वृत्त विशेष

शासन व्यवहारासाठी व न्याय व्यवहारासाठी अतिशय उपयुक्त शब्द असलेले ‘शासन शब्दकोश भाग-1’ हे App गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध !

शासन व्यवहारासाठी व न्याय व्यवहारासाठी अतिशय उपयुक्त शब्द असलेले ‘शासन शब्दकोश भाग-1 (Shasan Shabdkosh)’ हे भ्रमणध्वनी उपयोजक गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या उपयोजकाची लिंक पुढीलप्रमाणे आहे.

शासन शब्दकोश – Shasan Shabdkosh App:

https://play.google.com/store/apps/details?id=gov.maharashtra.shabdkoshapp हे उपयोजक भ्रमणध्वनी स्थापित (Download) करता येणार आहे. भाषा संचालनालयाने ‘शासन शब्दकोश भाग-1 (Shasan Shabdkosh)’ हे भ्रमणध्वनी उपयोजक गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

शासन शब्दकोश भाग-1 (Shasan Shabdkosh) या भ्रमणध्वनी उपयोजकामध्ये कार्यदर्शिका, शासन वाक्ययोग, शासन व्यवहार कोश आणि न्याय व्यवहार कोश असे एकूण चार कोश डिजिटल स्वरुपात उपलब्ध आहेत. या चारही कोशांना इंग्रजी X मराठी तसेच मराठी X इंग्रजी या पद्धतीने पाहता येऊ शकते. हे भ्रमणध्वनी उपयोजक आंतरजालासह (With Internet) किंवा आंतरजालाशिवाय (Without Internet) वापरता येऊ शकते.

या अनुषंगाने सविस्तर माहितीसाठी किंवा येणाऱ्या अन्य तांत्रिक अडचणींबाबत भाषा संचालक, भाषा संचालनालय, प्रशासकीय इमारत, 5 वा मजला, डॉ.आंबेडकर उद्यानाजवळ, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई-400051. दूरध्वनी क्र.022-26417265 येथे संपर्क साधावा.

पुढील लेख देखील वाचा!

  1. मराठी भाषा धोरणास मंत्रिमंडळाची मंजूरी.
  2. आता सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत; दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापनांची पळवाट बंद.
  3. अर्जदारास माहितीच्या शुल्काची रक्कम अर्ज प्राप्त झाल्यानंतर 10 दिवसांत जलदगती कळविण्याबत शासन नियम

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.