आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी योजना

कल्याणकारी निधीमधून युध्दविधवा/विधवा/माजी सैनिक/अवलंबित यांना आर्थिक मदतीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु !

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा या सर्वांनी यापूर्वी महापोर्टलवर रजिस्ट्रेशन केले नसेल तर त्यांनी संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करून घेणे अनिवार्य आहे. तसेच रजिस्ट्रेशन केल्याशिवाय ओळखपत्र, पाल्यांच्या स्कॉलरशिप अथवा कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीची प्रकरणे स्वीकारले जाणार नाही.

माजी सैनिक आर्थिक मदतीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु ! Sainik Financial Assistance:

कल्याणकारी निधीमधून युध्दविधवा/विधवा/माजी सैनिक/अवलंबित यांना आर्थिक मदतीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.

https://mahasainik.maharashtra.gov.in/http://www.ksb.gov.in/

महापोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:
  1. ओळखपत्र,2. डिस्चार्ज बुक, 3. आधार कार्ड, 4. पी.पी.ओ. (PPO), 5. पॅन कार्ड, 6. पासपोर्ट साईज फोटो, 7. पेन्शन बँक पासबुक, 8. ई.सी. एच. एस. कार्ड, 9. ई-मेल आयडी
  2. दूरध्वनी क्रमांक
कल्याणकारी निधीमधून युध्दविधवा/विधवा/माजी सैनिक/अवलंबित यांना देण्यात येत असलेली आर्थिक मदत:
अ.क्र.क.नि. पुस्तक पृष्ठ क्र.क. नि. नियम परिच्छेद क्र.योजना/आर्थिक मदतीची बाबआर्थिक मदत
१०चरितार्थासाठी आर्थिक मदत विधवा व ६५ वर्षावरील माजी सैनिक व अनाथ पाल्य यांना कोणतेही निवृत्तीवेतन विषयक लाभकिंवा अन्य कोणतेही उत्पन्न मिळत नसल्यास चरितार्थासाठी आर्थिक मदत (अन्य मार्गाने मिळणारे उत्पन्न रुपये ५,०००/- पेक्षा कमी असल्यास)रु. ५,०००/-दरमहा एक वर्षासाठी
११चरितार्थासाठी आर्थिक मदत माजी सैनिक दिवंगत झाल्यानंतर कुटुंबनिवृत्ती वेतन सुरु होईपर्यंत (Dispute case-विवादित प्रकरणांसाठी सदर मदत लागू राहणार नाही)रु. ५,०००/-दरमहा एक वर्षासाठी
१४सेवारत सैनिकांना मृत्यू (Physical Casualty) अथवा अपंगत्व आल्यास
१. मृत्यु पावल्यासरु. ३,००,०००/- एकरकमी (पत्नीस ६०% व आई वडिलांना ४०%)
२. (१अ), अपंगत्व २० ते ५०% (Attributable to Mil Services only)रु. ५०,०००/-एकरकमी
२. (१ब). अपंगत्व ५१% व त्यापेक्षा जास्त (Attibutable to Mil Services Only)रु, १,००,०००/-एकरकमी
१५मुलीच्या विवाहाकरीता आर्थिक मदत
१. माजी सैनिकांच्या एका मुलीलारु. २०,०००/-एकरकमी
२. ५० टक्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या माजी सैनिकांच्या दोन मुलींना प्रत्येकीरु. २५,०००/-एकरकमी
३. विधवेच्या दोन मुलीना प्रत्येकीरु. ४०,०००/-एकरकमी
४. युध्दविधवेच्या सर्व मुलीना प्रत्येकी
५. माजी सैनिक व विधवेच्या मृत्यु पश्चात त्यांच्या सर्व अविवाहीत अनाथ मुलींना प्रत्येकी
२३१९माजी सैनिकांच्या मतिमंद /अपंग पाल्यांना आर्थिक मदत
१. औषधोपचार (वर्षातून एकदा वित्तीय वर्ष संपल्यानंतर देय)रु. २४,०००/-एकरकमी वर्षातून एकदा
२. शाळेत जाणा-या मुलांसाठी (वर्षातून एकदा वित्तीय वर्ष संपल्यानंतर देय)
३. कौशल्य वाढविण्याच्या प्रशिक्षणासाठी
२७२० उपॅराप्लेजीक सेंटर, खडकी, पुणे येथील महाराष्ट्राचे अधिवास असलेले अपंग माजी सैनिकांना आर्थिक मदतरु. ५,०००/-दरमहा
२८२१युध्द विधवांना / सैन्यसेवेत सेवारत असताना युध्दजन्य परिस्थिती व्यतिरिक्त (PC) कारणांनी मृत्यु पावलेल्या सैनिकांच्या विधवांना घरकुलासाठी व सदनिका खरेदीसाठी आर्थिक मदतरु. २,००,०००/-एकरकमी
३०२२माजी सैनिक/ विधवा यांना घरबांधणीसाठी / सदनिका खरेदीरु. १,००,०००/-एकरकमी
३३२५ अजाहिरात व प्रकाशन/फॉर्म छपाई (जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयासाठी)शासकिय निधीमध्ये अनुदान उपलब्ध नसल्यास रु. २५,०००/-
१०३५२६शैक्षणिक आर्थिक मदत
शालेय/उच्च माध्यमिक शिक्षणासाठी (इ.१ली ते १२वी) (शासन मान्य विना अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या पाल्यांसाठी शैक्षणिक शुल्क, पुस्तके, वह्या व गणवेश इत्यादि करीता)शैक्षणिक शुल्का (Tution Fee) इतके किंवा जास्तीत जास्त रु. ८,०००/- वर्षातून एकदा (फक्त जे.सी.ओ. आणि अधिकारी मेजर व तत्सम हुद्यापर्यंत)
११३५२७महाविद्यालयीन शिक्षण (इयत्ता १२ वी नंतरचे) (BA, B.Com, B.Sc, MA, M.Com & M.Sc.) २. शासनमान्य विनाअनुदानित महाविद्यालयातील सर्व शांखामध्ये शिक्षण घेणा-या माजी सैनिकांच्या पाल्यांसाठीशैक्षणिक शुल्का (Tution Fee) इतके किंवा जास्तीत जास्त रु. १५,०००/- वर्षातून एकदा
१२३६ व. ३७२८अ /२९अव्यावसायिक अभ्यासक्रम (विनाअनुदानित/अनुदानित/शासनमान्य) राज्यात/परराज्यात. MBBS, BDS, MD, BAMS व BHMS तसेच (UGC,MCL, CCIM, CCH,DCI.PCI, PMC, INC व पंतप्रधान शिष्यवृत्ती अंतर्गत येणाऱ्या मान्यताप्राप्त सर्व समकक्ष अभ्यासक्रमासाठी)रु. ७५,०००/-वर्षातून एकदा
२८ब/२९बव्यावसायिक अभ्यासक्रम (विनाअनुदानित/अनुदानित / शासनमान्य) राज्यात्/परराज्यात व्यावसायीक महाविद्यालयात इंजिनियरिंग, मेडिकल व बिजनेस मॅनेजमेंट इ. व्यावसायीक अभ्यासक्रम शिकणाऱ्या माजी सैनिकांच्या पाल्यांना पदवी/पदवीत्पुर अभ्यासक्रमासाठी (AICTE, UGC, MCI व पंतप्रधान शिष्यवृत्ती अंतर्गत येणाऱ्या मान्यताप्राप्त सर्व समकक्ष अभ्यासक्रमासाठी)शैक्षणिक शुल्का (Tution Fee) इतके किंवा जास्तीत जास्त रु. ४०,०००/-वर्षातून एकदा
२८क /२९कव्यावसायिक अभ्यासक्रम (विनाअनुदानित/अनुदानित/शासनमान्य) राज्यात/परराज्यात BCA, BBA, B.Ed, B.P.Ed, B.Sc (Agri) आणि B.Sc(Cmptr Sc), Law, इ. व तत्सम अभ्यासक्रम शिकणाऱ्या माजी सैनिकांच्या पाल्यांना पदवी अभ्यासक्रमासाठी (AICTE, UGC, MCI व पंतप्रधान शिष्यवृत्ती अंतर्गत येणाऱ्या मान्यताप्राप्त सर्व समकक्ष अभ्यासक्रमासाठी)शैक्षणिक शुल्का (Tution Fee) इतके किंवा जास्तीत जास्त रु. २०,०००/-वर्षातून एकदा
२८ड/२९डव्यावसायिक अभ्यासक्रम (विनाअनुदानित/अनुदानित/शासनमान्य) राज्यात/परराज्यात व्यावसायीक महाविद्यालयात इंजिनियरिंग, मेडिकल व बिजनेस मॅनेजमेंट इ. व्यावसायिक पदविका (Diploma/PGDM/PGDBA) व (AICTE,UGC.NCTE,RCI, BCI,PCI,DCOI,VC I.CCH,ICAR) व पंतप्रधान शिष्यवृत्ती अंतर्गत येणाऱ्या मान्यताप्राप्त सर्व समकक्ष अभ्यासक्रमासाठीशैक्षणिक शुल्का (Tution Fee) इतके किंवा जास्तीत जास्त रु. २०,०००/-वर्षातून एकदा
२८इ/२९इव्यावसायिक अभ्यासक्रम (विनाअनुदानित/अनुदानित/शासनमान्य) राज्यात/परराज्यात व्यावसायीक महाविद्यालयात D.Ed/D.T.Ed (UGC, NCTE, RCI) व पंतप्रधान शिष्यवृत्ती अंतर्गत येणाऱ्या मान्यताप्राप्त सर्व समकक्ष अभ्यासक्रमासाठीशैक्षणिक शुल्का (Tution Fee) इतके किंवा जास्तीत जास्त रु. १२,०००/- वर्षातून एकदा (सदर योजना माजी सैनिकांसाठी सुद्धा कौशल्य विकास वाढविण्यासाठी लागू राहील)
१३३९३०परदेशात शिक्षण घेणा-या माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक मदतरु. १,००,०००/- एकरकमी वर्षातून एकदा (कोर्सचा कालावधी असेल तेवढी वर्ष किंवा जास्तीत जास्त प्रथम तीन वर्षांसाठी)
१४४१३२ (३)खाजगी संस्थेमध्ये स्पर्धात्मक परिक्षांची तयारी करुन घेण्यासाठी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेतलेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना व माजी सैनिकांना (MPSC, UPSC, Banking, SSB व तत्सम)प्रशिक्षणासाठी येणा-या शैक्षणिक शुल्काच्या ५०% अथवा जास्तीत जास्त रु. ५०,०००/- पर्यंत (पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक व अनुदान कोणत्याही एका कोर्स साठी फक्त एकदाच अनुज्ञेय राहील)
१५४२३२ (५)ग्रामसेवक/शिक्षण सेवक/कृषी सेवक पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षण घेणा-या माजी सैनिक/विधवांना शैक्षणिक खर्चाची प्रतिपूर्ती (आरोग्य सेवक / सेविका आणि इतर सरकारी नोकरी प्राप्त करण्यासाठी अर्हता प्रशिक्षण)प्रशिक्षणासाठी येणा-या शैक्षणिक शुल्काच्या ५०% अथवा जास्तीत जास्त रु. २०,०००/- पर्यंत (परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक व सदर अनुदान कोणत्याहो एका कोर्स साठी फक्त एकदाच अनुज्ञेय राहील)
१६४३३२ (६)PRTC, सातारा / बुलढाणा व MSTC कोल्हापूर येथे प्रशिक्षण घेणा-या माजी सैनिक पाल्यांनाआकारण्यात येणा-या शुल्काइतके किंवा जास्तीत जास्त रु. १०,०००/- (माजी सैनिकाचे पाल्याने सैन्य भरती call letter सादर केल्यानंतर प्रोत्साहन म्हणून)
१७४४३३ (२)महाराष्ट्रातील शासनमान्य इतर सैनिक शाळारु. २०,०००/-वर्षातून एकदा
१८५०३४ (३)शासनमान्य खाजगी अभ्यासक्रमासाठी माजी सैनिक/पत्नी/ विधवा/ पाल्य यांना आर्थिक मदतरु. १०,०००/-पर्यंत
१९५१३५संगणक प्रशिक्षणरु. १०,०००/-पर्यंत
२०५३३७ (१)शालांत परीक्षा (१० वी) किमान ६०% गुणांनी उत्तीर्ण पाल्यांनारु. १०,०००/-एकरकमी एकदाच (११ वी व १२ वी साठी)
५३३७ (२)१० वी व १२ वी मध्ये ६०% गुणांनी उत्तीर्ण होऊन अभियांत्रिकी व तत्सम पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणा-या सर्व पाल्यांनारु. १५,०००/-एकरकमी एकदाच
२१५४३७(२) (अ, ब क)१२ वी च्या परिक्षेमध्ये ६०% गुणांनी उत्तीर्ण होऊन वैद्यकीय/अभियांत्रिकी/ आयुर्वेदिक शाखांमधील पदवीसाठी पुढील शिक्षण घेणाऱ्या सर्व पाल्यांनारु. ३०,०००/-एकरकमी एकदाच
५४३७(ड.इ, ई, ऊ.ए)कला/वाणिज्य/विज्ञान/अध्यापक विद्यालय/अध्यापक महाविद्यालय/विधी/ पदविका व इतर तांत्रीक शैक्षणिक तसेच १० वी नंतर अभियांत्रीकी व तत्सम पदविका अभ्यासक्रम सर्व पाल्यांनारु. १५,०००/-एकरकमी एकदाच
५४३७ (४)पदवी परीक्षेमध्ये ६० % गुण मिळवून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या माजी सैनिकांच्या सर्व पाल्यांनारु. २५,०००/-एकरकमी एकदाच
५४३७ (६)इयत्ता १२ वी च्या परिक्षेमध्ये ६०% पेक्षा ज्यास्त गुण मिळवून पुढे परराज्यात व्यावसायीक शिक्षण घेणा-या माजी सैनिक/विधवांच्या पाल्यांनारु. ३०,०००/-एकरकमी एकदाच
२२५६३८विशेष गौरव पुरस्कार
१ अ. राष्ट्रीय पातळीवर बहुमोल कामगिरी करणाऱ्यासरू. २५,०००/-एकरकमी
१ ब. आंतरराष्ट्रीय पातळीवर बहुमोल कामगिरी करणाऱ्यासरु. ५०,०००/-एकरकमी
२ ब. पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यापिठात सर्व प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यास माजी सैनिक/पत्नी/पाल्य यांनारु. २५,०००/-एकरकमी
२ क. IIT, IIM, AIIMS, IISER, IBM अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक/विधवा यांच्या पाल्यांनारु. १,००,०००/-एकरकमी
२३५७३९एन.डी.ए/आय.एम.ए/ओ.टी.ए / समतुल्य संस्थेमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना प्रोत्साहनासाठीरु. १,००,०००/-एकरकमी
२४६२४६माजी सैनिक पत्नी/विधवा यांचे बचत गटांच्या स्वयंरोजगार प्रकल्पासाठीप्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जाच्या ५०% किंवा जास्तीत जास्त रु. १५,००,०००/- चार हप्त्यामध्ये (३०:३०:२०:२०)
२५१७वैद्यकीय मदत
१०(१)श्रवण यंत्रासाठीरु. ५०००/-
१०(२)दाताच्या कवळीसाठीरु. ५०००/-
१०(३)अपंग सैनिकास तिचाकी/व्हील खुर्चीरु. ८,०००/- व स्वयंचलीत मशीनसाठी वेगळे अनुदान रु १५०००/- पर्यंत (एकच वेळा)
१०(४)अपंग माजी सैनिक/ कुटुंबियांना कुबडी तसेच इतर वैद्यकीय उपकरणासाठीप्रत्यक्ष येणा-या खर्चाइतकी आर्थिक मदत
११गंभीर शस्त्रक्रियेनंतर देखभालीसाठी पुनरावर्ती खर्चासाठीरु. १०००/- द.म. किंवा रु. १००००/-एक वर्षासाठी.
१९१५औषधोपचाररु. १,२५,०००/- पर्यंत.

टीप : वरील योजनांचा/सवलीचा लाभ घेण्यासाठी माजी सैनिक मुळचा कायमचा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे किंवा मुळ रहिवाशी नसल्यास सैन्य सेवा निवृत्तीनंतर महाराष्ट्रात कमीत कमी १५ वर्षे वास्तव्याचे अधिनिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे आवश्यक आहे. सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या संबधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी क्रमांक 022- 22700404 / 8591983861 या कार्यालयीन दूरध्वनी वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

खालील लेख देखील वाचा !

  1. माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य योजना
  2. सैनिक शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.