नोंदणी, मुद्रांक व भुमि अभिलेख विभागातील तक्रार निवारण व्यवस्थेबाबत शासन परिपत्रक जारी!
नोंदणी व मुद्रांक विभागातील प्रशासकीय कामकाज व कार्यसूलभतेच्या संदर्भाने “आपले सरकार” पोर्टल अथवा इतर माध्यमातून नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक, सह जिल्हा निबंधक वर्ग -२, मुद्रांक जिल्हाधिकारी, सह जिल्हा निबंधक नोंदणी उपमहानिरीक्षक तथा मुद्रांक उपनियंत्रक व भूमी अभिलेख विभागातील नगर भूमापन अधिकारी, उप अधिक्षक, भूमी अभिलेख, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, उपसंचालक, भूमी अभिलेख या कार्यालयांच्या कामकाजाविषयी अर्ज/तक्रार/सूचना प्राप्त झाल्यास, सदर तक्रारीचे निरसन करण्यासाठी मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या “Ease of Doing Business” बाबतच्या आढावा बैठकीमध्ये मा.मुख्य सचिव यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील उपरोक्त नमुद कार्यालयांचे प्रशासकीय कामकाज व कार्यसुलभता यावी यादृष्टिने त्रयस्थ तक्रार निवारण अधिकारी नेमण्याचे निर्देश दिले आहेत.
सदर निर्देशाचे अनुषंगाने नोंदणी व मुद्रांक विभाग तसेच भूमि अभिलेख विभागात तक्रार निवारण अधिकारी नेमण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
नोंदणी, मुद्रांक व भुमि अभिलेख विभाग तक्रार निवारण व्यवस्था – Registration Stamps Land Records Department grievances:
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांतील नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक, सह जिल्हा निबंधक वर्ग -२, मुद्रांक जिल्हाधिकारी, सह जिल्हा निबंधक, नोंदणी उपमहानिरीक्षक तथा मुद्रांक उपनियंत्रक व भूमी अभिलेख विभागातील नगर भूमापन अधिकारी, उप अधिक्षक, भूमी अभिलेख, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, उपसंचालक, भूमी अभिलेख यांचे कार्यालयातील “प्रशासकीय कामकाज तसेच कार्यसुलभता” या संदर्भाने काही तक्रार प्राप्त झाल्यास त्यासाठी त्रयस्थ तक्रार निवारण अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त (महसूल) यांची नेमणूक करण्यात येत आहे.
त्रयस्थ तक्रार निवारण अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त (महसूल) यांच्याकडे अर्ज आल्यास, विभागीय आयुक्त यांनी सदर तक्रारीची स्वतंत्र व निःपक्षपणे चौकशीकरुन अर्जदारास/तक्रारदारास त्यांचे स्तरावरुन कळवावे.
सदरचे आदेश या शासन परिपत्रकाच्या दिनांकापासून अंमलात येतील.
शासन परिपत्रक:
नोंदणी व मुद्रांक तसेच भुमि अभिलेख विभागातील कार्यालयांविषयीच्या तक्रारींचे निरसनासाठी त्रयस्थ तक्रार निवारण व्यवस्थेबाबत शासन परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
Good