केंद्र पुरस्कृत पशुसखी यांना द्यावयाचे मानधन, सेवाशुल्क निश्चित
केंद्र शासनाने पशुआरोग्य आणि पशुधन उत्पादनाच्या विस्तारासाठी मान्यताप्राप्त कार्यकर्ता (A-HELP) ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरु करण्याचे योजिले आहे. केंद्र शासनाचा पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभाग (DAHD) आणि राष्ट्रीय ग्रामीण जिवन्नोन्न्ती अभियान (NRLM- National Rural Livelihood Mission), ग्रामीण विकास मंत्रालय (MoRD) यांच्यातील अभिसरणाद्वारे ग्रामीण आर्थिक विकासासाठी स्वयंसहायता गट (SHG) व्यासपीठाचा लाभ घेण्यासाठी दि. १ सप्टेंबर, २०२१ रोजी सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली आहे.
राज्यात शेतकरी, पशुपालक यांना ग्रामपातळीवर विविध पशुवैद्यकीय सेवा पुरविण्याकरीता पशुसंवर्धन विभागांतर्गत एकुण ४,८५३ पशुवैद्यकीय संस्था कार्यरत असुन, प्राण्यांच्या आरोग्याशी संबंधित नियमित कर्तव्ये सोडून पशुवैद्यकीय संस्थांमधील अधिकारी / कर्मचाऱ्यांना इतर शासकीय कामांकरीता बराच वेळ द्यावा लागतो. ही पोकळी भरून काढण्यासाठी अॅक्रीडेटेड एजेंट फॉर हेल्थ अँड एक्स्टेंशन ऑफ लाइव्हस्टॉक प्रॉडक्शन (A-HELP) समुदाय-आधारित अभिकर्तीचा (पशुसखी) नवीन गट प्रस्तावित करण्यात आला आहे. गावपातळीवर ज्या शेतकरी व पशुपालकांना पशुवैद्यकीय सेवा मिळण्यामध्ये अडचणी येत आहेत, अशांना पशुआरोग्य संबंधित सेवांसाठी A- HELP पशुसखी हा पहिला दुवा असेल.
केद्र पुरस्कृत A-HELP हा कार्यक्रम राज्यात राबविण्यासाठी प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. तसेच, कार्यक्रमाच्या राज्यातील अंमलबजावणीकरीता राज्यस्तरीय समन्वय समिती (SCSC) आणि जिल्हास्तरीय समन्वय समिती (DCSC) यांचे गठण करण्यात आले आहे.
A-HELP पशुसखी औषधे, जंतनाशके, पोषण पूरक औषधे / खनिज मिश्रणे इत्यादींचे शेतकरी, पशुपालकांना वितरण करण्यासाठी ते संबंधित पशुवैद्यकाकडून आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन घेतील. तसेच, गरजू शेतकरी, पशुपालकांकडील रुग्ण पशुंवर प्रथमोपचार / सल्ला / पशुसंवर्धन विषयक योजनांविषयी अर्ज भरणे इत्यादी संदर्भात आवश्यक असलेली मदत पशुसंवर्धन विभागाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार करतील.
A-HELP पशुसखी यांनी पशुधनास प्रथमोपचार, जंतनाशके देण्यासोबतच दुध संघ, सहकारी किंवा इतर स्वयंसेवी संस्थांशी सल्लामसलत करून पशुआरोग्य शिबिरे किंवा जनजागृती शिबिरे आयोजित करणे, आवश्यकतेनुसार आणि नियुक्त केलेल्या गावातील कृषी / पशुसंवर्धन विभागाच्या समित्यांच्या बैठकांना उपस्थित राहणे, राज्याच्या पशुसंवर्धन विषयक धोरणांची अंमलबजावणी करण्यास मदत करणे इत्यादी कामकाज करावयाचे असून याकरीता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मोबदल्यासाठी त्या पात्र राहणार आहेत.
A-HELP पशुसखी यांनी द्यावयाच्या पशुसेवेच्या बाबी, पशुसखींना देय मानधन आणि पशुसखी यांनी आकारावयाचे सेवाशुल्क निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
केंद्र पुरस्कृत पशुसखी यांना द्यावयाचे मानधन, सेवाशुल्क निश्चित शासन निर्णयः-
केंद्र शासनाच्या या कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार A-HELP पशुसखी हे मानद (Honorary) तत्वावर काम करतील व याकरिता त्यांना कोणतेही वेगळे मानधन देय नाही. तथापि, त्यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान यांच्यामार्फत ज्या प्रचलित दरांप्रमाणे मानधन देण्यात येते ते शासनाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयानुसार देय राहील. तसेच, केंद्र शासनाने लसीकरण, कानात बिल्ला लावणे (Ear Tagging), भारत पशुधन प्रणालीवर नोंदी करणे, प्रशिक्षित पशुसखींद्वारे कृत्रिम रेतन करणे, पशुगणना इत्यादी कार्यक्रमासाठी वेळोवेळी निश्चित केलेले मानधन देय आहे.
पशुआरोग्य आणि पशुधन उत्पादनाच्या विस्तारासाठी A-HELP पशुसखी या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने पशुसखी यांनी द्यावयाच्या पशुसेवेच्या बाबी आणि पशुसखींना देय मानधन खालीलप्रमाणे निश्चित करण्यास याव्दारे मान्यता देण्यात येत आहे.
A-Help पशुसखी यांनी द्यावयाच्या पशुसेवेच्या बाबी आणि पशुसखींना देय मानधन
अ. क्र. | तपशिल | देय मानधन |
१ | महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान यांच्या मार्फत मानधन | रु. २९००/- दरमहा |
केंद्र पुरस्कृत पशुस्वास्थ्य व रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कानात बिल्ले मारणे व लसीकरण करणे | ||
२ | मोठ्या पशुधनास (वराहसह) कानात बिल्ला मारणे (Ear Tagging), NDLM प्रणालीवर नोंद करणे व लाळ खुरकुत प्रतिबंधात्मक लसीकरण करणे | रु. ३.५० + ५.०० = रु. ८.५०/- |
३ | लहान पशुधनास कानात बिल्ला मारणे (Ear Tagging), NDLM प्रणालीवर नोंद करणे व लाळ खुरकुत प्रतिबंधात्मक लसीकरण करणे | रु. २.५० +३.०० = रु. ५.५०/- |
४ | पशुधनास कानात बिल्ला मारणे (Ear Tagging), NDLM प्रणालीवर नोंद करणे व सांसर्गिक गर्भपात प्रतिबंधात्मक लसीकरण करणे (मादी वासरे) | रु. २.५० + ५.०० = रु. ७.५०/- |
५ | पशुधनास कानात बिल्ला मारणे (Ear Tagging), NDLM प्रणालीवर नोंद करणे व पीपीआर प्रतिबंधात्मक लसीकरण करणे (शेळी-मेंढी) | रु. २.००/- |
६ | पशुधनास कानात बिल्ला मारणे (Ear Tagging), NDLM प्रणालीवर नोंद करणे व क्लासिकल स्वाईन फ़िव्हर प्रतिबंधात्मक लसीकरण करणे (वराह) | रु. २.००/- |
राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम (NAIP) | ||
७ | गायी / म्हशींमध्ये कृत्रिम रेतन व NDLM प्रणालीवर नोंदणी | रु. ५०.००/- प्रती गाय / म्हैस |
८ | गायी / म्हशींमध्ये कृत्रिम रेतन व NDLM प्रणालीवर नोंदणी केल्यावर पहिल्याच कृत्रिम रेतनाने गर्भधारणा झाल्यास | रु. २००.००/- प्रती गाय / म्हैस |
९ | गायी / म्हशींमध्ये कृत्रीन रेतन व NDLM प्रणालीवर नोंदणी केल्यावर दुसऱ्या कृत्रिम रेतनाने गर्भधारणा झाल्यास | रु. १००,००/- प्रती गाय / म्हैस |
१० | गायी / म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाने वासरु जन्मल्यास व NDLM प्रणालीवर नोंदणी केल्यास | रु. १००,००/- प्रती गाय / म्हैस |
पशुगणना | ||
११ | ग्रामीण भागातील पशुगणने साठी प्रगणक मानधन | रु. ७.५०/- प्रती कुटुंब |
इतर | ||
१२ | कार्यक्षेत्रांतर्गत विस्तार कार्य जसे विविध योजनाची प्रचार व प्रसिद्धी करणे | योजनानुरूप |
१३ | राष्ट्रीय गोकुळ मिशन (RGM) अंतर्गत दुधाळ जनावरांची दुध मोजणी करणे. | रु. ५०/- प्रती मोजणी व प्रती दुधाळ जनावर १० मोजण्या |
१४ | एकात्मिक पाहणी योजना (Integrated Sample Survey) अंतर्गत मानधनः Schedule १ व Schedule २ सर्वे व format भरणेसाठी मदत करणे. | निरंक |
१५ | कार्यक्षेत्रांतर्गत वैरण बाग, मुरघास, हायड्रोपोनिक्स, अझोला आणि घर तेथे बहुवार्षिक चारा पिकांचे उत्पादन करण्यास ग्रामस्थांचे प्रबोधन करणे. | निरंक |
१६ | कार्यक्षेत्रांतर्गत जनावरांसाठी संतुलित आहार देण्यास पशुपालकांचे प्रबोधन करणे. | निरंक |
१७ | साथीच्या आजाराने पिडीत जनावरांची माहिती पशुवैद्यकास देणे आणि अशा पशुपालकांना उपचार व लसीकरण करुन घेण्याबाबत प्रबोधन करणे. | निरंक |
१८ | विस्तार विषयक कार्यक्रमात मदत, कार्यक्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या अंमलबजावणीत सहकार्य करणे, | निरंक |
१९ | शास्रोत्क्त पध्दतीने पशुपालन करण्यास शेतकरी, पशुपालक, महिला स्वयं सहायता गटांचे प्रबोधन करणे | निरंक |
२० | आवश्यकतेनुसार आणि नियुक्त केलेल्या गावातील कृषी, पशुसंवर्धन समित्यांच्या बैठकांना उपस्थित राहणे | निरंक |
पशुसखी यांनी शेतकरी, पशुपालक यांच्याकडील पशुधनास दिलेल्या विविध सेवांसाठी शासन निर्णयान्वये किंवा राज्य शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणे नुसार विहीत केलेले सेवाशुल्क आकारुन ते संबंधित पशुवैद्यकीय संस्थेतील अधिकारी / कर्मचारी यांचेकडे त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुस-या दिवशी जमा करावयाचे आहे.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग :
केंद्र पुरस्कृत Accredited Agent for Health and Extension of Livestock Production (A-HELP) पशुसखी यांनी द्यावयाच्या पशुसेवेच्या बाबी, पशुसखींना देय मानधन आणि पशुसखी यांनी आकारावयाचे सेवाशुल्क निश्चित करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!