वृत्त विशेषसरकारी कामे

विजेचे युनिट रेट/आकार आणि वीज ग्राहकांचे अधिकार!

आपण या लेखात विजेचे युनिट रेट/आकार आणि वीज ग्राहकांचे (Vij Grahkache Adhikar) अधिकार सविस्तर पाहणार आहोत.

विजेचे युनिट रेट अथवा कोणताही आकार ठरविण्याचा अधिकार (Vij Grahkache Adhikar) महावितरणला नाही. त्यासाठी स्वतंत्र महाराष्ट्र वीज नियामक आयोग आहे. जर कोणताही पैसा बिलात वाढवायचा असेल तर आयोगापुढे याचिका दाखल करावी लागते. त्याच्या विरोधात वीज वापर करणारे सर्व प्रकारचे ग्राहक (Vij Grahkache Adhikar) आपली बाजू मांडतात, सुनावणी होते. त्यानंतर आयोग त्याला योग्य वाटेल ती वीज दर वाढ मंजूर करतो.

विजेचे युनिट रेट/आकार:

१. स्थिर आकार: ही रक्कम आस्थापना खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार, मेंटेनन्ससाठी लागणाचा साधन – सामग्रीचा खर्च भागविण्यासाठी आकारली जाते.

२. वीज आकार: महावितरण ग्राहकासाठी महानिर्मिती तसेच इतर खाजगी कंपनीने घेतलेल्या वीज बिलापोटी देते.

३. वीज शुल्क: राज्यात तयार झालेल्या व विकलेल्या विजेवर १६% वीज शुल्क हे सरकारी तिजोरीत जमा करावे लागते. ते महावितरणला मिळत नाही. तो एक प्रकारचा सरकारी टॅक्सच असतो.

४. व्याज: महावितरण ग्राहकांना वीज पुरविण्यासाठी जी वीज घेते त्याचे शुल्क जर वीज निर्मितीला वेळेत दिले नाही तर नियमानुसार थकीत रकमेवर २८% चक्रवाढ व्याज पद्धतीने व्याज आकारले जाते, ते थकबाकीदार ग्राहकांच्या बिलात टाकले जाते.

५. वहन आकार: महावितरण वीज निर्मिती कंपनी ते आपल्या घराजवळील छोटे छोटे सबस्टेशनपर्यंत टॉवर लाइनने वीज वहन करुन आणणाऱ्या महापारेषण, टाटा, पॉवर ग्रिड इत्यादी कंपन्यांना त्यांनी उभारलेल्या पायाभूत सुविधेच्या भाड्यापोटी अदा करते.

६. इंधन समायोजन अधिभार: बऱ्याचदा पावसामुळे कोळसा ओला होतो अथवा मागणी वाढल्याने कोळशाचा तुटवडा जाणवतो. त्या वेळी वीज निर्मिती कंपन्या बाहेरील देशांतून कोळसा आयात करतात. त्यासाठी लागणारा अतिरिक्त खर्च महावितरणला भरावा लागतो. तो अँडजेस्ट करण्यासाठी इंधन अधिभार लावला जातो.

७. इतर आकार: हे सर्वसामान्य घरगुती आकारले जात नाहीत.

८. समयोजित रक्कम: जर आपणास पूर्वीच्या बिलात वापरापेक्षा जास्त युनिटचे बिल दिले गेले असेल अथवा कमी युनिटचे बिल गेले असेल तर त्याची अँडजस्टमेंट म्हणून कम्प्युटेड रक्कम वजा अथवा प्लस केली जाते.

स्वतः मीटर रीडिंग महावितरणला कसे पाठवू शकतो?

आपण आपले मीटर रीडिंग महावितरण मोबाईल अॅप द्वारे किंवा पोर्टलद्वारे पाठवू शकता. महावितरणने प्रत्येक ग्राहकांच्या मीटर रीडिंगसाठी नियोजित तारीख निश्चित केली आहे. सेल्फ रीडिंग पाठविण्याची सुविधा मीटर रीडिंगच्या निर्धारित तारखेच्या 5 दिवस आधी सुरू होते. प्रत्येक ग्राहकांना विनंती एसएमएस पाठवला जातो की दिलेल्या तारखेपर्यंत स्वत: चे रीडिंग पाठवावे.

a) महावितरण ऍपद्वारे सेल्फ रीडिंग सबमिशन :

  1. आपण नोंदणीकृत वापरकर्ता असल्यास महावितरण ऍपवर (Mahavitaran App) लॉग इन करा.
  2. मुख्य मेनू वर सबमिट रीडिंग पर्याय निवडा.

सेल्फ रीडिंग सबमिशन हा पर्याय अतिथी वापरकर्त्यांसाठी देखील नोंदणीशिवाय उपलब्ध आहे. येथे आपल्याला आपला ग्राहक क्रमांक आणि मीटर क्रमांक नमूद करावा लागेल.

b) ग्राहक पोर्टलद्वारे स्वयं रीडिंग सबमिशन :

  1. महावितरण वेबसाइट वर जा.
    www.mahadiscom.in -> ग्राहक पोर्टल -> द्रुत एक्सेस -> ग्राहक वेब सेल्फ सर्व्हिस -> सेल्फ रीडिंग
  2. वेब सेल्फ सेवेवर लॉग इन करा.
    ग्राहक क्रमांक निवडा आणि ‘सबमिट रीडिंग’ दाबा

ग्राहक नोंदणी : ग्राहक नोंदणीसाठी कृपया येथे क्लिक करा.

ग्राहक सुविधा केंद्रांची यादी : ग्राहक सुविधा केंद्रांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ग्राहक सुविधा केंद्र सेवा : ग्राहक सुविधा केंद्रात प्रदान केल्या जाणाऱ्या सेवा पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

संपर्क :

ऑनलाईन अर्जांशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी कृपया आमच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा.

राष्ट्रीय टोल-फ्री : १९१२ / १९१२०
महावितरण टोल-फ्री : १८००-१०२-३४३५ / १८००-२३३-३४३५
ई-मेल:  customercare@mahadiscom.in

तुमच्या ऑनलाइन पेमेंट व्यवहारांशी संबंधित प्रश्नांसाठी, कृपया मेल करा – helpdesk_pg@mahadiscom.in

वीज ग्राहकांचे अधिकार – Vij Grahkache Adhikar:

विज कंपनीकडून कडून नेहमी तक्रार केली जाते की शेतकरी शेतात वापरलेल्या विजेचे बिल भरत नाही. परंतू, आपणाला हे माहित आहे का की, आपल्या ट्रान्सफॉर्मर डीपी शेतातून जे विजेचे तार जातात व त्याला आधार म्हणून जे पोल लावले जातात त्याचे भाडे वीज कंपनी शेतकऱ्यांना देत नाही. वीज कंपन्यांकडून डीपी लावले जातात त्याचे नियमानुसार भाडे हे शेतकऱ्यांना वीज कंपन्या कडुन भेटले पाहिजे.

कलम ५७ नुसार प्रत्येक शेतकऱ्याच्या ट्रान्सफॉर्मर डीपी शेतात जे विजेचे खांब लावले जातात व डीपी बसवले जातात त्याचे भाडे म्हणून वीज कंपनीने शेतकऱ्याला 2000 ते 5000 रुपये इतके भाडे देणे आवश्यक आहे. तसेच, शॉर्ट सर्किटमुळे होणारे नुकसान, जनावराचे ट्रान्सफॉर्मर डीपी होणारे मृत्यू अथवा करंट लागून होणारी मनुष्य हानी याची ही भरपाई देण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. पण याचा पाठपुरावा कोणी करत नाही त्यामुळे कोणत्याच शेतकऱ्याला याचा लाभ भेटत नाही.

वीज ग्राहकांचे (Vij Grahkache Adhikar) अधिकार खालील प्रमाणे आहेत.

1. नविन वीज कनेक्शन लेखी अर्ज केल्यापासून ३० दिवसात मिळते. – ३० दिवसात न दिल्यास प्रती आठवडा १०० रु. भरपाई ग्राहकास मिळते.

2. ट्रान्सफॉर्मर बिघडल्यास ४८ तासात विज कंपनिने स्वत: पुन्हा सुरु करणे. – तसे न केल्यास प्रती ग्राहकास प्रती तास रु. ५० भरपाई ग्राहकास मिळते.

3. ग्राहकास स्वत:चे मीटर लावण्याचा अधिकार (Vij Grahkache Adhikar) आहे. – विज कायदा ५५ सेक्शन व परि. क्र. १७३११ दि. ७/६/२००५.

4. सरासरी/अंदाजे किंवा मीटर चा फोटो न काढता (मोटर शेतात असली तरी फोटो काढणे आवश्यक) वीज बिल आकारणे बेकायदेशीर आहे. – ग्रा.सं. कायदा १९८३, परि.क्र.१३६८५ दि. ६/५/२००५ भरपाई= प्रती आठवडा रु. १००

5. थकबाकी, वादग्रस्त बिल या करीता वीज पुरवठा बंद करण्साठी स्वतंत्र लेखी नोटीस देणे अनिवार्य आहे. – विज कायदा २००३ सेक्शन ५६ वीज ग्राहक अटी व शर्ती क्र.१५.

6. वीज पोल ते मीटर पर्यंत केबल/पोल इ. खर्च असल्सास परत मिळतो. – खर्च वीज कंपनीने करावयाचा असतो. वीज ग्राहक अटी व शर्ती क्र. २१ (खर्च ग्राहकाने केल्यास पावतीच्या आधारे केलेला खर्च परत मिळतो).

7. नवीन वीज कनेक्शनला लागणारे पैसे – घरगुती रु. १५०० ते रु. २००० व क्रुषी पंप रु. ५०००. – पोल, वायर, केबल, इ. खर्च वीज कंपनीचाच असतो.

8. खेड्यात (शिवारात ) शेतात रात्री घरात वीज असणे अनिवार्य. – वीज वियमक आयोग आदेश त्यानुसार चौथा (४) योजना चालु.

9. शेतात पोल, डीपी असल्सास प्रतिमाह रु. २००० ते रु. ५००० भरपाई (भाड) मिळते. – विज कायदा २००३ व लायसेंस रुल २००५ (मा. जिल्हा न्यायदंडाधिकारी विहित भरपाई देण्यास सक्षम अधिकारी).

10. शाळा/ कॉलेज/ हॉस्पिटल इ. वीज दर कमर्शीअल जादा दर कमी करून मिळतो. – M.E.R.C.आदेश केस क्र. १९/२०१२
( माहे ऑगस्ट २०१२ पासून फरक परत मिळतो, कं.परि.क्र.१७५ दि. ५/९/२०१२ निर्णय दि. १६/८/२०१२).

11. बैल, मनुष्य, गाय इ. वीजेच्या शॉकने जखमी/मेल्यास त्याची संपुर्ण भरपाई वीज कंपनीने द्यावयाची (मनुष्यहानी रु. ५ लाख भरपाई). – मा. सर्वाेच्च न्यायालय केस क्र. १०८ ऑप २००२ निर्णय दि. ११/१/२००२ शकीलकुमारी विरुद्ध म.प्र.वि.मंडळ.

खालील लेख देखील वाचा!

  1. महावितरणच्या वीज बिलावरील पत्त्याची दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? – Online Address Correction Application MSEB
  2. थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना!
  3. रोहित्र दुरुस्तीसाठी आता महावितरण ॲपवर माहिती देण्याची सुविधा !
  4. महावितरणच्या ‘गो- ग्रीन’ योजनेंतर्गत नोंदणी करा आणि दरमहा वीजबीलामध्ये 10 रुपये वाचवा – MSEDCL Go Green Ebill Application
  5. महावितरणच्या वीज बिलावरील नावात बदल करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती – Online Name Change Application MSEB
  6. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना; आता शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज!
  7. वीज बिल जास्त आले असेल तर काय करायचे? खराब मीटर बदलून नवीन मीटर कसा घ्यायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती !
  8. शेतातून वीजेची लाईन गेल्यास किंवा टॉवर उभारल्यास आता इतका मोबदला मिळणार !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “विजेचे युनिट रेट/आकार आणि वीज ग्राहकांचे अधिकार!

  • Simran Mehaboob Shaikh

    Our meter is faulty. Bill is coming in increasing and now I want new meter.no one listens our complain. If I purchase new meter. Then is it refunded me extra paid amount,,?
    Please send me reply

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.