आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी कामे

शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी आता स्टॅम्प पेपर आवश्यक नाही !

शासकीय कार्यालयातून विविध प्रमाणपत्र नागरिकांकडून काढले जातात. त्यासाठी स्टॅम्प पेपर (Stamp Paper) वर प्रतिज्ञा (Affidavit) पत्र लिहून दिले जात असे; परंतु आता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एका जनहित याचिकेवर आदेश देताना मुद्रकांचा आग्रह धरू नये, अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक विभागाने राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना ३० ऑक्टोबर रोजी निर्देश देऊन कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

‘प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपर आवश्यक नाही’ – Stamp Paper Not required for Affidavit:

मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांचे जनहित याचिका क्रमांक ५८/२०२१ वरील न्यायालयीन आदेशान्वये जनहित याचिका ५८/२०२१ मध्ये मा. उच्च न्यायालय, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ यांनी खालीलप्रमाणे सुचना केलेल्या आहेत.

मा. उच्च न्यायालय, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ यांनी केलेल्या सुचना:

All the Government authorities have to take effective steps to implement the notification and to make the authorities and the public aware. It is also the duty of the authorities to implement the notification in its true letter and spirit, so that unnecessary burden on the citizens would be avoided. Needless to state that, the exercise shall be done by the state government throughout the State of bringing it to the notice of all the Government departments and the authorities accepting affidavits and declaration not to insist upon the stamp duty.

महाराष्ट्र शासन, महसुल व वन विभागाकडील अधिसूचना क्र. मुद्रांक २००४/१६६३/प्र.क्र४३६/म-१ दि.०१/०७/२००४ अन्वये शासनाने शासकीय कार्यालयात जात / प्रमाणपत्र / उत्पन्न प्रमाणपत्र / वास्तव्य प्रमाणपत्र / राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तसेच शासकीय कार्यालये यांचेसमोर दाखल करावायाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञा (Affidavit) पत्रावर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील अनुसूची-१ मधील अनुच्छेद-४ अन्वये आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ केले आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्रमांक ७२ दि. १४/१०/२०२४ अन्वये महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाचे परिशिष्ठ एक मधील अनुच्छेदामध्ये सुधारणा करण्यात आली असून अनुच्छेद क्रमांक ४, ५, ८, ९.२७, ३०, ३८, ४४, ५०, ५२, ५८ मध्ये रु. १००/- किंवा रु. २००/- ऐवजी रु. ५००/- मुद्रांक शुल्क करण्यात आले आहे.

मा. उच्च न्यायालय, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे आदेशानुसार शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करतांना नागरिकांकडून मुद्रांकाचा आग्रह करु नये असे स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच ई-सेवा केंद्रामध्ये नागरीकाकडून सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी रुपये १००/- चे स्टॅम्प पेपर (Stamp Paper) ची मागणी करीत असतात.

दिनांक १४/१०/२०२४ चे शासन निर्णयानुसार ई-सेवा केंद्रामध्ये पक्षकाराकडून रुपये ५००/- चे स्टॅम्प पेपर (Stamp Paper) ची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. शासकीय कार्यालय तसेच न्यायालयासमोर दाखल करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञा (Affidavit) पत्रावर मुद्रांक शुल्क माफ केलेले असल्याने या संदर्भात आपल्या अधिपत्याखाली असलेले उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना मार्गदर्शन करण्यात येईल.

पुढील लेख देखील वाचा!

  1. Stamp Duty : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर असलेले मुद्रांक शुल्क माफ करणेबाबत शासन नियम !
  2. Stamp License : मृत पावलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना मिळणार मुद्रांक परवाना !
  3. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
  4. आता व्हॉट्सॲप वर डाउनलोड करता येणार तुमची सरकारी कागदपत्रे !
  5. मालमत्ता (जमीन/घर/दुकान) यांचे नोंदणी कागदपत्रे ऑनलाईन कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.