महामार्गावर WC आणि URINAL च्या सुधारीत सुविधा होणार उपलब्ध !
पेट्रोल पंपाच्या आराखड्यास व पेट्रोलपंपासह सर्व्हीस स्टेशन/रिसॉर्ट/हॉटेल/ढाबे यांना राज्यमार्ग/प्रमुख जिल्हामार्ग इत्यादी मार्गावरून पोचमार्ग बांधण्यास परवानगी देण्याच्या अनुषंगाने दिनांक १३ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र शासनाची (WC URINAL facilities) नवीन सुधारीत नियमावली तयार करण्यात आली.
महामार्गावर WC आणि URINAL च्या सुधारीत सुविधा होणार उपलब्ध ! WC URINAL facilities:
पेट्रोलियम कंपन्या किंवा पेट्रोल पंपाचे मालक हे deceleration / acceleration lane, service roads, channelizers, drainage arrangements, drinking water आणि Toilet सुविधा पुरविण्याकरिता (WC URINAL facilities) जबाबदार राहतील तसेच आराखड्यामध्ये नमूद केल्यानुसार त्यांचे बांधकाम करणे आणि त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी सुध्दा त्यांच्यावरच राहील असे नमूद करण्यात आलेले आहे.
तसेच सदर शासन निर्णयातील Figure-६ मध्ये पुरुष आणि स्त्रीयांकरिता WC आणि URINAL ची व्यवस्था (WC URINAL facilities) कशी असावी याबाबतचा ढोबळ नकाशाही देण्यात आलेला आहे. आता सदरच्या तरतूदीमध्ये बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
दिनांक १३ ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या एकुण सुविधांपैकी WC आणि Urinal सुविधेमध्ये (WC URINAL facilities) प्रवाशांची एकंदर वाढलेली संख्या विचारात घेऊन भविष्यात अधिक चांगल्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करुन देण्याची बाब केंद्र शासनाने नुकतीच जाहीर केलेली आहे.
त्यास अनुलक्षून शासन निर्णय, दि. १३-१०-२०२१ मध्ये नमूद केलेल्या WC आणि Urinal च्या ढोबळ आराखड्यात बदल करुन पेट्रोल पंपावर बांधकाम करण्यात येणा-या पुरुष आणि महिलांच्या WC आणि Urinal मध्ये १ WC ऐवजी २ WC आणि २ Urinal ऐवजी ४ Urrinal ची सुविधा भविष्यात नवीन पेट्रोलपंपाना मान्यता दिल्यानंतर प्रत्येक पेट्रोल पंपावर उपलब्ध करुन देणे बंधनकारक राहील.
तशी अट मुख्य अभियंता स्तरावरुन पेट्रोल पंपाना मंजूरी देण्यापुर्वीच संबंधित पेट्रोलपंप चालक तसेच पेट्रोलियम कंपन्यांना रस्त्याच्या कडेला पेट्रोल पंपाच्या आराखड्यास व पेट्रोलपंपासह सर्व्हस स्टेशन / रिसॉर्ट / हॉटेल / ढाबे यांना मुख्य रस्त्यावरुन पोचमार्ग बांधण्याकरीता मंजूरी देण्याच्या संदर्भातील प्रत्येक प्रस्तावांमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात येणार.
सार्वजनिक बांधकाम विभाग शासन परिपत्रक – WC URINAL facilities GR:
पेट्रोल पंपाच्या आराखड्यास व पेट्रोलपंपासह सर्व्हीस स्टेशन / रिसॉर्ट/ हॉटेल /ढाबे यांना राज्यमार्ग / प्रमुख जिल्हामार्ग इत्यादी मार्गावरून मंजूरी देतांना WC आणि URINAL च्या सुधारीत सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत शासन परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हेही वाचा – पेट्रोल पंपावर ग्राहकांना मिळणाऱ्या सुविधा आणि ग्राहकांचे अधिकार !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!