कुसुम सोलर पंपाचे दर, कंपनी संपर्क व लाभार्थी यादी पहा ऑनलाईन !
केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार महाकृषि ऊर्जा अभियान–प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर पंपांची योजना सुरु असून, यासाठी केंद्र शासनाकडून कुसुम सोलर (Kusum Solar Pump) पंपाचे दर, पुरवठादार कंपन्या व लाभार्थी यादी ऑनलाईन प्राप्त झालेली आहे.
कुसुम सोलर पंपाचे दर, कंपनी संपर्क व लाभार्थी यादी पहा ऑनलाईन ! Kusum Solar Pump:
कुसुम सोलर (Kusum Solar Pump) पंपाचे दर, कंपनी संपर्क व लाभार्थी यादी ऑनलाई पाहण्यासाठी खालील केंद्र सरकार सरकारच्या पीएम कुसुम नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय पोर्टलला भेट द्या.
https://pmkusum.mnre.gov.in/landing.html
पीएम कुसुम नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय पोर्टल ओपन केल्यानंतर मुख्य मेनू मध्ये “Public Information” टॅब वर क्लिक करून Scheme Beneficiary List मध्ये आपले राज्य, जिल्हा निवडून पंप क्षमता निवडा आणि GO वरती क्लिक करा. पुढे तुम्ही पीएम कुसुम योजनेच्या लाभार्थ्यांची यादी पाहू शकता.
यामध्ये आपण राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज केले होते त्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रकाशित केली आहे, शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 HP, 5 HP. 7.5 HP व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती (HP) DC सौर पंप उपलब्ध होणार व स्वखर्चाने इतर वीज उपकरणे लावता येण्याची सोय असेल.
पीएम कुसुम योजनेच्या लाभार्थ्यांची यादी ही शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदीनाले याच्या शेजारील, तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी, पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी, अटल सौर कृषी पंप योजना टप्पा- 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजुर न झालेले अर्जदार, तसेच 2.5 एकर शेतजमीन धारकास 3 HP DC, 5 एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 HP DC व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 7.5 HP DC वा अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप अनुज्ञेय निकषा प्रमाणे लाभार्थी शेतकरी निवड लाभार्थ्यांची यादी मध्ये नाव आले आहे.
तसेच, State Wise vendor list and Rate card मध्ये राज्य, पंप क्षमता, पंप प्रकार, पंप उप प्रकार, पंप श्रेणी, व कंट्रोलर प्रकार निवडून GO वरती क्लिक करा व पुढे आपण राज्यनिहाय कंपनी संपर्क (विक्रेता यादी) आणि कुसुम सोलर पंपाचे दर (दर कार्ड) पाहू शकता.
सविस्तर माहितीसाठी त्वरित संपर्क करा. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण ( महाऊर्जा ) अमरावती : 0721 2661610 मुंबई : 022 4968558 औरंगाबाद : 02402653595 नागपूर : 0712 256425 कोल्हापूर : 0231 2680009 नाशिक : 0253 2598685 लातूर : 02382 226680 पुणे : 020 35000454 मुख्यालय पत्ता : औंध रोड, पशुसंवर्धन आयुक्तालया शेजारी, स्पायसर कॉलेज समोर, औंध, पुणे – 411007. दूरध्वनी क्र. 020 35000450 | E-mail-re@mahaurja.com
हेही वाचा – कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी सुरु; असा करा ऑनलाईन अर्ज ! – Kusum Solar Pump Yojana Online Registration
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!