आपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!

राज्य पुरस्कृत एकात्मिक पिकांची उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४- २५ योजनेत सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप (Solar Favarni Pump) वितरीत करण्यात येणार आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप (Solar Favarni Pump) योजनेत वैयक्तिक शेतकरी यांना फवारणी पंप (Solar Favarni Pump) अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या बाबीच्या लाभासाठी खालील महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करावे लागणार आहे.

सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस – Solar Favarni Pump MahaDBT Yojana:

सौर चलित फवारणी यंत्र अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा.

शेतकरी मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील आपले सरकार केंद्र इ. माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा.

ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व हा नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल.

अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

महाडीबीटी पोर्टलवर यूजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे. पुढे अर्ज करा अशी लिंक शोधून त्यावर क्लिक करा. कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.

कृषी यांत्रिकीकरण
कृषी यांत्रिकीकरण

आता एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरा जसे की मुख्य घटक या पर्यायामध्ये कृषी यंत्र औजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा. तपशील मध्ये मनुष्य चलित अवजारे हा पर्याय निवडा.

यंत्रसामुग्री, अवजारे व उपकरणे या पर्यायामध्ये पीक संरक्षण अवजारे हा पर्याय निवडा.

Solar Favarni Pump MahaDBT Yojana
Solar Favarni Pump MahaDBT Yojana

त्यानंतर मशीनचा प्रकार यामध्ये सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप हा पर्याय निवडा. सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप (Solar Favarni Pump) योजनेच्या अटी आणि शर्थी मान्य करण्यासाठी दिलेल्या चौकटीमध्ये टिक करा आणि जतन करा या बटनावर क्लिक करा.

तुम्हाला अजून काही अर्ज करायचे असेल तर yes या बटनावर क्लिक करा नसेल तर No या बटनावर क्लिक करा. आपण फक्त बॅसौरचलित नॅपसॅक फवारणी (Solar Favarni Pump) पंपासाठी अर्ज करत आहोत त्यामुळे No या बटनावर क्लिक करणार आहोत.

अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा. सूचना वाचून घ्या आणि ओके बटनावर क्लिक करा.

आता पुढे पहा या बटनावर क्लिक करा. या ठिकणी तुम्ही जर एकापेक्षा अनेक योजनांसाठी अर्ज केला असेल तर त्या योजनांना प्राधान्य क्रमांक द्यावा लागेल, तो देवून टाका.

सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप (Solar Favarni Pump) योजनेच्या अटी आणि शर्थी मान्य करा आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.

सौरचलित नॅपसॅक फवारणी (Solar Favarni Pump) पंपासाठी तुम्हाला २३.६० एवढे शुल्क भरावे लागणार आहे त्यासाठी Make Payment या बटनावर क्लिक करा.

पेमेंट करण्याचा पर्याय निवडा. Proceed for Payment या पर्यायावर क्लिक करा. पेमेंट करण्याचे अनेक पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसेल तुम्हाला जो सोपा वाटेल तो पर्याय निवडून पेमेंट करा. शक्यतो क्यूआर कोड हा पर्याय पेमेंट करण्यासठी वापरा कारण तो अधिक सोपा आहे. पेमेंटची पावती प्रिंट करून घ्या.

सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपाच्या अर्जाचे स्टेटस पहा (Solar Favarni Pump Application Status):

सौरचलित नॅपसॅक फवारणी (Solar Favarni Pump) पंपासाठी महाडीबीटीवर अर्ज सादर केल्यानंतर शासनाच्या वतीने दर हफ्त्याला लॉटरी पद्धतीने अर्ज निवडले जातात यामध्ये जर तुमच्या अर्जाची निवड झाली तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक संदेश येईल त्यानुसार कागदपत्रे अपलोड करून द्या.

तुम्हाला जर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती बघायची असेल म्हणजेच अर्जाचे स्टेट्स बघायचे असेल तर मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करा.

Solar Favarni Pump Application Status
Solar Favarni Pump Application Status

छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जाचे तपशील दिसेल. अर्जाची पोहोच पावती देखील तुम्ही डाउनलोड करू शकता.

अशा पद्धतीने तुम्ही सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपासाठी (Solar Favarni Pump) अर्ज सादर करू शकता. याबाबत अधिक माहितीसाठी कृषि विभागाचे कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

महाडीबीटी पोर्टल: https://mahadbt.maharashtra.gov.in/

महाडीबीटी शेतकरी मोबाईल अ‍ॅप: महाडीबीटी शेतकरी अ‍ॅप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना: ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेल्पलाईन क्रमांक: 022-49150800

या लेखात, आम्ही सौरचलित नॅपसॅक फवारणी (Solar Favarni Pump) पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? या विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

खालील लेख देखील वाचा !

  1. बॅटरी फवारणी पंप १००% अनुदानसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
  2. सर्व शेतकरी योजना आता “महाडीबीटी शेतकरी मोबाईल अ‍ॅप” वर – MahaDBT Farmer App
  3. या शेतकऱ्यांना मिळणार मोफत सोलर पंप; असा करा ऑनलाईन अर्ज !
  4. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना; असा करा ऑनलाईन अर्ज!
  5. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४; आता शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज!
  6. कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी सुरु; असा करा ऑनलाईन अर्ज ! – Kusum Solar Pump Yojana Online Registration
  7. सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पहा !
  8. कुसुम सोलर पंपाचे दर, कंपनी संपर्क व लाभार्थी यादी पहा ऑनलाईन !
  9. पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु !
  10. कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य (कृषी यांत्रिकीकरण) योजनेसाठी असा करा महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज!
  11. महाडीबीटी लॉटरी मध्ये निवड व पूर्व संमती मिळाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे !
  12. शेतकऱ्यांसाठी “अर्ज एक योजना अनेक”, महाडीबीटी पोर्टल योजना – MahaDBT Portal Scheme
  13. महाडीबीटी पोर्टल वरील योजना प्रभावीपणे राबविणेबाबत परिपत्रक जारी – MahaDBT Portal Schemes.
  14. महाडीबीटी योजना लाभार्थी यादी ऑनलाईन डाउनलोड करा ! MahaDBT Yojana Beneficiary List Download Online!

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.