राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन !
राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात रहिवासी असलेल्या राजपूत समाजातील लोकांना आर्थिक पाठबळ मिळावे तसेच या समाजाची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी आहे.
राजपूत समाजातील घटक आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. या समाजातील युवकांना उद्योग व्यवसायासाठी अर्थपुरवठा होवून बेरोजगारी कमी होवून समाजाचा आर्थिक स्तर सुधारणे आवश्यक आहे. यासाठी राजपूत समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.
राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन !
राजपूत समाजामधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शेतीपूरक व्यवसाय, विपणन, प्रक्रिया, उद्योग, पुरवठा आणि साठवणूक याच बरोबरीने लघु उद्योग, वाहतूक, अन्य व्यावसायिक उद्योग उपलब्ध करुन देणे किंवा त्यास अर्थसहाय्य करुन स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन आर्थिक स्तर उंचावणे, यासाठी दिनांक २३ सप्टेंबर, २०२४ च्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ८ अंतर्गत शासकीय हमी असलेली व भाग भांडवल नसलेली कंपनी म्हणून वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येत आहे.
व्यवस्थापकीय संचालक हे किमान मंत्रालयीन सहसचिव दर्जाचे असतील. महामंडळाचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे राहील. महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल हे रु. ५० कोटी इतके राहील. दरवर्षी या महामंडळाच्या भागभांडवलासाठी निधीच्या उपलब्धतेनूसार तरतूद केली जाईल. तसेच सदर महामंडळाच्या कार्यालयासाठी जागा व आवश्यकतेनुसार असलेला कर्मचारीवृंद उपलब्ध करून देण्यात येईल.
नियोजन विभाग शासन निर्णय :
राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
पुढील लेख देखील वाचा!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!