३५ सदस्यांपेक्षा कमी सदस्य संख्या असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापन समितीची सदस्य संख्या निश्चित !
छोटया सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या कामकाजामध्ये सुसूत्रता येणेसाठी व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची संख्या ११ असण्याबाबतची अट ३५ सदस्यांपेक्षा कमी सदस्य संख्या असणाऱ्या गृहनिर्माण संस्थांचे बाबतीतही शिथील करण्याचे आदेश निर्गगित करणेबाबत राहकार आयुक्त यांचे स्तरावरील दि.११.१२.२०२३ रोजी आयोजित कायदा सुधारणा समितीच्या सभेमध्ये तपशीलवार विचारविनिमय झाला.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५४ ब (१९) (१) मध्ये समिती ही, राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेव्दारे, सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाव्दारे वेळोवेळी ठरवील इतक्या सदस्यांची मिळून बनलेली असेल, अशी तरतूद आहे.
गृहनिर्माण संस्थाकरीता तयार केलेल्या आदर्श उपविधीच्या प्रकरण १२ मध्ये सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिने परि.क्र.११४ मध्ये व्यवस्थापकीय समितीची संख्या निश्चित केलेली आहे. ती खालीलप्रमाणे.
“११४ : समितीतील सदस्यांची संख्या ११/१३/१५/१७ आणि १९ अशा प्रकारे असेल व या संख्येमध्ये अधिनियमातील कलम ७३ ब व ७३ क अन्वये तरतूद केल्याप्रमाणे आरक्षित सदस्य संख्येचा समावेश असेल.
व्यवस्थापन समितीतील सदस्यांची संख्या
संस्थेच्या सदस्यांची संख्या | सर्वसाधारण | राखीव जागा | एकूण | समितीच्या सभेकरीता गणपूर्ती संख्या | |||
महिला | अ.जा./अ.ज. | इ.मा.व | वि.जा./भ.ज. वि.मा.प्र. | ||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ |
१०० सदस्यांपर्यत | ६ | २ | १ | १ | १ | ११ | ६ |
१०१ ते २०० | ८ | २ | १ | १ | १ | १३ | ७ |
२०१ ते ३०० | १० | २ | १ | १ | १ | १५ | ८ |
३०१ ते ५०० | १२ | २ | १ | १ | १ | १७ | ९ |
५०१ आणि अधिक | १४ | २ | १ | १ | १ | १९ | १० |
सभेच्या गणपुर्तीसाठी विद्यमान समिती सदस्यांचे सरळ बहुमत आवश्यक असेल.”
वरील तक्त्यातील व्यवस्थापकीय समितीच्या सदस्य संख्येमध्ये ३५ सदस्यांपेक्षा कमी सदस्य संख्या असणाऱ्या गृहनिर्माण संस्थेसाठी किमान व्यवस्थापकीय सदस्य निवडण्याचे अधिकार संस्थेला देण्याची बाब विचाराधीन होती.
३५ सदस्यांपेक्षा कमी सदस्य संख्या असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापन समितीची सदस्य संख्या निश्चित शासन निर्णयः-
३५ सदस्यांपेक्षा कमी सदस्य संख्या असणाऱ्या गृहनिर्माण संस्थेसाठी खालील मर्यादेत व्यवस्थापकीय समितीमध्ये सदस्य संख्या निवडीचे अधिकार सहकारी गृहनिर्माण संस्थेस देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
संस्थेच्या सदस्यांची संख्या | सर्वसाधारण | राखीव जागा | एकूण | समितीच्या सभेकरीता गणपूर्ती संख्या | |||
महिला | अ.जा./अ.ज. | इ.मा.व | वि.जा./भ.ज. वि.मा.प्र. | ||||
३५ पेक्षा कमी सदस्य संख्या | १ | १ | १ | १ | १ | ५ | ३ |
सदर आदेश, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम १५४ (ब) (१९) नुसार शासनास प्राप्त असलेल्या अधिकारात निर्गमित करण्यात येत आहेत.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय : ३५ सदस्यांपेक्षा कमी सदस्य संख्या असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापन समितीची सदस्य संख्या निश्चित करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापक समितीचे कर्तव्य व जबाबदारी !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!