महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत इतर यंत्रणांची भूमिका व जबाबदारी !
शासन निर्णय दिनांक २७ मे, २०११ नुसार मनरेगाची विविध कामे करण्यासंदर्भात इतर यंत्रणांची भूमिका व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील परिशिष्ट “अ” मधील अनुक्रमांक ९ व १० नुसार कामाच्या ठिकाणी मजुरांना सोयी सुविधा पुरविणे व मजुरांची दैनंदिन हजेरी घेणे व इतर नोंदी घेणे इत्यादी कामे करण्यासंदर्भात जबाबदारी संबंधित यंत्रणातील क्षेत्रिय तांत्रिक संवर्ग व संबंधित ग्रामसेवक यांच्यावर असून या कामात संबंधित ग्रामसेवक यांनी मदत करणे व मजुरांची उपस्थिती ग्रामरोजगार सेवक यांनी नोंदविल्यावर त्याची खात्री/ पडताळणी संबंधित यंत्रणेचे तांत्रिक संवर्ग/ ग्रामसेवक करतील अशी तरतुद आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत इतर यंत्रणांची भूमिका व जबाबदारी !
ग्रामसेवक संघटनेने त्यांच्या निवेदनाद्वारे ग्रामसेवकांना विविध कामे करावी लागतात. त्यात निवडणुक आयोगाची कामे / कृषि विभागाची कामे / सामाजिक न्याय विभागाची कामे या सर्व कामांमुळे ग्रामसेवकावर अतिरिक्त ताण व मानसिक तणावामुळे मनरेगा सारख्या अत्यंत व्यापक योजनेस ग्रामसेवक न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्चित करण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेकडून वेळोवेळी शासनास येत होती.
दि. ३०/११/२०२२ रोजी याबाबत मा. मंत्री (रोहयो) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत झालेल्या चर्चेनुसार ग्रामसेवक संघटनेची मागणी विचारात घेवून शासनाने खालील प्रमाणे निर्णय घेतला आहे.
ग्रामसेवक संघटनेची मागणी व एकंदरीत रोजगार हमी योजनेची व्याप्ती विचारात घेऊन शासनाने शासन निर्णय क्रमांक मग्रारोहयो-२०११/प्र.क्र.५४/रोहयो-१०-अ, दिनांक २७ मे, २०११ मध्ये सुधारणा करुन सदर शासन निर्णयातील परिशिष्ट अ मधील अ. क्र. ९ येथील रकान्यातील (ग्रामसेवक) हा शब्द वगळण्यात येत आहे.
अनुक्रमांक १० मधील हजेरीपटावरील मजूरांची उपस्थिती ग्रामरोजगार सेवक नोंदवू शकेल व याबाबत खात्री/ पडताळणी संबंधित यंत्रणेचे तांत्रिक संवर्ग (ग्रामसेवक) करून प्रमाणित करतील या ऐवजी “हजेरी पटावरील मजूरांची उपस्थिती ग्रामरोजगार सेवक नोंदवतील असे वाचावे.
शासन निर्णय: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत इतर यंत्रणांची भूमिका व जबाबदारी (Role and Responsibilities of Line Departments in MGNREGA). बाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हेही वाचा – ग्राम रोजगार सेवकांची कर्तव्य व जबाबदाऱ्या आणि त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!