आंबा बागायतदार शेतकऱ्यांना प्लास्टिक क्रेट्स व ताडपत्री खरेदी करण्यासाठी ७५ टक्के अनुदान
ताडपत्री अनुदान योजना महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद निधी अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली एक योजना आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ताडपत्रीच्या एकूण रकमेवर ७५ टक्के अनुदानावर देण्यात येते.
महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक आंबा बागायतदार शेतकऱ्यांना प्लास्टिक क्रेट्स व ताडपत्री खरेदी करण्यासाठी ७५ टक्के अनुदान उन्नतीसाठी तसेच त्याचे जीवनस्तर सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजनांची अंमलबजावणी देखील करत असते त्या अनुशंघाने सुरु करण्यात आलेली ताडपत्री अनुदान योजना आहे.
आंबा बागायतदार शेतकऱ्यांना प्लास्टिक क्रेट्स व ताडपत्री खरेदी करण्यासाठी ७५ टक्के अनुदान:
आंबा बागायतदार शेतकऱ्यांना प्लास्टिक क्रेट्स व ताडपत्री खरेदी करण्यासाठी ७५ टक्के अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.
जिल्ह्यात विविध आंबा आणि काजू लागवडीखाली सुमारे पाऊणलाख हेक्टर क्षेत्र आहे. मात्र फळपिकांची काढणी, हाताळणी करताना साधारणतः १५ ते २० टक्के इतक्या उत्पादनाचे नुकसान होते. त्यामुळे फळपिकांचे काढणीपश्चात नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बागायतदरांसाठी प्लास्टिक क्रेट्स व प्लास्टिक ताडपत्री खरेदीकरिता ७५ टक्के अनुदान तत्वावर मंजुरी देण्यात आली आहे.
योजनेत पात्र शेतकऱ्यांकडे कमीत कमी २.२० हेक्टर क्षेत्र फळपिकाखालील असावे व फळपिकांची नोंद सातबारावर असावी. अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती, महिला तसेच अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. प्रति प्लास्टिक क्रेट्ससाठी अंदाजपत्रकीय रक्कम ४८० रुपये आणि ताडपत्रीसाठी २००० रुपये आहे, त्यानुसार ७५ टक्के अनुदानाप्रमाणे प्लास्टिक क्रेट्ससाठी जास्तीत जास्त ३६० रुपये प्रतिक्रेट्स किंवा प्रत्यक्ष खरेदी किंमतीच्या ७५ टक्के यापैकी जे कमी असेल ती आणि प्लास्टिक ताडपत्रीसाठी जास्तीत जास्त १ हजार ५०० रुपये प्रतिताडपत्री किंवा प्रत्यक्ष खरेदी किंमतीच्या ७५ टक्के यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे.
हेही वाचा – फळबाग लागवड योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!