UDID Card : दिव्यांगांसाठीच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी वैश्विक ओळखपत्र अनिवार्य !
केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ ची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने २१ प्रकारच्या दिव्यांगत्त्व प्रकारांवरील दिव्यांगत्त्व प्रमाणपत्रे उपलब्ध व्हावीत, यासाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेली मार्गदर्शक तत्त्वे, कार्यपद्धती व अपिल पद्धती याबाबतच्या सविस्तर सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक १४ सप्टेंबर, २०१८ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.
दिव्यांगांसाठीच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी वैश्विक ओळखपत्र अनिवार्य – UDID Card:
केंद्र शासन, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या दिनांक ३ मार्च, २०२३ च्या कार्यालयीन ज्ञापनान्वये, शासनाकडून दिव्यांगांसाठीच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी वैश्विक ओळखपत्र (UDID Card) अनिवार्य करण्यात आलेले आहे.
तसेच दिव्यांग कल्याण विभागाच्या दिनांक ८ मार्च, २०२३ च्या परिपत्रकान्वये, दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्त्व प्रमाणपत्र वितरण करण्याच्या प्रक्रीयेस गतिमानता येण्यास व केंद्र शासनामार्फत ठरवून दिलेले १००% ध्येय गाठण्यास तसेच महाराष्ट्र राज्याची कामगिरी उंचावण्यासाठी दिव्यांगत्त्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID Card) देण्याच्या विशेष मोहिमेस दिनांक ३० जून, २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
सबब केंद्र / राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी राज्यातील दिव्यांगांसाठी वैश्विक ओळखपत्र (UDID Card) अनिवार्य करण्यासंदर्भात सविस्तर सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
दिव्यांगांसाठी वैश्विक ओळखपत्र (UDID Card) अनिवार्य करण्यासंदर्भात सविस्तर सूचना :
केंद्र / राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या विविध योजना / नोकरी मधील आरक्षण / पदोन्नती / सवलती इ. चा लाभ मिळण्यासाठी राज्यातील दिव्यांगांसाठी वैश्विक ओळखपत्र (UDID Card) अनिवार्य करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे सविस्तर सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
दिव्यांगत्त्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID Card) प्राप्त करणे:
केंद्र / राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या विविध योजना / सवलती इ. चा लाभ मिळण्यासाठी राज्यातील दिव्यांगांसाठी वैश्विक ओळखपत्र (UDID Card) अनिवार्य करण्यात येत असून ज्या दिव्यांगांकडे कोणतेही दिव्यांगत्त्व प्रमाणपत्र नाही, त्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक १४ सप्टेंबर, २०१८ च्या शासन निर्णयान्वये / भविष्यात वेळोवेळी स्थापन करण्यात आलेल्या / येणाऱ्या वैद्यकीय मंडळामार्फत दिव्यांगत्त्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID Card) प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे.
वैश्विक ओळखपत्रासाठीचा नाव नोंदणी क्रमांक (Enrolment Number) सादर करणे:
ज्या दिव्यांग व्यक्तींकडे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक १४ सप्टेंबर, २०१८ चा शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी शासनाने नेमून दिलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले दिव्यांगत्त्व प्रमाणपत्र आहे, त्यांनी उक्त शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय मंडळामार्फत दिव्यांगत्त्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID Card) प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे. वैश्विक ओळखपत्र (UDID Card) प्राप्त करून घेण्यासाठी नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्षात सदर ओळखपत्र प्राप्त होईपर्यंतच्या कालावधीसाठी संबंधित दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्त्वाच्या सवलती / योजना यांचा लाभ घेण्यासाठी त्यांचेकडे असलेले दिव्यांगत्त्व प्रमाणपत्रासोबत वैश्विक ओळखपत्रासाठीचा नाव नोंदणी क्रमांक (Enrolment Number) सादर करणे अनिवार्य राहील.
सदर प्रमाणपत्र प्राप्त करून घेणार नाहीत, ते दिव्यांगांसाठीच्या सवलती / योजना इ. लाभ मिळण्यास पात्र राहणार नाहीत:
ज्या दिव्यांग व्यक्तींकडे शासनाने वेळोवेळी नेमून दिलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले दिव्यांगत्व प्रमाणपत्र नसेल, तथापि त्यांचेकडे शासकीय रुग्णालयांमधून दिलेले अन्य वैद्यकीय/दिव्यांगत्त्व प्रमाणपत्र असेल व त्या आधारे जर ते दिव्यांगांसाठीच्या सवलती / योजना यांचा लाभ घेत असतील, तर अशा दिव्यांग व्यक्तींना सदर शासन परिपत्रकाच्या दिनांकापासून एका वर्षाच्या मुदतीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक १४ सप्टेंबर, २०१८ च्या शासन निर्णयानुसार / भविष्यात वेळोवेळी स्थापन करण्यात आलेल्या / येणाऱ्या वैद्यकीय मंडळाकडून दिव्यांगत्त्व प्रमाणपत्र / वैश्विक ओळखपत्र (UDID Card) प्राप्त करून घेणे अनिवार्य राहील. जे दिव्यांग व्यक्ती उक्त मुदतीनंतरसुद्धा सदर प्रमाणपत्र प्राप्त करून घेणार नाहीत, ते दिव्यांगांसाठीच्या सवलती / योजना इ. लाभ मिळण्यास पात्र राहणार नाहीत.
तरी सर्व मंत्रालयीन विभाग / त्यांचे प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व विभाग / कार्यालये त्याचप्रमाणे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांना सूचित करण्यात येते की, त्यांनी उक्त सूचना त्यांचे नियंत्रणाखालील संबंधित दिव्यांग कर्मचाऱ्यांना द्याव्यात, तसेच त्यांचेकडून सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन होत असल्याबाबत खातरजमा करण्यात यावी.
तसेच आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे यांना सूचित करण्यात येते की, सदर सूचना राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींच्या निदर्शनास आणण्याच्या दृष्टीने त्यांनी या परिपत्रकास उचित प्रसिद्धी देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for UDID Card): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
दिव्यांग कल्याण विभाग शासन निर्णय :
केंद्र शासनाच्या धर्तीवर दिव्यांगत्त्वासंदर्भातील सर्व लाभ मिळविण्यासाठी वैश्विक ओळखपत्र (Unique Disability Identity Card-UDID Card) बंधनकारक करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!