वृत्त विशेषशालेय शिक्षण व क्रीडा विभागसरकारी योजनास्कॉलरशिप - शिष्यवृत्ती

राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रतीवर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. तसेच नजिकच्या काळात योजने अंतर्गत पालकांच्या कुटूंबाच्या उत्पन्न मर्यादेत तसेच जागांमध्ये वाढ झाल्यास त्यानुसार जाहिरातीमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे, सुधारणा करण्याचे व फेरअर्ज मागविण्याचे अधिकार शासन राखून ठेवीत आहे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता पात्र विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी (Shahu Maharaj Scholarship) अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरचा अर्ज पोस्टाने किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय, ३, चर्च रोड, पुणे-४११००१ येथे सादर करावा.

राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना – Chhatrapati Shahu Maharaj Scholarship:

अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे.

योजनेची व्याप्ती :-

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत QS World University Ranking २०० च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येईल.

शासनाने सर्व विभागाच्या परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या निकषामध्ये समानता आणण्या करीता सर्वकष धोरण ठरविले आहे. त्यामुळे नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार तयार केलेल्या सर्वकष नियमावलीचे सर्व विभागांनी पालन करणे अपेक्षित असल्याने नियोजन विभागाने घेतलेला शासन निर्णय अंतिम असेल.

नजिकच्या काळात जागांमध्ये वाढ झाल्यास त्यानुसार जाहिरातीमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे, सुधारणा करण्याचे व फेरअर्ज मागविण्याचे अधिकार शासन राखून ठेवीत आहे. तसेच सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षाकरिता पात्र विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पोर्टल सुरु झाल्यास त्याबाबत माहिती देण्यात येईल.

योजनेच्या अटी व शर्ती :-

१. विद्यार्थी अनूसूचित जाती व नवबौध्द समाजातील महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

२. विद्यार्थ्यांना परदेशातील अद्ययावत QS World University Ranking २०० च्या आत असलेल्या शैक्षणिक संस्था / विद्यापीठामध्ये प्रवेश मिळालेला असावा. तथापी The University of South Wales (UNSW Sydney), Australia हे विद्यापीठ सदरील लाभार्थीसाठी वगळण्यात येत आहे.

३. परदेशातील विद्यापीठ / शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पुर्णवेळ विद्यार्थी म्हणुन प्रवेशित असावा.

४. Executive पदव्युत्तर पदवी किंवा Executive पदवीत्तर पदवीका व अर्धवेळ अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.

५. प्रवेशित अभ्यासक्रमासाठी अर्ज करतांना नमुद केलेल्या विहीत कालावधीत अभ्यासक्रम पुर्ण करणे विद्यार्थ्यावर बंधनकारक असेल. अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी मुदतवाढ मान्य केली जाणार नाही.

६. विद्यार्थ्याने पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पीचएडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना, पीएचडीसाठी यापूर्वी इतर कोणत्याही राज्य शासनाची अथवा केंद्र शासनाची परदेशी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी. तसेच त्यांने अन्य प्रशासनिक विभागाच्या परदेशी शिष्यवृत्तीच्या योजनेसाठी अर्ज केलेला नसावा.

७. सदर योजनेचा लाभ एका कुटुंबातील एका विद्यार्थ्यांस फक्त एकदाच घेता येईल. एकाच कुटूंबातील एकापेक्षा जास्त मुलांना ही शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. सदरची शिष्यवृत्ती एकाच वेळेस मान्य करण्यात येईल. एकापेक्षा जास्त वेळेस विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार नाही.

वयोमर्यादा :-

जाहिरात प्रसिध्द झालेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेस पदव्युत्तर पदवीसाठी उमेदवारांचे वय ३५ वर्षा पेक्षा जास्त नसावे. तर पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा ४० वर्षापेक्षा जास्त नसावे. (दिनांक १ मे, २०२४ रोजीचे वय)

उत्पन्न:-

१. या योजनेतंर्गत लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या/कुटूंबाचे व विद्यार्थी नोकरी करीत असल्यास त्याचे स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गानी मिळणारे मागील आर्थिक वर्षातील वार्षिक उत्पन्न रु ८.०० लाखापेक्षा जास्त नसावे.

२. विद्यार्थी किंवा पालक किंवा दोन्ही नोकरीत अथवा कुटूंबातील इतर सदस्य नोकरी करीत असतील तर त्यांचे आयकर विवरणपत्र, फॉर्म नं. १६ व सक्षम प्राधिकारी (तहसिलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या) यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबांचे सर्व मार्गानी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

३. इतर विद्यार्थ्यांसाठी सक्षम प्राधिकारी (तहसिलदार कमी दर्जा नसलेल्या) यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबांचे सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

४. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. ८.०० लाखापेक्षा जास्त नसावे. (विवाहित महिला उमेदवारांनी पतीकडील कुटुंबाचे एकत्रीत वार्षीक उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे. जर विवाहित महिला उमेदवार विधवा, घटस्फोटीता असून वडीलांकडे वास्तव्यास असल्यास महिला उमेदवाराने वडीलांकडील कुटुंबाच्या उत्पन्नानुसार अर्ज केल्यास तसे कायदेशीर कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.)

शैक्षणिक अर्हता :-

१. परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवीका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ७५% गुणांसहित पदवी परिक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

२. पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान ७५% गुणांसहित पदव्युत्तर पदवी परिक्षा उतीर्ण केलेली असावी.

३. ही पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम त्याने अर्जाच्या दिनांकाला उतीर्ण केलेला असावा.

अभ्यासक्रमाचा कालावधी :-

१. पीएचडीसाठी ४ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो.

२. पदव्युत्तर पदवी २ वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो.

३. पदव्युत्तर पदवीका १ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असलेला प्रत्यक्ष कालावधी.

४. परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दोन वर्षे (दिनांकानुसार) कालावधीचाच MBA अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील. भारतीय आयुर्विज्ञान परीषदेच्या संकेतस्थळावरील MD व MS अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील.

एकाच कुटूंबातील कमाल पात्रता धारक :-

१. सदर योजनेचा लाभ एका कुटुंबातील एका विद्यार्थ्यांस फक्त एकदाच घेता येईल.

२. एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त मुलांना हि शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी तसे प्रतिज्ञापत्र करुन देणे बंधनकारक असेल.

३. सदरची शिष्यवृत्ती एकाच वेळेस मान्य करण्यात येईल. एकापेक्षा जास्त वेळेस विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार नाही.

अर्ज करण्यासाठी अनिवार्य अटी :-

१. नोकरीमध्ये असलेल्या उमेदवाराने तो जेथे नोकरी करतो त्या यंत्रणेचे (Organization/ Employer) ना हरकत प्रमाणपत्र दाखल करणे अनिवार्य आहे.

२. पात्र विद्यार्थ्याने Non Judicial Stamp Paper वर Public Notary समोर विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र लिहून देणे बंधनकारक असेल.

३. विद्यार्थ्याने २ जामीनदार देणे बंधनकारक असेल. प्रत्येक जामीनदाराने स्वतंत्र (Surety Bond) करुन देणे बंधनकारक असेल.

४. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे स्वास्थ चांगले असले पाहिजे. त्याकरिता त्याने नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहिल.

५. विद्यार्थी शिक्षणासाठी आवश्यक असलेला कालावधी किंवा शिक्षण त्यापुर्वी पुर्ण झाल्यास जो कालावधी लागेल या दोघांपैकी जो कमी आहे त्या कालावधी पुरतेच परदेशात राहण्याचे बंधपत्र Bond राज्य शासनास तसेच परदेशातील भारतीय दुतावासास लिहून द्यावे लागेल. या आवश्यक कालावधी पेक्षा जास्त कालावधी करीता परदेशात राहण्यास विद्यार्थ्यास परवानगी मिळणार नाही.

६. उमेदवारास/विद्यार्थ्यास शासनाने विहीत करुन दिलेलया नमुन्यात Record Release Consent Form हा अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यावर द्यावा लागेल.

७. परदेशी विद्यापीठामध्ये प्रवेश घेणेसाठी स्वतः प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी आवश्यक त्या सर्व पात्रता परिक्षा (उदा. GRE/TOFEL/IELTS इत्यादी) आवश्यक परिक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन असल्यास विद्यार्थ्यानी ते पूर्ण केले असले पाहिजे.

८. ज्या विद्यार्थ्यांना परदेशी शैक्षणिक संस्थांकडुन Unconditional offer Letter मिळालेले असेल त्यांनाच ही शिष्यवृत्ती अनुज्ञेय राहील. यासाठी conditional offer Letter गृहित धरले जाणार नाही. (QSWR २०० परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते. प्रत्येक विद्यापीठाचे आपआपले नियम आणि कायदे असतात. शिष्यवृत्तीसाठी प्राप्त अर्जाची छाननी करताना या विभागामार्फत केवळ विद्यापीठाने ऑफर लेटर बिनशर्त असल्याची खात्री करण्यात येत असून ऑफर लेटरमध्ये नमूद केलेल्या सविस्तर अटींशी त्याचा काहीही संबंध नसल्याने सदर अटींची पडताळणी करण्यात येत नाही. ऑफर लेटरमधील अटींबाबत विद्यापीठाशी संवाद साधणे आणि त्यांचे निराकरण/समाधान करणे ही संबंधीत विद्यार्थ्याची जबाबदारी आहे. ज्या विद्यापीठाच्या ऑफर लेटरमध्ये (Unconditional) शब्द नसेल अशा विद्यापीठाचे Unconditional offer असल्याचे पत्र/ईमेल पुरावा म्हणून सोबत जोडावा.

९. विवाहीत उमेदवाराची पत्नी/पती व मुले यांना परदेशामध्ये सोबत घेवून जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सहाय्य दिले जाणार नाही. त्यासाठी पासपोर्ट मिळविणे, व्हिसा मिळविणे आर्थिक तरतुद करणे, परदेशातील निवास व दैनंदिन खर्चाची व्यवस्था करणेही उमेदवाराची वैयक्तीक जबाबदारी असेल.

१०. नोकरी करणाऱ्या उमेदवाराने सर्व प्रशासकीय बाबी उदा. रजा, वेतन आणि इतर सेवेच्या बाबी या स्वतः प्रत्यक्षपणे निराकरीत करावयाच्या आहेत. याबाबत कोणत्याही प्रकारची सवलत शासनाकडुन मिळणार नाही.

११ (अ) अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये, परदेशामध्ये शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांस भारतामध्ये यावयाचे असल्यास त्यासाठी त्यांचे संबंधीत शैक्षणीक संस्था आणि संबंधीत समाज कल्याण आयुक्तालयाची पुर्वपरवानगी घेणे बंधनकारक असेल आणि याबाबतची माहिती संबंधीत विद्यार्थी भारतीय दुतावासास कळवतील.

(ब) जेवढया कालावधीमध्ये परदेशातील शैक्षणीक संस्थेमधून दुर असेल तेवढया कालावधीचा कोणताही खर्च त्यास अनुज्ञेय होणार नाही. तथापि, तो पुन्हा त्याच शैक्षणीक संस्थेस त्याच अभ्यासक्रमाचे पुढील शिक्षण पुर्ण करण्यासाठी हजर झालेल्या दिवसापासून त्यास देय लाभ अनुज्ञेय होतील.

(क) अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांने परत त्याच परदेशी शिक्षण संस्थेमध्ये हजर न होता शिक्षण अर्धवट सोडल्यास त्यास अदा करण्यात आलेले शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क, इतर शुल्क व निर्वाह भत्याची व्याजासह वसूली करण्यात येईल, याबाबतचे लेखी हमीपत्र विद्यार्थ्यांस द्यावे लागेल.

१२. पासपोर्ट, व्हिसा मिळविण्याची जबाबदारी विद्यार्थ्याची असेल.

१३. उमेदवारास/ विद्यार्थ्याना केवळ ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये, ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेला आहे व शिष्यवृत्ती मिळाली आहे त्याच कारणासाठी व्हिसा घेणे बंधनकारक राहील.

१४. निवड झालेल्या विद्यार्थ्यास मागणी केल्यानुसार आवश्यक ती कागदपत्रे सादर करणे व आवश्यक ते करारनामा देणे बंधनकारक असेल.

१५. निवड झालेल्या विद्यार्थ्यांस त्याच्या शैक्षणिक कालावधीमध्ये जास्तीची रक्कम अदा झाली असल्यास त्याची परतफेड करणे विद्यार्थ्यांवर बंधनकारक असेल. अथवा ती वसूल करणेबाबत प्रचलित कायदे व नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, याबाबतचे हमीपत्र देणे बंधनकारक असेल.

१६. सदर शिष्यवृत्तीबाबत महाराष्ट्र शासनाने सर्वंकष धोरणानुसार घेतलेला निर्णय अंतिम राहिल.

उमेदवार/विद्यार्थ्यास मिळणारे लाभ :-

परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आलेल्या विद्यार्थ्यास खालील लाभ देण्यात येतील.

१. परदेशातील शैक्षणिक संस्थेने पत्रामध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीपासून लागू केलेली शिक्षण फी, अभ्यासक्रमासाठी नजीकच्या मार्गानी इकॉनामी क्लास विमान प्रवास भाडे (परतीच्या प्रवासासह) निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा यावरील विद्यार्थ्याने प्रत्यक्ष केलेला खर्च विहित केलेल्या वित्तीय मर्यादेत मुळ शुल्क भरणा पावती, प्रवासाचे मुळ तिकीट, मुळ बोर्डिंग पास, परतीच्या प्रवासाचे तिकीट इत्यादी तपासून विद्यार्थ्याच्या बँक खात्यावर भारतीय रुपयामध्ये प्रतिपूर्ती केली जाईल.

२. सर्वसाधारण पदव्युत्तर पदवीसाठी २ वर्ष किवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल व पदव्युत्तर पदविकासाठी १ वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल त्या अभ्यासक्रमासाठी नजीकच्या मार्गाने इकॉनॉमी क्लास विमान भाडे परतीच्या भाड्यासह, शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा यासह एका विद्यार्थ्यामागे प्रतिवर्षी रु.३०.०० लाखाच्या मर्यादेत, तर पीएचडीसाठी ४ वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल त्यासाठी प्रतिविद्यार्थी प्रतिवर्षी रु.४०.०० लाखाच्या मर्यादेत शाखा/अभ्यासक्रम निहाय मार्गदर्शक तरतूदीनुसार परदेशी शिष्यवृत्ती अदा करण्यात येईल.

३. प्रवेश घेतलेल्या संबंधीत शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या अथवा भारत सरकारच्या DOPT विभागाने विदेशी शिष्यवृत्तीसाठी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे येणारा खर्च भारत सरकाच्या इंडियन ओव्हरसिज स्कॉलरशिप या योजने अंतर्गत देण्यात येत असलेल्या दरवर्षी यु.एस.ए. व इतर देशांसाठी (यु.के. वगळून) १५४०० यु.एस. डॉलर्स आणि यु.के. साठी ९९०० जीबीपी इतक्या रक्कमेच्या मर्यादेत निर्वाह भत्ता संबंधीत विद्यार्थ्याच्या परदेशातील वैयक्तिक खात्यामध्ये जमा केला जाईल. सदर निर्वाह भत्याची रक्कम ही उपरोक्त नमूद पदव्युत्तर पदवी/पदविका असलेल्या प्रतिवर्षी रु.३०.०० लाखाच्या व पीचएडी असलेल्या प्रतिवर्षी रु.४०.०० लाखाच्या मर्यादेमध्ये अंतर्भूत आहे.

४. विद्यार्थ्यास परदेशी शिक्षण संस्थेमार्फत किंवा इतर कोणत्याही यंत्रणेमार्फत मिळणारी शिष्यवृत्ती इतर कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ किंवा शिकविण्याबाबतचे मानधन किंवा फेलोशिप किंवा रिसर्च असोशिएट म्हणून मिळणारी ही रक्कम देय होणाऱ्या शिक्षण शुल्क वा एकूण देय रक्कमचे मधून कपात करण्यात येईल.

५. सुरुवातीस परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणे आणि विहित कालावधीत अभ्यासक्रमपूर्ण केल्यानंतर त्वरीत कालमर्यादेत भारतात परत येण्यासाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे नजिकच्या मार्गाने इकॉनॉमी क्लास विमानप्रवासभाडे देण्यात येईल. त्यासाठी विमान प्रवासाचे मुळ तिकीट, मुळ बोर्डिंग पास, परतीचे प्रवास भाडे मिळण्यासाठी अभ्यासक्रम विहित कालावधीत यशस्वीपणे पूर्ण केल्याच्या पुरावा इ. कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.

६. विद्यार्थ्यास परदेशात राहण्याच्या कालावधीसाठी विद्यापीठाने ठरवून दिल्यानुसार वैयक्तिक आरोग्य विमा काढणे अनिवार्य राहील. यासाठीचा संबंधीत विद्यापीठाचा निकषानुसार किमान खर्च समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांचेकडून अनुज्ञेय राहील.

७. वरिलप्रमाणे शिक्षण शुल्क, निर्वाहभत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा आणि विमान प्रवास इ. यासाठी निर्धारित केलेल्या एकूण दरापेक्षा होणारा जास्तीचा खर्च विद्यार्थी/उमेदवारास स्वतः सोसावा लागेल व अशा प्रकारचे हमीपत्र विद्यार्थ्यास व पालकास द्यावे लागेल.

८. खालील बाबींवरील खर्च अनुज्ञेय राहणार नाही :

  • व्हिसा अर्जावरील खर्च
  • विद्यार्थ्यांच्या कुटूंबातील सदस्यांचा प्रवास व इतर खर्च.
  • नियमित शिक्षणाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर कोणत्याही अभ्यासक्रम अथवा प्रशिक्षावरील खर्च
  • भाषा प्रशिक्षणावरील खर्च
  • नियमित अभ्यासक्रमाच्या कालावधीत अतिरिक्त प्रवासाचा खर्च
  • संशोधन, पुरक शैक्षणिक साहित्य, क्षेत्र भेटी, कार्यशाळा/सेमिनार, आंतरवसियता यामधील सहभागाचा खर्च
  • संगणक व तत्सम शैक्षणिक साहित्य.

९. विद्यार्थ्यास वरिल लाभ मिळण्यासाठी परदेशातील प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाचे प्रत्येक वेळी उत्तीर्ण होणे बंधनकारक असून, तसे शैक्षणिक संस्था/विद्यापीठाचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, प्रगती अहवाल प्रत्येक सत्रासाठी किंवा सहा महिन्यासाठी तातडीने सादर करणे अनिवार्य आहे.

१०. प्रवेशित विद्यार्थ्याने प्रत्येक सहा महिन्याच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र, खर्चाच्या पावत्या इ. विद्यापीठ / शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाकडून प्रमाणित करुन सादर करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय पुढील हप्ता मंजूर होणार नाही.

११. अपवादात्मक प्रसंगी, निवड समितीमार्फतची निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी/पालकांनी, परदेशी शिक्षण संस्था/विद्यापीठ, शिक्षण फी/इतर अनुज्ञेय फी स्वतः भरलेली असेल, अशा वेळी आवश्यक त्या पावत्या व पुरावे सादर केल्यानंतर, अशी रक्कम विद्यार्थ्यास देय होणाऱ्या शिष्यवृत्ती मधून विद्यार्थ्याच्या परदेशातील खात्यावर जमा करणेसाठी आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

१२. विद्यार्थ्याने भारतात राष्ट्रीयकृत बँकेत व परदेशात अधिकृत बँकेत खाते उघडणे अनिवार्य आहे. त्याच खात्यावर त्यांना देय होणारी शिष्यवृत्ती CMP किंवा RTGS किंवा SWIFT ने अदा केली जाईल. विद्यार्थी व विद्यापीठाच्या परदेशातील बँक खात्याचा तपशिल त्यांने परदेशात जाऊन प्रवेश घेतल्यानंतर तात्काळ आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांना सादर करावा.

१३. परदेशी शिक्षण संस्था/विद्यापीठाने ऑफर लेटर मध्ये संपूर्ण अभ्यासक्रम कालावधीच्या निर्धारित केलेल्या फी च्या मर्यादेतच लाभ संबंधीत विद्यार्थ्यास अनुज्ञेय होतील. भविष्यात त्यामध्ये वाढ झाल्यास परदेशातील भारतीय उच्चायुक्तालयाच्या शिफारशीनंतरच ही वाढ संबंधीत विद्यार्थ्यास अनुज्ञेय राहील.

अर्ज करण्याची पध्दत :-

सदर शिष्यवृत्तीसाठी प्रत्येक वर्षी एप्रिल/मे महिन्यात मा.आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांनी प्राधिकृत केलेल्या यंत्रणेमार्फत वृत्तपत्रात तसेच शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करतील. तथापि, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता सदर प्रवेश प्रक्रियेबाबतची कार्यवाही सुरु करण्याबाबत निवड समिती निर्णय घेईल.

१. या योजनेसाठी जाहिरात देणे, ऑनलाईन अॅप्लीकेशन तयार करणे, कंत्राटी तत्वावर आवश्यक त्या नियुक्त्या या आयुक्तालयामार्फत करण्यात येतील. तथापि, आवश्यक तेथे शासनाच्या पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. या व इतर बाबींवरील होणारा खर्च आयुक्तालयाकडून अर्थसंकल्पीय मंजूर अनुदानातून करण्यात येईल.

२. सदरची योजना शासनाचे सर्वंकष धोरण व शासन निर्णयातील नियमावली, अटी व शर्तीनुसार राबविण्यासाठी आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे या प्राधिकृत करण्यात येत असून त्यांच्या मार्फत राबविण्यात येईल.

३. सदर जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून एक महिन्याच्या आत अथवा शासन निर्धारित करेल इतक्या कालावधीत विद्यार्थ्यांनी विहित नमून्यातील परिपूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह ऑफलाईन सादर करावेत. ऑनलाईन पोर्टल सुरु झाल्यास त्याबाबत माहिती देण्यात येईल. अभ्यासक्रमनिहाय असलेल्या क्षमतेच्या अधिन राहून, निवड समितीने निश्चित केलेली पात्र विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादी साधारणतः दि.१ जूलै पूर्वी अथवा निवड समितीच्या निर्णयानंतर शासन जाहिर करेल.

४. शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे हे संबंधीत विद्यार्थ्यांना कळवून त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती मागविण्यात येईल. तसेच या विद्यार्थ्याची गृहचौकशी करण्यात येईल.

५. प्रत्येक सहा महिन्याने विद्यार्थ्यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीचे (शिक्षण फी, परिक्षा फी, निर्वाह भत्ता इ.चे) उपयोगिता प्रमाणपत्र, गुणपत्रक आणि प्रगती अहवाल आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांना सादर केल्यानंतर समाधानकारक असल्यास पुढील ६ महिन्याची शिष्यवृत्ती अदा करण्यात येईल. प्रत्येक ६ महिन्याला विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती अहवाल व उपयोगिता प्रमाणपत्र / खर्चाचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय संबंधीत विद्यार्थ्यास पुढील शिष्यवृत्ती अनुज्ञेय होणार नाही.

सदर अर्जासोबत विद्यार्थ्याने खालील कागदपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
  • विहित नमून्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज,
  • सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला उत्पनाचा दाखला. (मागील २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा कुटूंबाचा)
  • पदवी/पदव्युत्तर पदवी परिक्षा उतीर्ण झाल्याचे पुरावे. (दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर
  • पदवी/पदविका यांच्या गुणपत्रांसह) (सनद/मार्कलिस्ट)
  • परदेशातील QS World Ranking २०० च्या आत असलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळाल्याबाबतचे विनाअट (Unconditional) ऑफर लेटर.
  • ज्या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला आहे त्याचे सविस्तर माहिती पत्रकाची (Prospectus) प्रत.
  • आवश्यक ते करारनामे व हमीपत्रे
  • दोन भारतीय नागरीकांचे जामीनपत्र.
  • संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी वर्षनिहाय आवश्यक असणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक, ज्यामध्ये शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क, इतर शुल्क पाठ्यपुस्तके, स्टेशनरी, भोजन व राहण्याचा खर्च, येण्याजाण्याचा विमान प्रवास याचा समावेश असावा.
  • विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत.
  • पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी अद्ययावत QS World Ranking ची जागतिक क्रमवारी. (सोबत प्रत संलग्न)
  • वेळोवेळी समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांनी ठरवून दिलेल्या बंधपत्र/विविध दाखले तसेच अन्य कागदपत्रे सादर करणे लाभार्थ्यावर बंधनकारक राहील.

इतर आवश्यक बाबी :-

१. अपूर्ण भरलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

२. अर्जासोबत आवश्यक असलेली स्वसाक्षांकित कागदपत्रे न जोडल्यास अर्ज विचारात घेतला जाणार नाही. अर्जावर स्वसाक्षांकित फोटो नसलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

३. विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

४. अनुसूचित जाती, नवबौध्द यांच्या व्यतिरिक्त इतर प्रवर्गाचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. त्यांनी संबंधीत कार्यालयाकडे परस्पर अर्ज करावेत.

५. QS World University Ranking २०० च्या आतील विद्यापीठाशिवाय इतर परदेशी शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

६. प्रचलित अटी व शर्तीनुसार अपात्र ठरल्यास त्यांना स्वतंत्र पत्रव्यवहार करुन कळविले जाणार नाही.

७. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी अर्जामध्ये दिलेल्या अधिकृत पत्यावर कळविले जाईल. जर विहीत कालावधीत त्यांनी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण न केल्यास त्याची शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल.

८. परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्याचे अंतिम अधिकार शासनास असतील.

९. शासनाने सर्व विभागाच्या परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या निकषामध्ये समानता आणण्या करीता सर्वकष धोरण ठरविले आहे. त्यामुळे नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार तयार केलेल्या सर्वकष नियमावलीचे सर्व विभागांनी पालन करणे अपेक्षित असल्याने नियोजन विभागाने घेतलेला शासन निर्णय अंतिम असेल. त्यानुषंगाने नमूद करण्यात येते की, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (बांधकामे) कार्यासनामार्फत दि.३०.१०.२०२३ रोजी या संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्या संदर्भात दि.९.११.२०२३ रोजी शासन शुध्दीपत्रक निर्गमित केलेले आहे. त्यानुसार नियोजन विभागाच्या शासन निर्णय क्र. सारथी २०२२/प्र.क्र.२८९/का.१४२५-अ दि.२०.७.२०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार तयार केलेल्या सर्वंकष नियमावलीचे सर्व विभागांनी प्रमाण मानावे. सदर योजनेअंतर्गत लाभ घेवू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यास पुढील सत्राचा लाभ मिळण्यासाठी परदेशातील प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक वेळी उत्तीर्ण होणे बंधनकारक असून त्यासाठी शैक्षणीक संस्था/विद्यापीठाचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, प्रगती अहवाल प्रत्येक सत्रासाठी किंवा सहा महिन्यासाठी सादर करणे अनिवार्य आहे.

राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना PDF फाईल:

अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजना सन 2024-25 सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना – Kranti Jyoti Savitribai Phule Financial Assistance Scheme

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.