दुरुस्ती करणार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी माहिती प्रदान करेल. या पोर्टलचा अंतिम उद्देश निर्मात्याने वचन दिलेल्या वॉरंटी कालावधीसाठी अस्सल सुट्या भागांच्या उपलब्धतेसाठी एक इकोसिस्टम तयार करण्याचा प्रयत्न आहे.
हेही वाचा – ग्राहक संरक्षण अधिनियमान्वये तक्रार दाखल करण्याची पद्धत
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!