आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी कामे

Update Aadhaar Online : आधार कार्ड (नाव, पत्ता, जन्म तारीख व लिंग) मध्ये बदल करून ऑनलाईन अपडेट करा !

आपण या लेखामध्ये आपल्या आधार कार्ड ची दुरुस्ती नवीन मायआधार पोर्टल वरून कशी करायची याची सविस्तर माहिती घेणार आहोत. आताच्या काळामध्ये आधार कार्ड आपल्याकडे असणे खूप गरजेचे आहे, कारण कोणतेही शासकीय किंवा सरकारी योजना असेल त्यामध्ये आपल्याला आधार कार्ड असणे गरजेचे आहे. पण कधीकधी आपल्या आधार कार्ड मध्ये काही बदल करायचे असल्यास आपल्याला आधार सेंटर ला जावे लागते यामध्ये आपला वेळ आणि पैसे दोन्हीही वाया जातो, पण आता आपल्या आधार कार्ड मध्ये काही बदल करायचे असल्यास उदारणार्थ नाव, पत्ता, लिंग, जन्म तारीख इत्यादी मध्ये काही बदल करायचे असल्यास तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने त्यामध्ये बदल करू शकता. यासाठी तुम्हाला ५० रुपये चार्जेस आकारले जातील. पण हे बदल करण्यासाठी आपल्या आधार कार्ड ला आपला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.

आधार कार्ड मध्ये बदल करण्यासाठी ऑनलाईन प्रोसेस: (Update Aadhaar Online)

आपल्या आधार कार्ड मध्ये काही बदल करायचे असल्यास खालील लिंक वर क्लिक करून UIDAI ची myaadhaar वेबसाईट ओपन करा.

https://myaadhaar.uidai.gov.in

वरील UIDAI च्या MyAadhaar पोर्टल वरती गेल्यावर त्यामध्ये तुम्हाला Login या ऑप्शन वर क्लिक करा.

Login
Login

Login वर क्लिक केल्यानंतर तुमचा १२ अंकी आधार नंबर, कॅप्चा कोड टाका व Send OTP या ऑप्शन वर क्लिक करा नंतर रजिस्टर मोबाइल नंबर वर जो OTP नंबर येईल तो टाकून Login ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Login with Aadhaar and OTP
Login with Aadhaar and OTP

लॉगिन केल्यानंतर Update Aadhaar Online या वरती क्लिक करायचे आहे.

Update Aadhaar Online
Update Aadhaar Online

लॉगिन केल्यानंतर “Proceed to Update Aadhaar” पर्यायावर क्लिक करा.

Proceed to Update Aadhaar
Proceed to Update Aadhaar

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी खालीलपैकी अपडेट पर्याय निवडा.

  • नाव
  • जन्म तारीख
  • लिंग
  • पत्ता

समजा मला इथे चुकीची जन्म तारीख बदलायची आहे तर मी date of birth या पर्यायावर क्लिक करून Proceed to Update Aadhaar वर क्लिक करणार आहे.

Aadhaar data field
Aadhaar data field

सूचना:- मोबाइल नंबर, ईमेल आणि बायोमेट्रिक्स डेटासाठी, कृपया जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट द्या.

मला चुकीची जन्म तारीख बदलायची आहे म्हणून मी वरती date of birth हा ऑप्शन निवडला होता. त्यामुळे मी इथे योग्य जन्म तारीख टाकणार आहे आणि आवश्यक एक कागदपत्र निवडून ते अपलोड करणार आहे.

 Upload Document
Upload Document

आता खालील दोन्ही ऑप्शन वर टिक करा आणि त्यानंतर Next बटन वर क्लिक करा.

  • Allow UIDAI to correct any transliteration related inaccuracy which may have occurred.
  • I hereby confirm that I have read the instructions carefully and the information provided by me to the UIDAI is true and correct.
click on next
Click on next

पुढे “I hereby confirm that I have read and understood the Payments / Cancellation / Refunds Process.” या ऑप्शन वर क्लिक करून Make Payment या ऑप्शन वरती क्लिक करा.

तुम्हाला ऑनलाइन अपडेटसाठी ₹ 50 (फक्त पन्नास रुपये) भरावे लागतील. तुम्ही क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग द्वारे पेमेंट करू शकता.

Make Payment
Make Payment

पेमेंट केल्यावर तुम्ही (Acknowledgement Slip) पोचपावती Download Acknowledgement बटन वर क्लिक करून डाउनलोड करून ठेवा.

Acknowledgement Slip
Acknowledgement Slip

आधार अपडेट स्टेट्स चेक करण्यासाठी पुन्हा डॅशबोर्ड वर येऊन Requests मध्ये बाण चिन्हावर क्लिक करून विनंतीची तपशीलवार स्थिती तपासू शकता.

आधार कार्ड मध्ये बदल झाल्यावर तुम्हाला इथे प्रोसेस स्टेट्स दाखवेल किंवा रजिस्टर मोबाईलवर एसएमएस द्वारे सूचना मिळेल. संपूर्ण अपडेट प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 5-7 दिवस लागतात. तुमची विनंती आधी नमूद केलेल्या वेळेपर्यंत अपडेट केली जाईल.

हेही वाचा – आधार PVC कार्ड ATM सारखं दिसणार आधार कार्ड ऑनलाईन ५० रुपयात बनवा, जाणून घ्या सविस्तर प्रोसेस (Aadhaar PVC card)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

4 thoughts on “Update Aadhaar Online : आधार कार्ड (नाव, पत्ता, जन्म तारीख व लिंग) मध्ये बदल करून ऑनलाईन अपडेट करा !

  • Gaurav Ganesh Pargharmol

    Photo kasa change karaycha?

    Reply
    • फोटो आधार सेण्टरला जाऊन बदला

      Reply
  • प्रदीप मोडक

    सर, मी ग्रुप जॉईंट करायला एक वर्ष पूर्ण झाले, गृपवर तुम्हाला रिप्लाय होतच नव्होता, मला कास्ट सरटिफिकेट मोबाईल वरून ऑनलाईन काढता येईल का ?
    ………….ग्रुप गवरून उत्तम माहिती देता त्याबद्दल………………… खूप खूप धन्यवाद

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.