मतदारकार्ड आधारकार्डला लिंक करण्याची ऑनलाईन प्रोसेस !
भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांचेद्वारा निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम, 2021 नुसार मतदार याद्यातील तपशिलाशी जोडण्याकरिता आणि प्रमाणीकरणासाठी मतदारांकडून आधारची माहिती संग्रहीत करणे बाबतच्या अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत.
मतदार यादीत असलेल्या प्रत्येक मतदाराकडून आधार क्रमांक विहीत स्वरुपात व विहीत रितीने मिळविण्यासाठी वैधानिकरित्या मतदार नोंदणी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहेत. तसेच अधिसूचना 17 जून 2022 मध्ये निर्दिष्ट केल्यानुसार दि. 1 एप्रिल, 2023 पर्यंत किंवा तत्पूर्वी मतदार यादीत नाव असलेला प्रत्येक व्यक्ती त्याचा आधारक्रमांक अर्ज क्र. 6 ब मध्ये भरुन देऊ शकतो.
मतदारकार्ड आधारकार्डला लिंक करण्याची ऑनलाईन प्रोसेस – Voter Card Aadhaar Card Link:
राज्य निवडणूक आयोगाने मतदारकार्ड आधारकार्डशी ऑनलाईन लिंक करण्यासाठी nvsp.in या वेबसाइट वर जायचे आहे.
- Login and Register यावरती क्लिक करायचे आहे.
- नंतर तुमचा User Name and Password टाकायचा आहे. व Captcha Code भरायचा आहे. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केले नसेल तर Don’t have Account Register as a New User यावरती क्लिक करायचे आहे. व आपला मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करून घ्यायचे आहे.
- Login वरती क्लिक करायचे आहे.
NVSP पोर्टल लॉगिन केल्यावर “Information of Aadhaar Number by Existing Electors” या ऑप्शन वर क्लिक करा.
आता आपल्याला विविध ऑनलाईन फॉर्म दिसतील आपल्याला मतदारकार्ड आधारकार्डशी ऑनलाईन लिंक करण्यासाठी Form 6B वर क्लिक करा किंवा ऑफलाईन करण्यासाठी PDF फाईल आयकॉन वर क्लिक करा.
- Form 6: नवीन मतदारांसाठी अर्जाचा नमुना.
- Form 6A: परदेशातील मतदारांच्या नावांचा समावेश.
- Form 6B: मतदार यादी प्रमाणीकरणाच्या उद्देशाने आधार क्रमांकाच्या माहितीचे पत्र.
- Form 7: विद्यमान मतदार यादीतील नावाचा प्रस्तावित समावेश/वगळण्यासाठी आक्षेपासाठी मतदार अर्ज.
- Form 8: निवासस्थान स्थलांतरित करणे/विद्यमान मतदार यादीतील नोंदी दुरुस्त करणे/EPIC बदलणे/पीडब्ल्यूडीचे चिन्हांकन यासाठी मतदार अर्ज.
भारत निवडणूक आयोग नियम २६ अ नुसार फॉर्म 6B मतदार यादी प्रमाणीकरणाच्या उद्देशासाठी आधार क्रमांकाच्या माहितीचे पत्राचे तपशील येईल, पुढे राज्य आणि विधानसभा/संसदीय मतदारसंघ, वैयक्तिक माहिती दिसेल.
आता “I have Aadhaar Number” वर क्लिक करा आणि आधार क्रमांक, ठिकाण, आणि कॅप्चा टाकून Preview वर क्लिक करा.
Preview वर क्लिक केल्यानंतर फॉर्म मध्ये भरलेला सर्व तपशील दिसेल तो तपासून पहा आणि फॉर्म सबमिट करा.
NVSP वर फॉर्म सबमिट केल्या नंतर तुमचा फॉर्म संदर्भ आयडी मिळेल, त्या आयडीने तुम्ही फॉर्म अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकता.
मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधारक्रमांक भरण्यासाठी अर्ज क्रं. 6 ब ERO Net, GARUDA, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध करुन देण्यात येईल.
हेही वाचा – डिजिटल मतदान कार्ड ऑनलाईन डाउनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर – EPIC Digital Voting Card
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!