मंत्रालयीन लिपिक-टंकलेखक संवर्गास दरमहा ठोक भत्ता मंजूर
मंत्रालयीन लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या कामकाजाचे विशिष्ट स्वरुप व त्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या मागण्या लक्षात घेता मंत्रालयीन लिपिक-टंकलेखक संवर्गास दरमहा ठोक भत्ता (Thok Allowance) मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
मंत्रालयीन लिपिक- टंकलेखक संवर्गास दरमहा ठोक भत्ता – Thok Allowance:
मंत्रालय हे राज्याच्या प्रशासकीय मुख्यालयाचे ठिकाण असून, येथे राज्याचा प्रशासकीय कारभार तसेच धोरणे ठरविली जातात. त्यामुळे मंत्रालयीन कामकाजाचे विशिष्ट स्वरुप लक्षात घेता शासन आता असे आदेश देत आहे की, मंत्रालयीन सर्व प्रशासकीय विभागातील (मंत्रालय खुद्द) लिपिक-टंकलेखक संवर्गास दरमहा रु. ५०००/- (रुपये पाच हजार फक्त) इतक्या रक्कमेच्या ठोक (Thok Allowance) भत्त्याचे प्रदान खालील अटींच्या अधीन राहून मंजूर करण्यात येत आहे:-
१) मंत्रालयातील लिपिक-टंकलेखक हे संवर्गबाह्य बदलीने/ प्रतिनियुक्तीने अथवा कायमस्वरुपी नियुक्तीने इतर क्षेत्रिय कार्यालयात/ जिल्ह्यात / विभागात गेल्यास त्यांना सदर दरमहा ठोक (Thok Allowance) भत्ता अनुज्ञेय होणार नाही.
२) लिपिक-टंकलेखकास सहायक कक्ष अधिकारी पदावर स्थानिक/ नियमित पदोन्नती मिळाल्यास त्यानंतर लगतच्या महिन्यापासून सदर ठोक भत्ता अनुज्ञेय होणार नाही.
३) लिपिक-टंकलेखकाच्या रजा खाती देय व अनुज्ञेय रजा शिल्लक असल्यास संबंधित रजा कालावधीसाठी त्याला सदर ठोक (Thok Allowance) भत्ता अनुज्ञेय राहील.
४) एका कॅलेंडर महिन्यात १५ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी असाधारण रजा असल्यास त्या महिन्यात लिपिक- टंकलेखकास सदर ठोक (Thok Allowance) भत्ता अनुज्ञेय होणार नाही.
५) निलंबन कालावधीसाठी सदर ठोक भत्ता अनुज्ञेय होणार नाही. तथापि, भविष्यात निलंबन कालावधी नियमित केल्यास सदर ठोक भत्ता संबंधितास अनुज्ञेय होईल. (निलंबन कालावधी १५ दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठीही असल्यास व सदर निलंबन कालावधी नियमित न झाल्यास, संबंधितांस सदर ठोक (Thok Allowance) भत्ता पूर्ण महिन्यासाठी अनुज्ञेय होणार नाही)
६) लिपिक-टंकलेखक हा विभागीय सहायक कक्ष अधिकारी परीक्षा उत्तीर्ण होऊन, त्याची सहायक कक्ष अधिकारी पदावर नियुक्ती झाल्याच्या लगतच्या महिन्यापासून त्याला सदर ठोक (Thok Allowance) भत्ता अनुज्ञेय होणार नाही.
७) लिपिक-टंकलेखक संवर्गात सेवेत लागल्यापासून ज्या दिनांकास सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या तीन लाभाच्या योजनेनुसार १० वर्षाची नियमित सेवा पूर्ण होईल (वरिष्ठ वेतनश्रेणी लागू होईल) त्यानंतर लगतच्या महिन्यापासून सदर ठोक (Thok Allowance) भत्ता अनुज्ञेय होणार नाही.
८) उपरोक्त अ.क्र.४ व ७ प्रकरणी संबंधित कार्यालयीन आदेश पारित झाल्यानंतर लिपिक-टंकलेखकास ठोक (Thok Allowance) भत्त्याचे अतिरिक्त प्रदान झाल्यास, त्याची वसूली करण्यात येईल.
सदर आदेश हा, शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या महिन्यापासून लागू करण्यात येत आहे.
वित्त विभाग शासन निर्णय :
मंत्रालयीन लिपिक- टंकलेखक संवर्गास दरमहा ठोक भत्ता अनुज्ञेय करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!