वन्यप्राणी हल्ल्यात मृत, जखमी झाल्यास देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ; नुकसान भरपाईसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
वाघ, बिबटया, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे ( ढोल ) यांच्या हल्ल्यात मनुष्य हानी झाल्यास दिनांक ०२/०७/२०१०, दिनांक ३०/०३/२०१३ दिनांक २९/०५/२०१३, दिनांक १६/०१/२०१५ , दिनांक ११.११.२०१६ व दिनांक २८.११.२०१८ च्या शासन निर्णयामधील तरतुदींनुसार अर्थसहाय्याची रक्कम संबंधितांना अदा करण्यात येते. तसेच उक्त वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे गाय, बैल, म्हैस, मेंढी, बकरी किंवा इतर पशुधनाचा मृत/अपंग/जखमी झाल्यास दिनांक ११/११/२०१६ च्या शासन निर्णयामधील तरतुदींनुसार अर्थसहाय्याची रक्कम संबंधितास अदा करण्यात येत आहे. वन्यप्राणी हल्यामध्ये मनुष्य हानी तसेच पशुधन मृत/अपंग/जखमी झाल्यास देण्यात येणा-या अर्थसहाय्याची रक्कम कमी असल्यामुळे त्यामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती . तसेच मा. मंत्री ( वने ), महाराष्ट्र राज्य यांनी दिलेले निर्देश, जनप्रतिनिधींकडून अर्थसहाय्यामध्ये वाढ करण्याबाबत होणारी मागणीस अनुसार वन्यप्राण्याकडुन होणा-या मनुष्यहानी व पशुधन हानी प्रकरणी देण्यात येणा-या अर्थसहाय्याचे रक्कमेत वाढ करण्याबाबत शासन पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे.
वन्यप्राण्यांचे हल्ल्यामुळे मनुष्यहानी व पशुधन मृत/अपंग/जखमी झाल्यास सुधारित अर्थसहाय्य – wild animal attacks financial assistance:
वाघ, बिबटया, अस्वल, गवा ( बायसन ), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे ( ढोल ) यांच्या हल्ल्यामुळे मनुष्य हानी तसेच पशुधनाचा मृत्यू झाल्यास खालीलप्रमाणे अर्थ सहाय्य देण्यात येणार.
व्यक्ती मृत झाल्यास कायम अपंग झाल्यास किंवा जखमी झाल्यास खालील प्रमाणे अर्थसहाय्याची रक्कम देण्यात येणार:
अ. क्र. | तपशिल | देय असलेल्या अर्थसहाय्याची रक्कम |
1 | व्यक्ती मृत झाल्यास | रुपये २०,००,०००/- पैकी रु.१०,००,०००/- ( रु. दहा लक्ष फक्त ) देय असलेल्या व्यक्तीला तात्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम रु. १०,००,०००/- ( रु. दहा लक्ष फक्त ) त्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यामध्ये ठेव रक्कम ( फिक्स डिपॉझीट) जमा करण्यात यावी. |
2 | व्यक्ती कायम अपंग झाल्यास | रुपये ५,००,०००/ |
3 | व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास | रुपये १,२५,०००/ |
4 | व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास | औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात यावा. मात्र खाजगी रुग्णालयात औषधोपचार करणे अगत्याचे असल्यास त्याची मर्यादा रुपये २०,०००/- ( रु. वीस हजार फक्त ) प्रती व्यक्ती अशी राहील. शक्यतो औषधोपचार शासकीय / जिल्हा परिषद रुग्णालयात करावा. |
पशुधन मृत्यू / अपंग / जखमी प्रकरणी द्यावयाची नुकसान भरपाई:
अ. क्र. | पशुधनाचे ( पाळीव प्राण्याचे ) नाव | देय असलेल्या नुकसान भरपाईची रक्कम |
1 | गाय, म्हैस व बैल यांचा मृत्यु झाल्यास | बाजार भाव किंमतीच्या ७५ % किंवा रु.७०,०००/ (रु. सत्तर हजार फक्त ) या पैकी कमी असणारी रक्कम. |
2 | मेंढी , बकरी व इतर पशुधन झाल्यास { वन्यजीव अधिनियम, १९७२ मधील कलम २ ( १८ – अ ) प्रमाणे } | बाजार भाव किंमतीच्या ७५ % किंवा रु. १५,००० /( संरक्षण ) ( रु. पंधरा हजार फक्त ) या पैकी कमी असणारी रक्कम. |
3 | गाय, म्हैस, बैल, या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास | बाजार भाव किंमतीच्या ५०% किंवा रु. १५,०००/- ( रु. पंधरा हजार फक्त ) या पैकी कमी असणारी रक्कम. |
4 | गाय, म्हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास | औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात यावा. औषधोपचार शासकीय / / जिल्हा परिषद पशुचिकित्सालयात करणेत यावा. देय रक्कम मर्यादा बाजार भावाचे २५% किंवा रु.५०००/- ( रु. पाच हजार फक्त ) प्रति जनावर यापैकी कमी असणारी रक्कम, उक्त नुकसान भरपाई पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या प्रमाणपत्राचे आधारे देण्यात यावी. |
वन्यप्राणी हल्ल्यामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना देय अर्थसहाय्याच्या रक्कमेपैकी रु. १०,००,०००/- ( रु. दहा लक्ष फक्त ) देय असलेल्या व्यक्तीला तात्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम रु.१०,००,०००/- ( रु. दहा लक्ष फक्त ) रु. ५.०० लक्ष ५ वर्षाकरिता फिक्स डिपॉझीटमध्ये ठेवावे आणि उर्वरित ५.०० लक्ष १० वर्षाकरीता फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवावे. दहा वर्षांनंतर वारसांना पूर्ण रक्कम मिळेल.
वन्यप्राणी हल्ल्यामुळे व्यक्ती मृत/अपंग/जखमी झाल्यास मृत व्यक्तीच्या वारसांना अर्थसहाय्य देण्यासाठी असलेल्या इतर अटी व शर्ती शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. डब्ल्यूएलपी १०.०८/प्रक्र.२७०/फ -१, दिनांक ०२/०७/२०१०, शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र.डब्ल्यूएलपी -२०१२/प्रक्र .३३७/फ -१, दिनांक ३०/०३/२०१३ , शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र.डब्ल्यूएलपी- २०१२/प्रक्र .३३७/फ -१, दिनांक २९/०५/२०१३, व शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. डब्ल्यूएलपी- ०७१८/प्रक्र.२६७/फ -१, दिनांक २६/०८/२०१९ प्रमाणे कायम राहिल.
वन्यप्राणी हल्ल्यामुळे पशुधनाचा मृत/अपंग/जखमी झाल्यास अर्थसहाय्य देण्यासाठी असलेल्या अटी व शर्ती शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. डब्ल्यूएलपी -०९१५/प्रक्र .३०५/फ -१, दिनांक ११/११/२०१६ प्रमाणे कायम राहिल. सदर बाबींचा खर्च वन्यप्राण्यांमुळे झालेल्या हानीसाठी नुकसान भरपाई (अनिवार्य), २४०६ २३६६ या लेखाशिर्षांतर्गत करण्यात येईल.
वन्यप्राण्यांचे हल्ल्यामुळे मनुष्यहानी व पशुधन मृत/अपंग/जखमी झाल्यास अर्थसहाय्य/नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस :
वन्यप्राण्यांचे हल्ल्यामुळे मनुष्यहानी व पशुधन मृत/अपंग/जखमी झाल्यास अर्थसहाय्य/नुकसान भरपाईसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास प्रथम तुम्हाला खालील वनविभागाच्या महाराष्ट्र फॉरेस्ट पोर्टलवर जायचे आहे.
https://intranet.mahaforest.gov.in/forestportal
महाराष्ट्र फॉरेस्ट पोर्टल मध्ये विविध RTS अर्ज फॉर्म आणि सेवा दिसतील त्यामधून तुम्हाला “वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या पशु नुकसानीची नुकसान भरपाई मंजुर करणे” किंवा “वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती जखमी किंवा मृत झाल्यास आर्थिक सहाय्य मंजुर करणे” या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
वरील RTS अर्जामध्ये अर्जदार आणि नुकसान भरपाईची माहिती, तसेच आवश्यक तपशील/कागदपत्रे जोडून अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काडून ठेवा. अर्ज भरल्यानंतर मोबाईल वर मेसेज येईल व वनविभागाचे अधिकारी नुकसान पहाणी दौरा करतील. त्यानंतर तुमच्या अर्जाला मंजुरी मिळून नुकसान भरपाई मिळेल.
अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील उपवनसंरक्षक/उप विभागीय अधिकारी/वन क्षेत्रपाल यांचे कार्यालय या ठिकाणी संपर्क साधावा.
हेही वाचा – महाराष्ट्र “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” योजना – CM Relief Fund Scheme
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!