अन्‍न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागआपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी कामे

रेशन कार्ड आधार प्रमाणीकरनाचे स्टेटस ऑनलाईन चेक करण्याची प्रोसेस!

भारत सरकारच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमार्फत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात येते. या योजनेतील लाभार्थ्यांसह शिधापत्रिकाधारक कुटुंबांची सरकारच्या निर्देशानुसार ई-केवायसी (Ration Card eKYC) करून घेण्यात येणार आहे. ई-केवायसी अद्ययावत करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना यापुढे धान्य मिळणार आहे.

गरीब आणि दुर्बल गटातल्या लोकांसाठी अन्नधान्याची सुलभ, किफायतशीर दरामध्ये उपलब्धतेसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा २०१३ च्या तरतुदी करण्यात आली.  स्वस्त धान्य योजनेतील बोगस लाभार्थी शोधून काढण्यासाठी, पात्र नसताना सरकारच्या वितरित होणाऱ्या मोफत धान्य योजनेसह सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत येणाऱ्या योजनांचा लाभ घेणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानावर असणाऱ्या ई-पॉस मशिनमध्ये शिधापत्रिकाधारक नागरिकांची नोंद ही आधारकार्डवर असणाऱ्या नोंदीनुसार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शिधापत्रिकाधारकांची बँकेप्रमाणे ई-केवायसी (Ration Card eKYC) करून आधारच्या नोंदीनुसार प्रामाणिकरण करण्यात येणार आहे.

रेशन कार्ड आधार प्रमाणीकरनाचे स्टेटस ऑनलाईन चेक करण्याची प्रोसेस – Ration Card eKYC Status:

रेशन कार्ड आधार प्रमाणीकरनाचे स्टेटस ऑनलाईन चेक करण्यासाठी सर्व प्रथम खालील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट ओपन करा.

https://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट ओपन झाल्यावर “ऑनलाईन सेवा” या बॉक्स मध्ये “ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली” या लिंक वर क्लिक करा.

“ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली” या लिंक वर क्लिक केल्यावर एक RCMS ची वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये “RATION CARD” या मेनू मध्ये “Know Your Ration Card” या पर्यायावर क्लिक करा.

आता आपल्याला “Enter Captcha” मध्ये खालील कॅप्चा कोड टाका आणि “Verify” वर क्लिक करा.

कॅप्चा कोड व्हेरिफाय केल्यानंतर १२ अंकी रेशन कार्ड क्रमांक किंवा जुना शिधा पत्रिका क्रमांक टाकून “View Report” वर क्लिक करा.

“View Report” वर क्लिक केल्यानंतर रेशनकार्डचा अहवाल दिसेल त्यामध्ये “Print Your Ration Card” या ऑप्शन वर क्लिक करा.

रेशन कार्ड ऑनलाईन डाऊनलोड:

Print Your Ration Card” या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर रेशनकार्ड थोडा वेळ लोड होईल त्यानंतर तुम्ही पीडीएफ फाईल डाउनलोड करू शकता.

रेशनकार्ड लोड झाल्यावर खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे Export ऑप्शन मध्ये रेशनकार्ड डाउनलोड करण्यासाठी विविध पर्याय आहेत त्यामध्ये आपण PDF हा ऑप्शन सिलेक्ट करून सेव्ह करा.

रेशन कार्ड आधार प्रमाणीकरनाचे स्टेटस – Ration Card eKYC Status:

रेशन कार्डची PDF फाईल सेव्ह केल्यावर तुम्ही पाहू शकता त्यामध्ये सर्व माहिती. तसेच आधार प्रमाणीकरण तपासण्यासाठी “FAMILY MEMBERS” या बॉक्स मध्ये “Aadhar Auth” मध्ये जर “Y” असे लिहिली असेल तर आधार प्रमाणीकरण (Ration Card eKYC) झालेले आहे किंवा “N” असेल तर आधार प्रमाणीकरण झालेले नाही.

ज्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नसेल त्यांनी लवकरात लवकर रेशन स्वस्त धान्य दुकानामध्ये जाऊन Ration Card eKYC करा नाहीतर तुम्हाला स्वस्त धान्य मिळणार नाही.

मेरा रेशन अ‍ॅप – Mera Ration App:

‘Mera Ration’ अ‍ॅप सध्या केवळ Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. आपण Google Play Store वरून खालील लिंक वर क्लिक करून “Mera Ration” अ‍ॅप डाउनलोड करून इन्स्टॉल करा.

https://play.google.com/store/apps/Mera-Ration

अँप इन्स्टॉल झाल्यावर ओपन करा आणि इंग्रजी किंवा हिंदी भाषा निवडा व Aadhar Seeding मध्ये आधार कार्ड प्रमाणीकरण झाले आहे कि नाही ते पाहू शकतो त्यासाठी Aadhar Seeding वर क्लिक करा आणि रेशन कार्ड नंबर किंवा आपला आधार नंबर टाकून Ration Card eKYC Status चेक करा.

संपर्क: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन, टोल फ्री क्रमांक 1800-22-49501967, ई-मेल: helpline.mhpds@gov.in

खालील लेख देखील वाचा !

  1. रेशन कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करण्याची प्रोसेस !
  2. रेशनकार्डवर आपल्याला किती धान्य मिळते हे ऑनलाईन कसे तपासायचे?
  3. रेशन दुकानांमध्ये ‘फोर-जी ePOS मशिन’ व ‘IRIS’ स्कॅनची सोय !
  4. वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत ‘Mera Ration’ अ‍ॅप लाँच केले; आता देशामध्ये कोणत्याही राज्यातून रेशन मिळणार !
  5. रेशनिंगचे नियम, माहिती, हक्क आणि रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या सविस्तर माहिती
  6. शिधापत्रिका रास्तभाव दुकानासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती!
  7. भटके, विमुक्तांना आता ओळखपत्र व वास्तव्याचा पुराव्याविना मिळणार शिधापत्रिका !
  8. अंत्योदय शिधापत्रिका धारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत !
  9. एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना
  10. शिधापत्रिका धारकांच्या लाभार्थी संख्येत वाढ – नवीन शासन निर्णय जारी
  11. एपीएल केशरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी आता रोख रक्कम; सुधारित योजना !
  12. पांढरे रेशन कार्डधारकांनाही आयुष्यमान अंर्गत ५ लाखांपर्यंत मोफत उपचार !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.