ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची माहिती कशी नोंदवावी? जाणून घ्या सविस्तर !
महसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या मोबाईल ॲपद्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदी (Pikanchi Nond), बांधावरच्या झाडांच्या नोंदी, व चालू पड/कायम पड क्षेत्राच्या नोंदी अक्षांस व रेखांशासह नोंदविण्याची सोय देण्यात आलेली आहे.
ई-पीक पाहणी या मोबाईल ॲपमध्ये पिकांची (Pikanchi Nond) माहिती कशी नोंदवावी ? या विषयी सविस्तर माहिती आपण या लेखा मध्ये पाहणार आहोत.
ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची माहिती नोंदविण्याची प्रोसेस – EPeek Pahani Pikanchi Nond:
शेतकरी बंधुनो हे लक्षात ठेवा कि ई – पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची (Pikanchi Nond) माहिती नोंदविण्यापूर्वी कायम पड/चालू पड क्षेत्राची माहिती नोंदविणे आवश्यक आहे. ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करून मोबाईल मध्ये इन्स्टॉल करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://play.google.com/store/apps/E-Peek Pahani App
शेतकरी खातेदार यांनी गुगल प्ले स्टोअर वरून ई-पीक पाहणी ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करून खालील स्टेप्स नुसार पिकांची माहिती ई-पीक पाहणी ॲप मध्ये (Pikanchi Nond) नोंदणी करावी.
१) ई – पीक पाहणी ॲपच्या होम पेजवर असलेल्या पीक माहिती (Pikanchi Nond) नोंदवा या टॅबवर क्लिक करा.
२) आपण पीक पेरणीची (Pikanchi Nond) माहिती भरा या पानावर प्रविष्ठ व्हाल.
३) पीक पेरणीची माहिती भरा या सदरामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा खाते क्रमांक निवडावा.
४) त्यानंतर जमिनीचा भुमापन/गट क्रमांक निवडावा .
५) तुमच्या सदर गटाचे एकूण क्षेत्र ( हे.आर ) व पोट खराब या ठिकाणी आपोआप दर्शविल्या जाईल.
६) हंगाम निवडा या बटनवर क्लिक केल्यावर सध्या चालू असलेला हंगाम व संपूर्ण वर्ष हे हंगाम दिसतील आपण लागवड केल्याप्रमाणे वरील पैकी हंगाम निवडावा.
७) पीक पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र हे या ठिकाणी आपोआप दर्शविले जाईल.
८) त्यानंतर पिकांचा वर्ग निवडा या ठिकाणी तुम्हाला निर्भेळ पिक, मिश्र पिक, पॉलीहाऊस पिक, व शेडनेटहाऊस पिक, असे चार पर्याय दिसतील यापैकी आपणास हवा असलेला पर्याय निवडावा.
आपण निर्भेळ पीक निवडल्यास निर्भेळ पिकाचा वर्ग निवडा मधून पीक किंवा फळबाग या पैकी एक वर्ग निवडावा. त्यानंतर पिकांची/झाडांची नावे निवडा या पर्यायामधून आपण लागवड केलेले पिकांचे नाव दिलेली यादी स्क्रोल करुन शोधा व निवडा.
९) त्यानंतर क्षेत्र भरा हा पर्याय दिसेल तेथे आपण निवडलेल्या पिकाखालील क्षेत्र हे. आर मध्ये भरा.
१०) त्यानंतर जल सिंचनाचे साधने या पर्यायावर क्लिक करून दिलेल्या यादीतून योग्य तो जल सिंचनाचे साधन निवडा.
११) त्यानंतर जल सिंचन पद्धती हा पर्याय दिसेल त्यामधून आपणास हवा असेलेला पर्याय निवडावा.
१२) त्यानंतर लागवडीचा दिनांक हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यावर कॅलेंडर ओपन होईल त्यामधून पिकाच्या पेरणीचा/ लागवडीचा दिनांक नमूद करावा.
१३) त्यानंतर अक्षांश व रेखांश मिळवा या पर्यायावर क्लिक केल्यावर अक्षांश रेखांश व अचूकता प्राप्त होईल.
१४) शेतकरी बंधुंनो, मोबाईल एरोप्लेन मोड वर ठेवल्यास जास्तीत जास्त अचूकता मिळवण्यासाठी मदत होईल.
१५) त्यानंतर फोटो काढा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून पिकाचा फोटो काढा.
जर आपण आपल्या पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटा पासून दूर अंतरावर असाल तर आपणास पुढील प्रमाणे संदेश दाखविला जाईल उदा . मध्यापासुनचे अंतर ३९४.७९ मी. आपण आपल्या पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून दूर आहात कृपया गटाच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्यावा अश्या वेळेस आपण आपल्या पिकाच्या जवळ जाऊन फोटो घेणे आवश्यक आहे.
१६) जर आपण आपल्या शेताच्या बांधावर उभा असल्याची आपली खात्री असेल व तरीही वरील प्रमाणे मॅसेज येत असेल तर अश्या वेळेस वरील संदेशाकडे दुर्लक्ष करून पिकाचा फोटो काढावे.
१७) त्यानंतर बरोबर या चिन्हावर क्लिक केल्यावर माहितीची पुष्ठी करा हि स्क्रीन उघडेल.
१८) या स्क्रीन वरील माहिती अचूक असल्याची खात्री करून वरील प्रमाणे माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहे या घोषणा पत्रावर क्लिक करून स्वयंघोषणा पत्र करा व पुढे या बटनवर क्लिक करा.
१९) माहितीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास डाव्या कोपऱ्यातील रद्द या बटनवर क्लिक करावे. आपणास परत मागील पानावर नेले जाईल. आवश्यक ते दुरुस्ती करून वर सांगितल्या प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी.
२०) आपण नेटवर्क मध्ये असल्यास आपण नोंदविलेली माहिती सबमिट व अपलोड झाल्याचा संदेश दाखविला जाईल.
२१) जर आपण नेटवर्क मध्ये नसाल तर आपणास आपली माहिती (Pikanchi Nond) सबमिट झाली आहे तथापि इंटरनेट अभावी अपलोड झालेली नाही. आपण नेटवर्क मध्ये आल्यानंतर होम पेज वरील अपलोड पर्याय वापरून माहिती अपलोड करावी.
मिश्र पीक नोंदविण्याची प्रक्रिया – (Mishra Pikanchi Nond):
१) शेतकरी बंधुंनो ई – पीक पाहणी मध्ये मिश्र पिकांतर्गत एक मुख्य पीक व तीन दुय्यम पिके (Pikanchi Nond) नोंदविता येतील. त्यासाठी खाते क्रमांक व गट क्रमांक निवडल्यानंतर पिकाचा वर्ग मिश्र पीक (बहु पीक निवडा.)
२) त्यानंतर आपल्याला मुख्य पीक दुय्यम पीक १, दुय्यम पीक २ व दुय्यम पीक ३ असे पर्याय दिसतील सुरुवातीला मुख्य पीक, पिकाचे क्षेत्र आणि लागवडीचा दिनांक भरा.
३) त्यानंतर दुय्यम पीक १ ची माहिती भरण्यासाठी उपलब्ध होईल त्यानंतर दुय्यम पीक २ ची माहिती भरण्यासाठी उपलब्ध होईल ती भरल्यानंतर दुय्यम पीक ३ ची माहिती भरण्यासाठी उपलब्ध होईल.
४) आपण घेतलेल्या मिश्र पिकानुसार मुख्य पीक व दुय्यम पिकाची (Pikanchi Nond) माहिती नोंदवावी.
५) त्यानंतर जल सिंचनाचे साधने या पर्यायावर क्लिक करून दिलेल्या यादीतून त्यानंतर जल सिंचन पद्धती हा पर्याय दिसेल त्यामधून आपणास हवा असलेला पर्याय निवडा.
६) त्यानंतर लागवडीचा दिनांक हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यावर कॅलेंडर ओपन होईल त्यामधून पिकाच्या पेरणीचा/लागवडीचा दिनांक नमूद करावा.
७) त्यानंतर अक्षांश व रेखांश मिळवा या पर्यायावर क्लिक केल्यावर अक्षांश रेखांश व अचूकता प्राप्त होईल.
८) शेतकरी बंधुंनो, मोबाईल एरोप्लेन मोड वर ठेवल्यास जास्तीत जास्त अचूकता मिळवण्यासाठी मदत होईल.
९) त्यानंतर फोटो काढा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून पिकाचा फोटो काढा.
१०) त्यानंतर बरोबर या चिन्हावर क्लिक केल्यावर माहितीची पुष्ठी करा ही स्क्रीन उघडेल.
११) या स्क्रीन वरील माहिती अचूक असल्याची खात्री करून वरील प्रमाणे माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहे. या घोषणा पत्रावर क्लिक करून स्वयंघोषणा पत्र करा. व पुढे या बटनवर क्लिक करा.
१२) माहितीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास डाव्या कोपऱ्यातील रद्द या बटनवर क्लिक करावे. आपणास परत मागील पानावर नेले जाईल. आवश्यक ते दुरुस्ती करून वर सांगितल्या प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी.
१३) आपण नेटवर्क मध्ये असल्यास आपण नोंदविलेली (Pikanchi Nond) माहिती सबमिट व अपलोड झाल्याचा संदेश दाखविला जाईल.
१४) जर आपण नेटवर्क मध्ये नसाल तर आपणास आपली माहिती सबमिट झाली आहे तथापि इंटरनेट अभावी अपलोड झालेली नाही. आपण नेटवर्क मध्ये आल्यानंतर होम पेज वरील अप पर्याय वापरून माहिती अपलोड करावी.
वरील प्रमाणेच पॉलीहाऊस व शेडनेट हाऊस पिकांची माहिती नोंदवावी.
शेतकरी बंधुनो याठिकाणी महत्वाचा मुदा लक्षात ठेवा की, या नोंदणीसाठी मोबाईल नेटवर्क ची आवश्यकता नाही, आपण नोंदविलेली माहिती सबमिट बटन वर क्लिक करून साठविली जाईल व मोबाईल नेटवर्कमध्ये आल्यावर ती तुम्ही डॅशबोर्डवर असलेल्या अपलोड टॅबवर क्लिक करुन अपलोड करू शकता. अश्या प्रकारे आपण आपल्या पिकांच्या (Pikanchi Nond) माहितीची नोंद ई – पीक पाहणी ॲपद्वारे सहजरित्या करु शकता.
जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर ॲप मधील मदत या बटनवर क्लिक करुन तिथे दिलेल्या प्रश्न उत्तरामधून आपल्या प्रश्नांचे निराकरण करु शकता. तसेच ई – पीक पाहणी ॲप मधील अभिप्राय नोंदवा या टॅबवर क्लिक करून आपला अभिप्राय नोंदवू शकता.
या लेखात, आम्ही ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची (Pikanchi Nond) माहिती कशी नोंदवावी? विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
खालील लेख देखील वाचा !
- ई-पीक पाहणी ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!
- ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पाहणी नंतर 48 तासांच्या आत केव्हा ही दुरुस्त किंवा रद्द करता येणार !
- ई-पीक पाहणी ॲपद्वारे कायम पड/चालू पड क्षेत्राची माहिती कशी नोंदवावी? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!
- ई-पीक पाहणी ॲपद्वारे आपल्या शेताच्या बांधावरील झाडे कशी नोंदवावी? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!
- ई-पीक पाहणी पीक नोंदणी सारांश अहवाल ऑनलाईन कसा पाहायचा? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!
- पिकांची नोंद करतानाच आता मिळणार जीआयएस नकाशा, एकाच ॲपमधून होणार नोंदणी !
- E-Peek Pahani FAQ : ई-पीक पाहणी मोबाईल ॲप वापरताना नेहमी उद्भवणाऱ्या प्रश्नांची उत्तरे !
- ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रियेतील तरतुदींमध्ये सुधारणा !
- ई-पीक पाहणी बाबत मार्गदर्शक सूचना – E-Peek Pahani Guidelines
- पिकांची नोंद करतानाच आता मिळणार जीआयएस नकाशा, एकाच ॲपमधून होणार नोंदणी !
- ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- गाव नमुना सातबारा (७/१२) उतारा म्हणजे काय? सातबारा उताऱ्या विषयीची संपूर्ण माहिती !
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!