वृत्त विशेष

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएचडीसंबंधी सर्व माहिती एका क्लिकवर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच.डी. संबंधीची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सुलभतेसाठी ‘पीएचडी अ‍ॅडमिशन अ‍ॅण्ड ट्रॅकिंग पोर्टल’चे अनावरण कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएचडीसंबंधी सर्व माहिती एका क्लिकवर!

पीएच.डी. करू इच्छिणारे तसेच सध्या पीएच.डी.ला प्रवेश घेत संशोधन करीत असलेल्या विद्यार्थ्यांना एका क्लिकवर पीएच.डी. संदर्भात सर्व माहिती मिळणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सुलभतेसाठी ‘पीएचडी अॅडमिशन अॅण्ड ट्रॅकिंग पोर्टल’ सुरू केले आहे. पीएच.डी. प्रवेश तसेच त्यासंदर्भात इतर माहिती घेणे, कागदपत्रे सादर करणे यासाठी विद्यापीठात तसेच संलग्न पीएच.डी. संशोधन केंद्रात विद्यार्थ्यांना अनेकदा जावे लागते.

Savitribai Phule PHD Portal:

पीएच.डी. प्रक्रियेतील लालफितीच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांचा संशोधनापेक्षा कागदपत्रांच्या पूर्ततेत जास्त वेळ जात होता. या पोर्टलमुळे पीएच.डी.चा अर्ज करण्यापासून ते ती घोषित होण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया या संकेतस्थळाद्वारे पूर्ण होणार आहे.

विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविणे, शंकाचे निरसन करण्यासाठी विद्यापीठाने सुरू केलेल्या पीएच.डी. पोर्टलमुळे मदत होणार आहे. पोर्टलवर पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा, प्रवेश, अभ्यासक्रम, पात्रता आणि शुल्क यासंदर्भात सर्व माहिती उपलब्ध आहे.

विद्यार्थी करीत असलेल्या पीएच.डी.ची सद्य:स्थिती तपासता येणार आहे. त्यामध्ये पूर्वपरीक्षा, प्रवेश, अपलोड केलेली कागदपत्रे, थिसीस, शिष्यवृत्ती ही सर्व माहितीही ट्रॅक करता येणार आहे. सर्व प्रक्रिया एकाच पोर्टलवर करता येईल.

गाईड, रिसर्च सेंटर्सची माहिती एकाच ठिकाणी

१. पीएच.डी. पोर्टलवर तुम्हाला तुमच्या विषयासाठी उपलब्ध असलेल्या गाईड, रिसर्च सेंटरची सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

२. या पोर्टलचे वैशिष्ट्य म्हणजे पोर्टल वापरण्यासाठी कुठलेही रजिस्ट्रेशन किवा लॉग इन करण्याची गरज नाही. या पोर्टलमुळे विद्यार्थ्यांचा पीएच. डी.चा प्रवास अधिक सोपा होणार आहे.

३. तुमचा पीएचडीचा प्रवास म्हणजेच पूर्वपरिक्षा, प्रवेश, अपलोड केलेले कागदपत्र, तुमचे प्रबंध, शिष्यवृत्ती ही सर्व माहिती ट्रॅक करता येणार आहे. पोर्टलचे वैशिष्ट्य म्हणजे पोर्टल वापरण्यासाठी कुठलीही रजिस्ट्रेशन किंवा लॉग इन करण्याची गरज नाही. या पोर्टलमुळे विद्यार्थ्यांचा पीएचडीचा प्रवास अधिक सोपा होणार आहे.

पोर्टलची लिंक : https://bcud.unipune.ac.in/Phd/Ph.D_Addmission/index.html या लिंकवरून आपण सगळी माहिती घेऊ शकतो.

हेही वाचा – विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना – Gyanjyoti Savitribai Phule Aadhaar Scheme

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.