‘ट्रेड सर्टिफिकेट’ प्राप्त न केलेल्या वाहनांची विशेष तपासणी मोहीम!
केंद्रीय मोटार वाहन कायदा व नियमानुसार वाहनांची नोंदणी करण्यासाठी वाहन वितरक आणि उत्पादक यांनी व्यवसाय प्रमाणपत्र (Trade Certificate) घेणे आवश्यक आहे. केद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार वाहनांच्या विक्री, व्यापार किवा प्रदर्शनामध्ये गुंतलेले प्रत्येक विशिष्ट प्रतिष्ठान, शोरूम किंवा डिलरशीप संबंधित नोंदणी प्राधिकरणाकडून स्वतंत्र व्यापार प्रमाणपत्र (Trade Certificate) प्राप्त करणे आवश्यक आहे. ट्रेड सर्टिफिकेट प्राप्त न केलेले वाहन वितरक व उत्पादक यांनी अशी वाहने विकल्यास ते मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १९२ नुसार दंडास पात्र असणार आहे. अशा वाहनांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
‘ट्रेड सर्टिफिकेट’- Trade Certificate:
प्रितपाल सिंग अँड असोसिएट, गुरुग्राम यांनी मेसर्स ओला इलेक्ट्रीक मोबालिटी लिमिटेड या कंपनीने एकच ट्रेड सर्टिफिकेट (Trade Certificate) घेऊन राज्यातील विविध ठिकाणी ‘ शोरूम व स्टोअर कम सर्व्हिस सेंटर’ उभारण्यात आले असल्याबाबत तक्रार केली आहे. या तक्रारीबाबत तात्काळ कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.
मंत्री सरनाईक यांच्या आदेशानुसार विशेष तपासणी मोहीम राबवून कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य, पश्चिम, पूर्व), बोरीवली व पुणे या कार्यालयाच्या अंतर्गत ट्रेड सर्टिफिकेट (Trade Certificate) बाबत ३६ वाहन विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून ३४ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
आवश्यक पात्रता:
- आपण वाहन विक्रेता (dealer), निर्माता (manufacturer), रिपेअर गॅरेज (repair garage), किंवा ट्रान्सपोर्ट एजन्सी असायला हवे.
- वाहनांचा व्यापार किंवा ट्रायल रनसाठी हा सर्टिफिकेट (Trade Certificate) आवश्यक असतो.
आवश्यक कागदपत्रे:
- फॉर्म 16 (Trade Certificate साठी अर्ज)
- पत्ता आणि ओळख पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी)
- व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र
- GST नोंदणी प्रमाणपत्र
- इन्शुरन्स डिटेल्स
- पूर्वी घेतलेल्या वाहन परवान्यांचे तपशील (असल्यास)
‘ट्रेड सर्टिफिकेट’साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया:
- परिवहन सेवा वेबसाइट ला भेट द्या.
- “Online Services” > “Vehicle Related Services” निवडा.
- आपले राज्य आणि RTO ऑफिस निवडा.
- “Apply for Trade Certificate” पर्यायावर क्लिक करा.
- फॉर्म 16 भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- फी भरा (फी वाहन प्रकारावर अवलंबून असते).
- अर्ज सबमिट करा आणि acknowledgment slip मिळवा.
‘ट्रेड सर्टिफिकेट’साठी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया:
- आपल्या स्थानिक RTO कार्यालयात भेट द्या.
- फॉर्म 16 भरून आवश्यक कागदपत्रांसह सबमिट करा.
- फी भरून, रिसीट घ्या.
- तपासणी पूर्ण झाल्यावर, Trade Certificate जारी केला जातो.
फॉर्म 16 (Trade Certificate Application) नमुना:
(1) अर्जदाराचे नाव:
(2) व्यवसायाचे नाव आणि पत्ता:
(3) व्यवसाय प्रकार: (वाहन विक्रेता / निर्माता / गॅरेज / ट्रान्सपोर्ट इ.)
(4) आवश्यक वाहन प्रकार: (दुचाकी / चारचाकी / कमर्शियल इ.)
(5) पूर्वी घेतलेले ट्रेड सर्टिफिकेट डिटेल्स (असल्यास)
(6) इन्शुरन्स तपशील:
(7) अर्जदाराची सही आणि दिनांक
या लेखात, आम्ही वाहन ‘ट्रेड सर्टिफिकेट – Trade Certificate’ विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
खालील लेख देखील वाचा!
- वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे बंदनकारक; HSRP नंबर प्लेटसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
- घरबसल्या पसंतीचा वाहन क्रमांक मिळण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज!
- वाहन 4.0 पोर्टलवर RTO च्या विविध सेवांचा घरबसल्या ऑनलाईन लाभ घ्या !
- नवीन बांधणी झालेल्या वाहनांची विक्रेत्यांमार्फत होणार नोंदणी !
- राज्यात RTO च्या सहा सेवा ऑनलाईन आणि फेसलेस; वाहन चालकांना फायदा होणार!
- लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढा फक्त आधार कार्डने, जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस
- दुचाकी विक्री करताना दोन हेल्मेट द्या, नाही तर कारवाई !
- गाडीचे आरसी बुक ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस !
- CSC ट्रान्सपोर्ट पोर्टल नवीन पोर्टल सुरु; आता CSC सेंटर मध्ये होणार RTO ची सर्व कामे !
- या वाहनांना वेग नियंत्रक उपकरण बसविणे बंधनकारक !
- वाहनांच्या सुगम स्थलांतरणाकरिता केंद्र सरकारने सुरु केली भारत मालिका (बीएच-सिरीज) ही नवी वाहन नोंदणी मालिका
- वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ५० रुपये प्रति दिवस विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती
- पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन धोरण
- जुनी वाहने भंगारात काढण्याच्या धोरणा अंतर्गत सवलतींबाबतची अधिसूचना जारी !
- ट्राफिक पोलिसांनी वाहन टोइंग करण्याच्या कार्यपध्दती !
- मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल योजनेसाठी दिव्यांग व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन !
- पर्यावरणपूरक वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत ई रिक्षा वाटप लाभार्थी यादी पहा ऑनलाईन !
- पिंक ई-रिक्षा योजना; सुधारित शासन निर्णय !
- परदेशात कार चालवायची असेल तर इथेच काढा परवाना !
- रिक्षासह टॅक्सी परवानाधारकाची गैरवर्तणुकीची तक्रार मुंबईत व्हॉटसॲपद्वारे नोंदवू शकणार !
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!