आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, ‘सीव्हिजिल ॲप’ वर तक्रार करा !
भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘सीव्हिजिल सिटीझन ॲप (cVIGIL App)’ विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.
आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काहीवेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल (cVIGIL App) ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सीव्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते.
आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, ‘सीव्हिजिल ॲप’ वर तक्रार करा ! cVIGIL App:
हे सीव्हिजिल ॲप (cVIGIL App) अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे.
cVIGIL App ची वैशिष्ट्य:
सीव्हिजिल (cVIGIL App) ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहिताच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो.
cVIGIL App चा वापर कसा करायचा?
एन्ड्रॅाईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील ॲप स्टोर या ॲपमध्ये जाऊन सीव्हिजिल (cVIGIL App) सर्च करा. त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओंसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा.
अचूक कृती व देखरेख:
सीव्हिजिल (cVIGIL App) ॲप्लिकेशनचा वापर करून, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सीव्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृती, देखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते.
लाईव्ह फोटो, व्हिडिओ:
सीव्हिजिल (cVIGIL App) ॲपच्या अचूकतेसाठी ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटो, व्हिडिओ घेतले जातात. जेणेकरुन भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण चमुंना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल.
तातडीने होते कारवाई:
सीव्हिजिल (cVIGIL App) ॲपवर तक्रार दाखल होताच भारत निवडणूक आयोग तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कार्रवाई करेल.
डाटा सुरक्षा:
सीव्हिजिल (cVIGIL App) ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.
सीव्हिजिल (cVIGIL App) : cVIGIL ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
खालील लेख वाचा !
- आचारसंहितेचे पालन करताना जाणून घ्या ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ !
- निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता…!
- निवडणूक आयोगामार्फत मतदारांसाठी विविध उपयोगी प्रणाली पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
- डिजिटल मतदान कार्ड ऑनलाईन डाउनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर !
- घरबसल्या मतदान कार्ड ऑनलाईन कसे काढायचे? सविस्तर प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
- अंतिम मतदार यादी वार्डनुसार PDF फाईल मध्ये ऑनलाईन कशी डाउनलोड करायची? सविस्तर प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
- मतदार यादीत नाव नसेल तर पात्र व्यक्तींनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन !
- मतदार यादीतील आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडून घेण्याचे आवाहन !
- दिव्यांग मतदारांना सक्षम ॲपच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध ! Saksham-ECI App
- निवडणूक उमेदवारांच्या गुन्हेगारी रेकॉर्ड पूर्ववृत्तांसाठी Know Your Candidate ॲप सुरू !
- मतदारकार्ड आधारकार्डला लिंक करण्याची ऑनलाईन प्रोसेस !
- जेष्ठ नागरिकांसाठी आता घरबसल्या मतदान करण्याची सुविधा !
- आता देशात कुठूनही करता येईल मतदान; स्थलांतरित मतदारांसाठी आरव्हीएम मतप्रणाली – RVM
- “एक देश, एक निवडणूक” च्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी !
- मतदार यादीतील आपल्या नावासोबत मोबाईल क्रमांक जोडून घेण्याचे आवाहन !
- मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी 17+ वयोगटातील तरुणांना आगाऊ नोंदणीची सुविधा!
- घरबसल्या घ्या विविध सरकारी सेवांचा ऑनलाईन लाभ – Government Services Online
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
नमस्कार
नौकरीची गरज आहे
शिक्षण. 10th 3 वर्षाचा एग्रीकल्चर डिप्लोमा जालेला आहे.