वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या (वैयक्तिक व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा) योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, मर्यादित मुंबई या महामंडळाची दिनांक 8 फेब्रुवारी, 1984 रोजी कंपनी कायदा, 1956 नुसार महामंडळाची स्थापना करण्यात आली असून सदर महामंडळ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्त कार्यरत होते. शासन अधिसूचना दिनांक 10 मार्च, 2019 अन्वये सामाजिक न्याय विभागातून इतर मागासवर्ग सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग या स्वतंत्र विभागची स्थापना करण्यात आली असून शासन निर्णय क्रमांक इमाव 2016/प्र.क्र.95/आस्थापना, दि.24 जुलै, 2019 नुसार इतर मागास बहुजन कल्याण विभाग असे नामकरण करण्यात आले आहे. सदर विभागाच्या अधिनस्त वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ कार्यरत आहे.
महामंडळ स्थापनेची उद्दिष्टे:
सदर महामंडळामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीकरिता विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते.
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजना:
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील गरजू लोकांकरिता वैयक्तिक व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना सुरू झाल्या असून, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील उपरोक्त समाजातील सुशिक्षित बेरोजगार व गरजू व्यक्तींनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे.
महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील तसेच मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील रहिवासी असावा. 18 ते 50 वर्ष वयोगटातील गरजूंना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
गरजू व्यक्तींनी महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. अधिक माहितीकरिता गृहनिर्माण भवन, खो.क्र.३३, कलानगर, बांद्रा (पू), मुंबई. दूरध्वनी क्रमांक ०२२- २५४२८९०७ येथे संपर्क साधावा, असे आवाहन अरुण माने जिल्हा व्यवस्थापक, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मुंबई शहर व उपनगर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
मुख्यालय: जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड क्र. 09, विलेपार्ले ( पश्चिम ), मुंबई 400 049. दूरध्वनी. 2620 2588 | 2620 2588.
हेही वाचा – महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना व लाभार्थीची अर्हता
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!