पॅनकार्ड हरवल्यास काय करावे? तुमचा पॅन कार्ड नंबर आठवत नसेल तर कसा शोधावा ?
पॅन कार्ड एक सर्वात महत्त्वाचं ओळखपत्र असून ते अनेक ठिकाणी याची आवश्यकता भासते. विशेषकरून आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत तर पॅन कार्ड खूपच महत्वाचं असतं. जर पॅन कार्ड हरवलं, तर हे व्यवहार करताना अडथळे येतात. जाणून घ्या, पॅन कार्ड हरवलं तर ऑनलाइन अर्ज करून ड्युप्लिकेट (Reprint PAN Card) कसं मिळवाल. जसे कि आपल्याला माहिती असेल आपल्याला कडे – दोन पॅनकार्ड असणे हा गुन्हा आहे, आयकर कायद्यातील कलम 272 बी (1) अंतर्गत यासाठी 10,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो, त्यामुळे आपले पॅनकार्ड हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास ते पुन्हा नवीन मिळवण्यासाठी नवीन पॅन कार्ड नोंदणी करू नका, ऑनलाइन अर्ज करून रिप्रिंट (Reprint) म्हणजेच ड्युप्लिकेटसाठी नोंदणी करा. चला तर मग या लेखात त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
पॅनकार्ड हरवल्यास काय करावे? तुमचा पॅन कार्ड नंबर आठवत नसेल तर कसा शोधावा ? Reprint PAN Card:
पॅनकार्ड NSDL किंवा UTI च्या पोर्टलवरून ऑनलाईन रिप्रिंट (Reprint PAN Card) करून घरबसल्या मिळवा.
1) NSDL पोर्टल वरून पॅनकार्ड रिप्रिंट (Reprint) करण्याची प्रक्रिया – NSDL Reprint PAN Card:
पॅनकार्ड रिप्रिंट (Reprint PAN Card) म्हणजेच ड्युप्लिकेट नोंदणीसाठी खालील NSDL ची वेबसाईट ओपन करा.
https://www.onlineservices.nsdl.com/paam/ReprintEPan.html
- तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर एक वेबपेज उघडेल. येथे तुम्ही तुमचा पॅन, आधार क्रमांक, जन्मतारीख ही माहिती भरा. आता पॅन कार्ड रिप्रिंट (Reprint PAN Card) करण्यासाठी आधार डेटाचा वापर करण्याची परवानगी देण्यासाठी खालील बॉक्समध्ये सिलेक्ट करा.
- कॅप्चा कोड एन्टर करून सबमिट करा.
- तुमची पर्सनल माहिती कॉम्प्युटर स्क्रीनवर दिसेल.
- ओटीपी येण्यासाठी तुमचा ईमेल, मोबाईल क्रमांक दोन्ही पर्याय निवडा. टिक बॉक्सवर सिलेक्ट करा, जेणेकरून तुमचं पॅन कार्ड आयकर विभागाकडे असलेल्या डिटेल्सच्या आधारेच प्रिंट होईल.
- आता ‘Generate OTP‘वर क्लिक करा. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक किंवा इमेल आयडी किंवा दोन्ही सिलेक्ट केले असतील तर दोन्हीवर ओटीपी येईल.
- बॉक्समध्ये ओटीपी एन्टर करून सबमिट करा.
- ओटीपी व्हॅलिडेट झाल्यावर तुम्हाला पेमेंट करण्यास सांगितले जाईल. पेमेंटसाठी ‘Pay Confirm‘ वर क्लिक करा. तुम्हाला पेमेंट गेटवे वर रिडायरेक्ट केले जाईल.
- आता पेमेंट करा. तुम्हाला ५० रुपये (करासहित) भरावे लागतील.
- पेमेंट प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर ट्रान्झॅक्शन डिटेल्स कॉम्प्युटर स्क्रीनवर दिसतील. आता पेमेंट रिसीट जनरेट किंवा प्रिंट करण्यासाठी ‘Continue‘ वर क्लिक करा.
- पेमेंट केल्याचा मेसेज तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर येईल. यात Acknowledgment क्रमांकदेखील असेल. यातच ई-पॅन डाउनलोड करण्याची लिंकही असेल.
2) UTI पोर्टल वरून पॅनकार्ड रिप्रिंट (Reprint) करण्याची प्रक्रिया:
पॅनकार्ड रिप्रिंट (Reprint PAN Card) म्हणजेच ड्युप्लिकेट नोंदणीसाठी खालील UTI ची वेबसाईट ओपन करा.
https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/homereprint
- तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर एक वेबपेज उघडेल. येथे तुम्ही तुमचा पॅन, आधार क्रमांक, जन्मतारीख ही माहिती भरा आणि Captcha कोड एंटर करून सबमिट करा.
- आता पेमेंट करा. तुम्हाला ५० रुपये (करासहित) भरावे लागतील.
- पेमेंट प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर ट्रान्झॅक्शन डिटेल्स कॉम्प्युटर स्क्रीनवर दिसतील. आता पेमेंट रिसीट जनरेट किंवा प्रिंट करण्यासाठी ‘Continue‘ वर क्लिक करा.
- पेमेंट केल्याचा मेसेज तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर येईल. यात Acknowledgment क्रमांकदेखील असेल. यातच ई-पॅन डाउनलोड करण्याची लिंकही असेल.
सूचना:
- ही सुविधा ज्या पॅन धारकांकडून एनएसडीएलच्या ई-गव्हर्नमेंटद्वारे नवीनतम पॅन अर्जावर प्रक्रिया केली गेली असेल किंवा आयटीडीच्या ई-फिलिंग पोर्टलवर ‘इन्स्टंट ई-पॅन’ सुविधा वापरुन पॅन मिळविला असेल त्यांच्याकडून ही सुविधा मिळू शकेल.
- पॅन कार्डच्या पुनर्मुद्रणासाठी शुल्कः भारतात पॅन कार्ड पाठविण्याकरिता (कर समाविष्ट करून) 50.00 रु, भारताबाहेर पॅन कार्ड पाठविण्याकरिता (कर समाविष्ट करून) 959.00 रु.
- आयकर विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार पॅनकार्ड संप्रेषण पत्त्यावर पाठवले जातील.
तुमचा पॅन कार्ड नंबर आठवत नसेल तर कसा शोधावा ?
पॅनकार्ड हरवल्यास वरील प्रमाणे तुम्ही पॅन कार्ड नंबर ने पॅनकार्ड रिप्रिंट (Reprint PAN Card) करून पुन्हा काढू शकता, पण अनेक जणांना पॅन कार्ड नंबर आठवत नसेल किंवा पण कार्ड ची झेरॉक्स प्रिंट नसेल तर पॅन कार्ड नंबर असा शोधा.
- सर्वप्रथम तुम्हाला पॅन कार्ड हरवल्याची तक्रार तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनला द्या आणि पॅन कार्ड हरवलेल्या अहवालाची प्रत मिळवा.
- जर तुम्ही ऑनलाइन अर्ज केला असेल, तर कृपया ऑनलाइन जारी केल्यास तुमच्या मेलवर ePAN तपासा.
- तुम्ही नोकरी करत असल्यास, तुम्ही पॅन कार्ड नंबर तुमच्या सॅलरी स्लिप किंवा फॉर्म 16 वर शोधू शकता.
- तुम्ही व्यवसाय करत असल्यास, तुम्ही ते तुमच्या GSTIN तपशीलांवर शोधू शकता.
- तुमच्या बँकेकडे विनंती करून तुम्ही ते तुमच्या बँक तपशीलांमध्ये पॅन कार्ड नंबर शोधू शकता.
- तुम्ही तुमच्या जवळपासच्या आयकर कार्यालयाला भेट देऊन अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकता.
वरील सर्व काही करून शोधून जर तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक सापडत नसेल, तर कृपया +91-20-27218080 डायल करून कर माहिती नेटवर्क – NSDL शी संपर्क साधा, कृपया कॉल करण्यापूर्वी सर्व तपशील हाताशी ठेवा उदा. आधार क्रमांक आणि इतर वैयक्तिक तपशील, ते पडताळणीसाठी विचारू शकतात.
एकदा तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक मिळाला की, वरील प्रमाणे पॅन कार्ड पुन्हा रिप्रिंट (Reprint PAN Card) करू शकता.
हेही वाचा – 5 मिनिटात मोफत पॅन कार्ड काढा – इन्स्टंट पॅन वाटपाची सर्वसाधारण योजना !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
पॅन कार्ड हरवले आहे आणि पॅन नंबर ही नाही तर पॅनकार्ड नंबर कसा मिळवावा?
+91-20-27218080 शी संपर्क साधा
Maza पण pan card no. Harvala ahe kasa kadhaycha