वृत्त विशेषसार्वजनिक आरोग्य विभाग

स्त्री भ्रूणहत्या संदर्भात अशी करा ‘आमची मुलगी’ पोर्टलवर तक्रार आणि मिळवा १ लाख रुपयांचे बक्षीस!

राज्यातील गर्भलिंग निदान प्रतिबंध, लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्याकरिता व स्त्री भ्रूण हत्या रोखण्याकरिता राज्यात तक्रार (Stri bhrunhatya Takrar) नोंदविण्यासाठी ‘आमची मुलगी’ संकेतस्थळ सुरु करण्यात येत आहे. या संकेतस्थळामुळे राज्यात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ सुधारित कायदा २००३ (पीसीपीएनडीटी आणि एम.टी.पी) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मदत होणार आहे.

स्त्री भ्रूणहत्या संदर्भात अशी करा ‘आमची मुलगी’ पोर्टलवर तक्रार ! Stri bhrunhatya Takrar:

पीसीपीएनडीटी आणि एमटीपी या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता विविध उपक्रम आणि उपाययोजना यशस्वीपणे राबविण्यासाठी विविध योजनांची कार्यवाही करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ सुधारित कायदा २००३ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी व स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यात तक्रार (Stri bhrunhatya Takrar) नोंदविण्यासाठी तसेच याविषयी कुठल्याही शंकेचे निरसन करण्यासाठी ‘आमची मुलगी’ हे नवीन संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे.

या संकेतस्थळावर कोणीही तक्रार नोंदविल्यास ती तक्रार गोपनीय राहील व तक्रार (Stri bhrunhatya Takrar) देणाऱ्यास त्याची इच्छा असल्यास ते नाव देखील नोंदवू शकतील. पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत तक्रार (Stri bhrunhatya Takrar) निपटारा होऊन गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

१ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार!

तक्रारीची (Stri bhrunhatya Takrar) अंमलबजावणी होऊन जर स्त्री भ्रूण हत्या रोखण्यास यश आले, तर तक्रारदारास (Stri bhrunhatya Takrar) शासनामार्फत खबरी बक्षीस योजनेअंतर्गत रक्कम रुपये १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

नागरिकांनी आरोग्य विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या संकेतस्थळाचा लाभ घेऊन समाजातील जन्म लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यास सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

स्त्री भ्रूणहत्या संदर्भात ऑनलाईन तक्रार करण्याची प्रोसेस – Stri bhrunhatya Takrar Online:

स्त्री भ्रूणहत्या संदर्भात ऑनलाईन (Stri bhrunhatya Takrar) तक्रार करण्यासाठी खालील पोर्टलवर नागरिक नोंदणी करून किंवा नागरिक नोंदणी शिवाय तक्रार करू शकता.

http://amchimulgimaha.in/

Stri bhrunhatya Takrar (Amchi Mulgi Grievance)
Amchi Mulgi Grievance Login

स्त्री भ्रूणहत्या संदर्भात तक्रार (Amchi Mulgi Grievance) नोंदणी मध्ये तक्रार क्षेत्र तपशील, हॉस्पिटल तपशील, व तक्रार तपशील टाकून तक्रार नोंद करा.

संपर्क सूचना:

तक्रार नोंदणी टोल फ्री क्रमांक : 18002334475 / 104

सूचना:

  1. प्रणाली मध्ये काही टेक्निकल अडचण असल्यास +91 88620 82200 ह्या नंबर ला call करा किंवा info@cdat.co.in ह्या E-mail ID ला मेल करा.
  2. नोंदणी केलेल्या तक्रार संदर्भात काही प्रश्न असल्यास 020 2605 8476 ह्या नंबर ला call करा किंवा ह्या E-mail pndt07@gmail.com ID ला मेल करा .

खालील लेख देखील वाचा!

  1. अनाथ बालकांच्या पालकत्वासाठी समाजाने पुढे येण्याचे आवाहन !
  2. मिशन शक्ती च्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुधारित प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2.0
  3. लेक लाडकी योजनेतून मुलीसाठी 1 लाख रुपये कसे मिळवायचे? अर्ज कसा करायचा?
  4. सुधारित प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.० – Revised Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2.0
  5. बालविवाह प्रतिबंधक कायदा व जबाबदाऱ्या !
  6. सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Account)
  7. माझी कन्या भाग्यश्री सुधारित नवीन योजना
  8. पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजना (PM CARES for Children Scheme)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.