मनरेगा अंतर्गत शेततळे अनुदान योजना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेततळे अनुदान योजनेची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कृषी विभागामार्फत भूस्तराप्रमाणे शेततळे खोदण्याचा कार्यक्रम लाभधारक शेतकऱ्यांच्या शेतात राबविण्यास मान्यता देण्यात आली होती. तसेच, इनलेट आऊटलेटसह शेततळे व इनलेट आउटलेट विरहित शेततळे यांचे आर्थिक मापदंड निश्चित करण्यात आलेले होते. तद्ननंतर संचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, कृषी आयुक्तालय, पुणे यांनी सादर केलेल्या इनलेट आउटलेट सह शेततळे खोदण्याबाबतचे आर्थिक मापदंड सुधारित करण्याच्या प्रस्तावास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली. सद्यस्थितीत केंद्रशासनाच्या दि.२३ मार्च, २०२० च्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र राज्यासाठी मजुरी दर रु.२३८/प्रतिदिन इतका करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेततळ्यांची कामे ६०:४० या अकुशल कुशल प्रमाणामध्ये मजूर व साहित्य द्वारे खोदण्यासाठी विविध आकारमानातील इनलेट आउटलेट सह व इनलेट आउटलेट विरहित शेततळ्याच्या सुधारित आर्थिक मापदंडाच्या प्रस्तावास मान्यता मिळण्याबाबत आयुक्त (कृषी) मृद, जलसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, कृषी आयुक्तालय, पुणे यांनी प्रस्ताव सादर केलेल्या प्रस्तावास मान्यता दिली आहे.
मनरेगा अंतर्गत शेततळे अनुदान योजना:
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेततळ्यांची कामे ६०:४० या अकुशल: कुशल प्रमाणामध्ये मजूर व साहित्याद्वारे खोदण्यासाठी विविध आकारमानातील इनलेट आउटलेट सह व इनलेट आउटलेट विरहित शेततळ्याच्या आयुक्त (कृषी), मृद, जलसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, कृषी आयुक्तालय, पुणे यांनी प्रस्तावित केलेल्या सुधारित आर्थिक मापदंडाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येत असून त्यानुसार शेततळ्याची कामे घेण्यात यावी. याबाबत इतर अटी व शर्ती या शासन निर्णय दि.२८ फेब्रुवारी, २०१४ प्रमाणे असतील. शासन निर्णय दि.२८ फेब्रुवारी २०१४ अन्वये विहीत केल्याप्रमाणे उपाय क्रमांक दोन ते सहा नुसार शेततळे खोदावयाचे असेल त्यावेळेस मंडळ कृषी अधिकारी यांनी शासन निर्णयातील परिशिष्ट-२ व कृषी सहायकाने परिशिष्ट-३ मध्ये दिलेल्या नमुन्यामध्ये, भूस्तराप्रमाणे इतक्या मीटर खोलीचे काम मजुरांमार्फत करण्यात आलेली असून त्यापुढील खोलीकरणाचे काम मजुरांमार्फत करणे शक्य नाही व त्यामुळे प्रत्यक्ष आढळणाऱ्या भुस्तरानुसार खोदकामासाठी योग्य असणाऱ्या साहित्याचा वापर करून उर्वरित खोदकाम करण्यात येणार असल्याबाबतचे संबंधित प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. विविध आकारमानातील इनलेट आउटलेट सह व इनलेट आउटलेट विरहित शेततळ्याचे उपाय क्रमांक एक ते सहा चे सुधारित आर्थिक मापदंड अनुक्रमे परिशिष्ट क्रमांक एक व परिशिष्ट क्रमांक दोन सोबत जोडण्यात आलेले आहेत. त्यास अनुसरून सदर कामे घेण्यात येणार.
कोणत्या प्रकारची शेततळी खोदण्यात येतात:
दोन प्रकारची – 1. इनलेट आउटलेट विरहीत 2. इनलेट आउटलेट सह.
शेततळी कशा पद्धतीने खोदावीत:
1. पुर्णपणे मजुरांद्वारे 2. किंवा काही खोली मजुरांद्वारे तर काही खोली मशीनद्वारे.
कोणत्या आकारमानाची शेततळी घेण्यात येतात:
1. 10 x 10 x 3 मी.
2. 15 x 10 x 3 मी.
3. 15 x 15 x 3 मी.
4. 20 x 15 x 3 मी.
5. 20 x 20 x 3 मी.
6. 25 x 20 x 3 मी.
7. 25 x 25 x 3 मी.
8. 30 x 25 x 3 मी.
9. 30 x 30 x 3 मी.
अनुदान किती आहे:
इनलेट आउटलेट सह शेततळे -पुर्णपणे मजुरांद्वारे (इतर क्षेत्र)
1. 10 x 10 x 3 मी.- रु. 27276/-
2. 15 x 10 x 3 मी.- रु. 41745/-
3. 15 x 15 x 3 मी.- रु. 72865/-
4. 20 x 15 x 3 मी.- रु. 101863/-
5. 20 x 20 x 3 मी.- रु. 143308/-
6. 25 x 20 x 3 मी.- रु. 184428/-
7. 25 x 25 x 3 मी.- रु. 237107/-
8. 30 x 25 x 3 मी.- रु. 289787/-
9. 30 x 30 x 3 मी.- रु. 355646/-
अर्ज कुठे करावा – ग्रामपंचायत मध्ये.
अधिक माहिती साठी शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
मनरेगा अंतर्गत शेततळे अनुदान योजना अर्ज नमुना PDF फाईल डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – सिंचन विहीर अनुदान योजना – मनरेगा अंतर्गत अर्ज सुरु
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
Google vr shettale 30x30x3 m price 355646 pn panchayat samiti madhe price 299807 ahe ase kaun please sanga