राज्यातील साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस परवानगी !
उसाचा रस, बी-हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल तयार करण्यास केंद्र सरकारने (Sakhar Karkhanyana ethanol Nirmitis Parvangi) परवानगी दिल्याने राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.
साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस परवानगी – Sakhar Karkhanyana ethanol Nirmitis Parvangi:
गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने इथेनॉल (Ethanol Production) निर्मितीवर निर्बंध आणले होते. हे निर्बंध हटवावेत आणि साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी (Sakhar Karkhanyana ethanol Nirmitis Parvangi) द्यावी यासंदर्भात वेळोवेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता.
राज्य शासनाने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून केंद्र शासनाने इथेनॅाल निर्मितीवर घातलेले निर्बंध २०२४-२५ गाळप हंगामात उठवले आहेत. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे साखर कारखाने व डिस्टिलरीजना मोठा दिलासा मिळाला आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
केंद्र शासनाने आज घेतलेल्या निर्णयामुळे आता नव्या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरीजना उसाचा रस, सिरप, बी हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल निर्मिती करता येणार आहे.
1 नोव्हेंबरपासून निर्णय होणार लागू!
केंद्र सरकारच्यावतीनं 29 ऑगस्टला एक नोटिफिकेशन काढून उसापासून इथेनॉल (Ethanol Production) बनवण्यावरील बंदी पूर्णपणे हटवली आहे. मात्र हा निर्णय 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. केंद्रानं गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात इथेनॉलवर बंदी घातली होती. त्या निर्णयानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाले होते. त्यानंतर साखर कारखान्यांना विशिष्ट मर्यादेपर्यंत इथेनॉल निर्मितीला परवानगी देण्यात आलेली होती.
सरकारचा देशात इथेनॉलच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. भारत सरकारनं इंधनात इथेनॉल (Ethanol) मिसळण्यासाठी धोरण ठरवलेलं आहे. त्यानुसार पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळलं जाते. पुढील काळात ते डिझेलमध्ये देखील मिसळलं जाईल. इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० : राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!