उमेदवार, राजकीय पक्षांसाठी निवडणुकीबाबतच्या परवानग्या ‘सुविधा 2.0’ मोबाईल ॲपवर मिळवा ऑनलाईन!
भारत निवडणूक आयोगाने (ECI) ‘सुविधा 2.0 (Suvidha App 2.0)’ हे मोबाईल अॅप अद्ययावत केले असून याद्वारे उमेदवार आणि पक्षांना आता कोणत्याही ठिकाणाहून सहजपणे निवडणूक मोहिमेच्या परवानग्या ऑनलाईन सुविधेद्वारे मिळणार आहेत. यापूर्वी फक्त ऑनलाईन पोर्टलवरच अर्ज सादर करता येत होते, पण आता नवीन अॅपद्वारे सर्व प्रक्रिया मोबाईलवरून करता येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
प्रचाराशी संबंधित परवानग्यांचा अर्ज सुलभतेने भरण्यासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवार आता नवीन आणि अपग्रेड (अद्ययावत) केलेल्या सुविधा 2.0 (Suvidha App 2.0) मोबाईल ऍप्लिकेशनचा वापर करू शकतील. यापूर्वी, केवळ ऑफलाइन माध्यम अथवा वेब-आधारित पोर्टलद्वारे परवानगीचा अर्ज भरता यायचा, त्यामुळे उमेदवार आणि पक्ष केवळ अर्जाच्या सद्यःस्थितीचा मागोवा घेऊ शकत होते आणि मोबाइल ॲपवर मंजूरी डाउनलोड करू शकत होते. नवीन अपग्रेडमुळे SUVIDHA ॲप,उमेदवार आणि पक्षांसाठी केवळ एका क्लिक द्वारे प्रचाराशी संबंधित सर्व परवानग्या मिळवण्याचे, ट्रॅकिंगचे आणि डाउनलोड करण्याचे तसेच भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या प्रेस नोट्स आणि ताज्या सूचना/ऑर्डर्स मिळवण्याचे ‘वन स्टॉप सोल्यूशन’ ठरेल.
उमेदवार, पक्षांसाठी निवडणुकीबाबतच्या परवानग्या ‘सुविधा 2.0’ मोबाईल ॲपवर मिळवा ऑनलाईन! Suvidha App 2.0:
‘फर्स्ट इन फर्स्ट आउट’ या तत्त्वावर काम करणारे हे व्यासपीठ पारदर्शक पद्धतीने परवानग्या सुनिश्चित करते, ज्यामुळे कुठल्याही संदिग्धतेची शक्यता दूर करते.
नवीन ॲपचे उद्घाटन करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, निवडणूकीत उमेदवार आणि पक्षांना समानता प्रदान करण्यासाठी, आयोग तंत्रज्ञानाचा सातत्त्याने लाभ घेण्याचा प्रयत्न करत असून, सुविधा 2.0 (Suvidha App 2.0) चे उद्घाटन, हे तांत्रिकदृष्ट्या सक्षम निवडणुकांच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. कारण, निवडणुकीच्या वेगवेगळ्या परवानग्या मिळवण्यासाठी फिरत असलेले उमेदवार आता त्यांच्या मोबाइल फोनवरून परवानग्या मिळवण्याचा अर्ज सहजपणे भरू शकतील, आणि अर्जाची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी ट्रॅकिंग करू शकतील.
सुविधा 2.0 (Suvidha App 2.0) मोबाइल ॲप, वापरकर्त्यांना प्रचाराशी संबंधित कोणत्याही परवानगीसाठी आवश्यक तो अर्ज, घोषणा आणि इतर कागदपत्रे डाउनलोड करण्याची सुविधा प्रदान करेल. त्यानंतर एक संदर्भ आयडी दिला जाईल, ज्याच्या मदतीने वापरकर्ते आपल्या अर्जाच्या सद्य स्थितीचा मागोवा घेऊन शकतील. परवानगीच्या विनंतीवर निर्णय झाल्यावर, विनंतीवरील आदेशाची (ऑर्डर) प्रत देखील ॲपवरून डाउनलोड करता येईल.
वापरकर्त्यांना नामांकनाची स्थिती, निवडणुकीचे वेळापत्रक आणि नियमित घडामोडींचा मागोवा घेणे, यासारख्या सुविधा इतर अनेक फीचर्स द्वारे प्रदान केल्या जातील. यापूर्वी हे फीचर्स केवळ निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध होते. सुविधा 2.0 (Suvidha App 2.0) मोबाईल ऍप्लिकेशन अधिक वापरकर्ता अनुकूल असून, त्यामध्ये सुरक्षेबाबतची अधिक वैशिष्ट्ये आहेत.
सुविधा 2.0 (Suvidha App 2.0) हे मोबाईल ॲप वापरण्यास सहज आणि अधिक सुरक्षित आहे. या अॅपच्या खास वैशिष्ट्यांमध्ये उमेदवारांना अर्ज डाउनलोड करणे, प्रचारासंदर्भातील परवानग्या मागवणे, अर्ज केलेल्या परवानगी संदर्भात सद्यस्थिती जाणून घेणे आणि मंजुरीची प्रत डाउनलोड करणे आदी बाबी समाविष्ट आहेत. या अॅपमध्ये नामनिर्देशन प्रक्रिया, निवडणूक वेळापत्रक आणि निवडणूक आयोगाच्या ताज्या अद्ययावत सूचना व आदेश देखील उपलब्ध असतील.
सुविधा 2.0 ॲप (Suvidha 2.0 App):
- अँड्रॉइडसाठी गुगल प्ले स्टोरवरून सुविधा 2.0 ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
पुढील लेख देखील वाचा!
- आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, ‘सीव्हिजिल ॲप’ वर तक्रार करा ! cVIGIL App
- निवडणूक उमेदवारांच्या गुन्हेगारी रेकॉर्ड पूर्ववृत्तांसाठी Know Your Candidate ॲप सुरू !
- दिव्यांग मतदारांना सक्षम ॲपच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध ! Saksham-ECI App
- मतदार यादी ऑनलाईन कशी डाउनलोड करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती!
- घरबसल्या मतदान कार्ड ऑनलाईन कसे काढायचे? सविस्तर प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
- डिजिटल मतदान कार्ड ऑनलाईन डाउनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर
- निवडणूक आयोगामार्फत मतदारांसाठी विविध उपयोगी प्रणाली पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
- मतदार यादीत नाव नसेल तर पात्र व्यक्तींनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन !
- “एक देश, एक निवडणूक” च्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी !
- निवडणूक आणि प्रचाराबाबात राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!