आपले सरकार - महा-ऑनलाईनमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजनासामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना आता अर्थसहाय्याचे थेट लाभ मिळणार !

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधील लाभार्थ्यांना थेट (Special Assistance DBT Scheme) लाभ हस्तांतरण (DBT – Direct Benefit Transfer) करण्याकरिता संकेतस्थळ विकसित केलेले आहे.

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजनाश्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत. माहे, डिसेंबर, २०२४ पासून सदर योजनेंतर्गत (Special Assistance DBT Scheme) पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT (Direct Benefit Transfer) Portal मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावयाची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना आता अर्थसहाय्याचे थेट लाभ मिळणार ! Special Assistance DBT Scheme:

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (Special Assistance DBT Scheme) या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे (Special Assistance DBT Scheme) वितरण डी. बी. टी. पोर्टलद्वारे करण्याबाबतचा शासन निर्णय या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे.

क्षेत्रिय स्तरावरुन दिनांक १९.१२.२०२४ पर्यत DBT पोर्टलवर On Board झालेल्या लाभार्थ्यांची संख्या २७,१५,७९६ इतकी आहे. त्यानुषंगाने DBT पोर्टलवर On Board (Aadhar Validate झालेल्या + Aadhar Validate न झालेल्या) लाभार्थ्यांना माहे डिसेंबर, २०२४ व जानेवारी, २०२५ चे अर्थसहाय्य DBT पोर्टल मार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तसेच On Board नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच्याच पारंपरिक पध्दतीने (बिम्स प्रणालीद्वारे) अर्थसहाय्य वितरीत करण्यात येणार आहे.

सदर बिम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य (Special Assistance DBT Scheme) वितरणाची सुविधा ही माहे जानेवारी, २०२५ अखेरपर्यंतच उपलब्ध असेल. दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी यांनी DBT पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युध्दपातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे Aadhar अद्ययावत करण्यासाठी तालुका / मंडळस्तरावर विशेष मोहिम राबविण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना यापुर्वी पत्रान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत.

दिनांक १९.१२.२०२४ पर्यत On Board झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान (Special Assistance DBT Scheme) योजनेतील लाभार्थ्यांची संख्या १२,३६,४२५ इतकी आहे. तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन (Special Assistance DBT Scheme) योजनेतील लाभार्थ्यांची संख्या १४,७९,३६६ इतकी असून अशा एकूण २७,१५,७९१ लाभार्थ्यांना डिसेंबर, २०२४ या महिन्याचे अर्थसहाय्य DBT पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता रु.४०८.१३ कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे सदरहू योजनांकरीता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. द्वारे करण्याबाबत महाआयटी कार्पोरेशन लिमिटेड, मुंबई यांनी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करतील व सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले आहे की, आपल्या जिल्हयातील सर्व तालुक्यांनी लाभार्थ्यांची अचूक माहिती डी.बी.टी. पोर्टलवर भरल्याची खातरजमा करावी.

शासन निर्णय:

  1. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. (Special Assistance DBT Scheme) पोर्टलद्वारे करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  2. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

संपर्क: विशेष सहाय्य योजना कक्ष, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आनेक्स बिल्डिंग, पहिला माळा, मंत्रालय मुंबई, ४०००३२, ई-मेल-so.visayo2@maharashtra.gov.in

या लेखात, आम्ही संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे थेट लाभ! विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

खालील महत्वपूर्ण लेख वाचा !

  1. संजय गांधी निराधार अनुदान योजना; निराधार व्यक्तीना दरमहा आर्थिक सहाय्य/ निवृत्तीवेतन योजना!
  2. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
  3. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना
  4. विधवा, अपंग व निराधार अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी असा करा ऑनलाइन अर्ज!
  5. या ५ विशेष सहाय्य योजनांचे ऑफलाईन/ऑनलाईन अर्ज आता ग्रामपंचायत मध्ये ही भरता येणार !
  6. विधवा, अपंग व निराधार अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी असा करा ऑनलाइन अर्ज (Special Assistance Scheme)
  7. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ !

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.