डेबिट / क्रेडिट कार्ड हरवलं,चोरले किंवा हॅक झालं तर काय करायचे? What to do if debit / credit card is lost, stolen or hacked?
आज काल प्रत्येकजण क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करताना दिसतो. क्रेडिट आणि डेबिट कार्ड सोबत असेल तर वेळेची देखील बचत होते व रोख रक्कम जवळ बाळगण्याची देखील गरज राहत नाही, मात्र आपण त्याचा योग्य वापर केला नाही तर फसवणूकीला देखील सामोरे जावे लागत असते. अनेकदा बँक खात्याची माहिती लीक होते व खाते रिकामे होते.
डेबिट / क्रेडिट कार्ड हरवलं,चोरले किंवा हॅक झालं तर काय करायचे? What to do if debit / credit card is lost, stolen or hacked?:
हँकर्स अनेकदा तुमचे कार्ड सायबर गुन्हेगार हँक करतात तर अनेकदा कार्ड हरवते व चोरीला देखील जात असते, त्यामुळे जर कार्ड हरवले, चोरीला गेले अथवा हॅक झाले तर काय करायचे याविषयी आपण या लेखामध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत.
१. कार्ड ब्लॉक करा:
आपले डेबिट/क्रेडिट कार्ड हरवलं,चोरले किंवा हॅक झाले तर प्रथम मोबाईल मध्ये इंटरनेट बँकिंग अँप द्वारे कार्ड होस्टिंग मध्ये पर्यायामध्ये जाऊन जुने कार्ड ब्लॉक करा आणि नवीन कार्ड बँकेकडून मागवा.
२. बँकेला त्वरित माहिती द्या आणि तक्रार करा:
ऑनलाईन नेटबँकिंग बऱ्याच जणांना जमत नाही त्यांनी काही गैरव्यवहार दिसला तर तातडीने बँकेकडे, कार्ड प्रोव्हाइडरकडे तक्रार करा. आपलं डेबिट / क्रेडिट कार्ड हरवलं, गहाळ झालं तर ते तातडीने ब्लॉक करणे गरजेचे आहे. पीन बदला. बँकेकडे कार्ड बदलून मागा. टोल फ्री नंबरवर तातडीने तक्रार करा. त्यासाठी तुमच्या कार्डाचा नंबर तुमच्याकडे अन्यत्र लिहून ठेवलेला असेल, तर त्याचाउपयोग होतो. आपल्या बँकेचा कस्टमर केअर नंबरही आपल्याकडे असलाच पाहिजे.
३. बँक खाते स्टेटमेंट तपासा:
हल्ली आपण कार्डवरून करत असलेल्या सर्व व्यवहारांचे मोबाइलवर मेसेज येतात. मात्र अनेकदा ते आपण उघडूनही पाहत नाही. त्यामुळे किती पैसे खात्यातून गेले हे कळत नाही. तसं न करता कायम आपलं अकाउंट स्टेटमेंट तातडीने तपासा. तुम्हाला पन्नास – शंभर रुपयांच्या व्यवहारांविषयीही तक्रार असेल तर त्याविषयी बँकेला विचारा, पैसे कुठं खर्च झाले, हे शोधा. आपलं कार्ड हॅक झालं, हे तसे मेसेजेस आल्यावर किंवा शंभर – दोनशे रुपये चोरीला गेल्यावर कळणं चांगलं. उगीच मोठा खड्डा पडायची वाट पाहू नका.
४. तक्रार लेखीच हवी:
डेबिट / क्रेडिट कार्ड हॅक झालं तर कार्डावर झालेल्या गैरव्यवहाराबाबत बँकेकडे जी तक्रार कराल ती लिखितच करा. सगळ्याचे पुरावे जोडा. फोन केले तर तारखा , वेळा लिहून ठेवा. कॉल रेकॉर्डिंगही जपून ठेवा. जास्तीत जास्त १० कमीत कमी ३ दिवसात बँकेनं तुमचा प्रश्न सोडवला पाहिजे. आमचा संबंध नाही असं बँक म्हणू शकत नाही.
५. पोलिसांत तक्रार:
डेबिट / क्रेडिट कार्ड हॅक झालं तर पोलिसातही तक्रार करा. त्याचे पुरावे तुमच्याकडे ठेवा. सायबर पोलिसांना सहकार्य करा आणि तपासून पाहा की आपण चुकून कधी फोन, ई – मेलवर आपला कार्ड नंबर, ओटीपी, आधार कार्ड देत नाही ना ! ते देणं टाळा.
डेबिट / क्रेडिट कार्ड फसवणूक होण्यापासून रोखण्याचा कोणताही मार्ग नसला तरी, सक्रिय असणे आणि संभाव्य फसवणुकीविरूद्ध जलद कृती करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला फसवणूक लवकर आढळली आणि त्वरीत तक्रार केली तर तुम्ही थोडा वेळ आणि तणाव वाचवू शकता. आपण वर सूचीबद्ध केलेल्या क्रियांचे देखील पालन केले पाहिजे जेणेकरून आपण आपली कार्ड माहिती चोरीला जाण्याची शक्यता मर्यादित करू शकता.
हेही वाचा – आपल्या बंद झालेल्या बँक खात्यातूनही पैसे काढू शकता; पाहा त्यासाठीचे नियम आणि प्रक्रिया
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!