घरेलू कामगार मासिक नोंदणी फी होणार कमी, शासन निर्णय जारी !
महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम २००८ अन्वये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत मंडळावर विकास आयुक्त (असंघटित कामगार) मुंबई यांची एक सदस्य मंडळ या नात्याने नियुक्ती करण्यात आलेली आहे. मंडळातर्फे राज्यातील घरेलू कामगारांची नोंदणी करण्यात येवून त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.
सद्यस्थितीत मंडळामार्फत अंत्यविधी सहाय्य योजना राबविण्यात येते यात मृत घरेलू कामगारांच्या कायदेशीर वारसास रुपये २०००/- अंत्यविधी सहाय्य देण्यात येते. तसेच प्रस्तृती लाभ महिला घरेलू कामगारांना दोन अपत्यपर्यंत रुपये ५०००/- इतकी मदत देण्यात येते.
उपरोक्त संदर्भीय क्र. १ च्या सन २०१० च्या अधिसुचनेन्वये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाचे नियम २०१० निश्चित करण्यात आलेले आहे. सदर नियमातील कलम ९ (२) (क) नुसार लाभार्थी म्हणून नोंदणीसाठी रु ३०/- इतके शुल्क आकारले जाते. तसेच, कलम ११ अन्वये घरेलू कामगारांचे अंशदान निश्चित करण्यात आलेले आहे.
त्यात ज्या घरेलू कामगारांची लाभार्थी म्हणून नोंदणी झालेली असेल त्याला नोंद झालेल्या मंडळाकडे रुपये ५/- इतक्या अंशदान दरमहा द्यावे लागेल अशी तरतूद आहे. सदर नोंदणी फी रुपये ३०/- वरुन रुपये १/- व अंशदान रुपये ५/- इतक्या वरुन रुपये १/- दरमहा इतके करण्याबाबत मंडळाकडे तसेच शासनाकडे विविध कामगार संघटनांनी मागणी केलेली आहे. त्यानुषंगाने सदर नोंदणी फी रुपये ३०/- वरुन रुपये १/- व अंशदान रुपये ५/- इतक्या वरुन रुपये १/- दरमहा इतके करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
घरेलू कामगार मासिक नोंदणी फी होणार कमी, शासन निर्णय जारी !-
महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम सन २०१० च्या अधिसुचनेन्वये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाचे नियम २०१० निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यातील कलम ९ (२) (क) नुसार लाभार्थी म्हणून नोंदणीसाठी रु ३०/- इतके शुल्क आकारले जाते. तसेच, कलम ११ अन्वये घरेलू कामगारांचे अंशदान निश्चित करण्यात आलेले आहे. त्यात ज्या घरेलू कामगारांची लाभार्थी म्हणून नोंदणी झालेली असेल त्याला नोंद झालेल्या मंडळाकडे रुपये ५ इतकी अंशदान दरमहा द्यावे लागेल अशी तरतूद आहे.
त्यात नोंदणीसाठी असलेल्या रुपये ३०/- ऐवजी रुपये १/- तसेच अंशदानाची रक्कम रुपये ५/- ऐवजी रुपये १/- दरमहा इतकी करण्याबाबतचा निर्णय या शासन निर्णयान्वये घेण्यात येत आहे. याबाबतीत अधिनियमातील कलम ९ व कलम ११ यातील तरतुदींमधील सुधारणा यथावकाश करण्यात येत आहे.
उद्योग, उर्जा व कामगार विभाग शासन निर्णय: घरेलू कामगारांसाठी मासिक नोंदणी फी रुपये 30/- वरुन रुपये 1/- व अंशदान रुपये ५/- वरुन रुपये १/- इतके करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – घरेलू कामगार नोंदणी, अर्जाचा नमुना, कागदपत्रे, व घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!