राष्ट्रीय गोकुल मिशन योजना; पशु पालकांसाठी महत्वाची योजना !
सन २०१७ च्या २० व्या पशुगणनेनुसार राज्यामध्ये प्रजननक्षम गायी-म्हशींची एकूण संख्या ८९.०४ लक्ष असून, यापैकी दरवर्षी साधारणत: २२ ते २५ लक्ष पैदासक्षम गायी-म्हशींमध्ये सरासरी एकूण ४७ ते ४८ लक्ष कृत्रिम रेतने करून कृत्रिम रेतनाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कृत्रिम रेतनांपासून दरवर्षी सरासरी १२ ते १३ लक्ष वासरांची पैदास होते. सदर कृत्रिम रेतनाचे कार्य राज्यामधील पशुसंवर्धन विभागांतर्गत ४,८४७ शासकीय कृत्रिम रेतन संस्था, राज्यातील सहकारी दूध संघ, अशासकीय संस्था यांची कृत्रिम रेतन केंद्रे व खाजगी कृत्रिम रेतन व्यावसायिक यांचेद्वारे केले जाते. यापासून जन्मणाऱ्या एकुण वासरांमध्ये निसर्ग नियमानुसार सरासरी ५० टक्के नर व ५० टक्के मादी वासरांचे प्रमाण असते.
राष्ट्रीय गोकुल मिशन योजना; पशु पालकांसाठी महत्वाची योजना :
महाराष्ट्र राज्यात दि.०४ मार्च, २०१५ पासून संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आलेला आहे. तसेच, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण यामध्ये वाढ झाल्याने, शेती कामाकरिता उपयोगी असलेल्या बैलांची आवश्यकता कमी झालेली आहे. त्यामुळे कृत्रिम रेतनाद्वारे जन्मास येणा-या अतिरिक्त नर वासरांचे संगोपन करण्यासाठी पशुपालकांना अनावश्यक खर्च सोसणे भाग पडत आहे. तसेच, महाराष्ट्र राज्यात वार्षिक सरासरी इतके पर्जन्यमान झाल्यानंतरही वाळलेल्या चा-याची ४० टक्के व हिरव्या चा-याची ६० टक्के कमतरता भासते. नर वासरांचे संगोपन करावे लागत असल्यामुळे, दुधाळ जनावरांना चारा कमी पडतो व दुधाळ जनावरांची अनुवांशिक क्षमता असून देखील, त्यांच्या दूध उत्पादकतेवर याचा विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर नर वासरांची उत्पत्ती न्युनतम पातळीवर ठेवण्याच्या हेतूने पारंपारिक वीर्यमात्राऐवजी लिंगविनिधीत वीर्यमात्रा निर्मिती या नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादित केलेल्या वीर्यमात्रांचा क्षेत्रिय स्तरावर गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमांतर्गत वापर केल्यास, त्यापासुन ९० टक्के मादी वासरांची निर्मिती करणे शक्य होणार आहे. लिंगविनिक्षीत केलेल्या वीर्यमात्रांची सरासरी किंमत रू. १,०००/- ते रू. १,२००/- प्रती लिंगविनिधीत वीर्यमात्रा एवढी जास्त असल्याने, पशुपालकांमध्ये त्याबद्दल उत्साह आढळून येत नव्हता. या तंत्रज्ञानाचा खाजगी स्रोताकडून काही काळापासून अवलंब करूनही क्षेत्रिय स्तरावर गाई- म्हशीमध्ये कृत्रिम रेतनासाठी वापर करणे शक्य होत नव्हते.
महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाने लिंगविनिश्चीत केलेल्या वीर्यमात्रांचे उत्पादन व पुरवठा करण्यासाठी दि.२४.०५.२०१९ अन्वये मागविण्यात आलेल्या इच्छापत्रान्वये Genus Brooding India Pvt. Ltd. (ABS India) यांची निविदा रू.७६६/- प्रति लिंगविनिश्चीत वीर्यमात्रा हे दर न्यूनतम असल्याने, त्यांची निविदा स्वीकृत करून दि.१३.०९.२०२० रोजी संबंधित कंपनी समवेत मंडळाने करारनामा केलेला आहे.
महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाने लिंगविनिश्चीत केलेल्या वीर्यमात्रा तयार करण्याचे काम करणा-या Genus Broeding India Pvt. Ltd. ABS India) या संस्थेबरोबर वाटाघाटी करून वीर्यमात्रांची किंमत रू.५७५/- प्रती लिंगविनिश्चीत वीर्यमात्रा एवढी कमी करण्यात आलेली आहे. तथापि, सदरचे प्रति लिंगविनिश्चीत वीर्यमात्रांचे दर संबंधित संस्थेकडून पहिल्या, दुस-या, तिस-या, चौथ्या व पाचव्या वर्षी अनुक्रमे ०.७५ लक्ष, १.२५ लक्ष, १.५० लक्ष, १.६० लक्ष व १.७० लक्ष अशा पाच वर्षे कालावधीत एकूण ६.८० लक्ष लिंगविनिक्षीत वीर्यमात्रा खरेदी केल्यानंतर लागू रहाणार आहेत. अन्यथा प्रति लिंगविनिश्चीत वीर्यमात्रा दर हे रू.५९६/- या प्रमाणे रहाणार आहेत.
सन २०१८-१९ मध्ये केंद्र शासनाने राष्ट्रीय गोकूळ मिशन अंतर्गत राज्यात लिंगविनिश्चीत वीर्यमात्रा उत्पादन करण्यासाठी प्रयोगशाळेची उभारणी करणेस्तव रू.४७.५० कोटी निधीस मान्यता प्रदान केलेली होती. यामध्ये ६० टक्के केंद्र हिश्याचा निधी रू.२८.५० कोटी तर ४० टक्के राज्य हिश्याचा निधी रू.१९,०० कोटीचा समावेश होता. सद्यस्थितीत राज्यात लिंगविनिधीत वीर्यमात्रा निर्मिती करणा-या दोन प्रयोगशाळा कार्यरत असण्याची बाब व पशुसंवर्धन विभागामार्फत नव्याने प्रयोगशाळेची उभारणी करून त्यामधून प्रत्यक्ष लिंगविनिश्चीत वीर्यमात्रांचे उत्पादन आणि प्रती लिंगविनिधीत वीर्यमात्रा उत्पादन खर्च या बाबींचा विचार करता, नव्याने प्रयोगशाळेची उभारणी करणे ही बाब वगळून Genus Breeding India Pvt. Ltc. (ABS India) या संस्थेबरोबर केलेल्या करारनाम्यान्वये लिंगविनिश्चीत केलेल्या वीर्यमात्रा उत्पादित करून खरेदी करण्यास मान्यता प्रदान करण्याची विनंती अर्धशासकीय पत्र दि. ११.११.२०१९ अन्वये केंद्र शासनास करण्यात आलेली होती. त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या दि.२१.०१.२०२१ च्या पत्रान्वये या कार्यक्रमांतर्गत पाच वर्षाच्या कालावधीत एकूण ६.८० लक्ष लिंगविनिक्षीत केलेल्या वीर्यमात्रा खरेदी करण्यास मान्यता प्रदान केलेली आहे. यासाठी एकूण रू.२९५९.०० लक्ष निधीची आवश्यकता असून, यापैकी केंद्र शासनाचा ६० टक्के निधी रू.१७७५.३० लक्ष मंजूर केलेला आहे व उर्वरित रू.११८३.५० लक्ष ४० टक्के राज्य शासनाचा हिस्सा रहाणार आहे.
सन २०१८-१९ मध्ये केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे वाचा क्र. २ येथील विविध दोन निधी वितरण आदेश दि.२८.०२.२०१९ अन्वये अनुक्रमे रू.१७.०० कोटी (सर्वसाधारण योजना) व रू.१.६३ कोटी (अनुसूचित जाती उपयोजना) असा एकूण रू.१८.६३ कोटी निधी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ या अंमलबजावणी यंत्रणेस केंद्र शासनाकडून थेट वितरित झालेला आहे. तसेच, या कार्यक्रमासाठी विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी राबवावयाच्या उपाययोजनांचा विशेष कार्यक्रम -२०१८ अंतर्गत सन २०१९ च्या पावसाळी अधिवेशनात नविन बाब प्रस्तावाद्वारे अर्थसंकल्पित करण्यात आलेला ४०% राज्य हिश्याच निधी रू.६.२१ कोटी आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांचेमार्फत महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाकडे वितरित करण्यात आलेला आहे.
करिता, राज्य शासनाकडून वितरित करण्यात आलेला ४० टक्के राज्य हिश्याचा निधी रू.६२१.०० लक्षच्या प्रमाणात ६० टक्के केंद्र हिश्याचा निधी रू.९३१.५० लक्ष (केंद्र शासनाकडून महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाकडे थेट वितरित झालेला निधी रू.१८६३,०० लक्ष पैकी) असा एकूण रू.१५५२.५० लक्ष निधीमधून लिंगविनिश्चीत केलेल्या वीर्यमात्रा Genus Breeding India Pvt. Ltd. (ABS India) यांचेकडून महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामार्फत खरेदी करून त्याचा वापर क्षेत्रिय स्तरावर गाई – म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यासाठी करण्याच्या योजनेस शासनाची मान्यता प्रदान करण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सहाय्यित (६०:४०) राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत राज्याच्या पशुपैदास धोरणास अधिन राहून, राज्यातील गाई म्हशींमध्ये शेतक-यांच्या पसंतीनुसार सन २०२१-२२ पासून पुढील पाच वर्षांच्या कालावधीत Genus Breeding India Pvt. Ltd. (ABS India) यांचेसमवेत महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर यांनी दि.१३.०९.२०२० रोजी केलेल्या करारनाम्यानुसार व केंद्र शासनाने मान्यता प्रदान केल्यानुसार, संबंधित संस्थेकडून पहिल्या, दुस-या, तिस-या, चौथ्या व पाचव्या वर्षी अनुक्रमे ०.७५ लक्ष, १.२५ लक्ष, १.५० लक्ष, १.६० लक्ष व १.७० लक्ष अशा एकूण ६.८० लक्ष लिंगविनिश्चीत केलेल्या वीर्यमात्रा पाच वर्षे कालावधीत प्रति लिंगविनिश्चीत वीर्यमात्रा रू.५७५/- या दराने राज्य शासनाचा ४० टक्के राज्य हिस्सा उपलब्धतेच्या अधिन राहून खरेदी करून त्यांचा वापर राज्यातील गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यात करण्यास याद्वारे, शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
या कार्यक्रमांतर्गत एका लिंगविनिश्चीत केलेल्या वीर्यमात्रेची किंमत रू.५७५/- असून, त्यापैकी रू.२६१/ केंद्र शासनाचा हिस्सा, रू.१७४/- राज्य शासनाचा हिस्सा असून, उर्वरित रू.१४०/- पैकी रू.१००/- दुध संघामार्फत व जेथे दुध संघ कार्यरत नाही, अशा ठिकाणी सदरचा खर्च महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाने करावयाचा आहे. या कार्यक्रमांतर्गत ज्या शेतक-याच्या गाय/म्हशीमध्ये लिंगविनिश्चीत केलेल्या वीर्यमात्रा वापरून कृत्रिम रेतन केलेले आहे, अशा शेतक-यास उर्वरित रू.४०/- अधिक कृत्रिम रेतनासाठीचे शासनास देय असलेले सेवाशुल्क रू.४१/- असे एकूण रू.८१/- अदा करावे लागणार आहेत.
वरीलप्रमाणे लिंगविनिश्चीत केलेल्या वीर्यमात्रा राज्यातील सहकारी/खाजगी दुध संघांतर्गत त्यांच्या सभासदांकडील गाई/ म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमांमर्गत वापर करण्यासाठी संबंधित दूध संघांना मागणी प्रमाणे सदरच्या लिंगविनिश्चीत वीर्यमात्रा रू. १८१/- प्रति वीर्यमात्रा या दराने उपलब्ध करून देण्यात याव्यात. गाई म्हशींमधील कृत्रिम रेतनापोटी शेतकरी/ पशुपालकांकडून कोणत्याही परिस्थितीत प्रति वीर्यमात्रा रु. ८१/- पेक्षा जास्त सेवाशुल्क आकारणी दुध संघांना करता येणार नाही.
Genus Breeding India Pvt. Ltd. (ABS India) यांचे समवेत महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाने केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तीची काटेकोरपणे पूर्तता होत असल्याबाबतची खातरजमा मंडळाने करावयाची आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर यांनी सदरचा कार्यक्रम राबवुन झाल्यानंतर लिंगविनिश्चीत केलेल्या वीर्यमात्रा वापरुन कृत्रिम रेतनानंतर प्रति वासरु निर्मितीसाठी लागलेल्या वीर्यमात्रा यासह जन्मलेल्या मादी व नर वासरांची टक्केवारी याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांच्याकडे सादर करावा व आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांनी सदरचा अहवाल त्यांच्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शासनास सादर करणार.
क्षेत्रिय स्तरावर लिंगविनिश्चीत वीर्यमात्रा वापरुन गाई-म्हशींमध्ये केलेल्या कृत्रिम रेतनाच्या नोंदी स्वतंत्रपणे ठेवण्याबाबत महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाकडून सर्व संबंधितांना सत्वर कळविण्यात येणार.
लिंगविनिश्चीत केलेल्या वीर्यमात्रा वापरुन गाई-म्हशींमध्ये केलेल्या कृत्रिम रेतनानंतर जन्मलेल्या यादृच्छिक (रॅन्डमली) ५ टक्के वासरांची पालकत्व चाचणी (पॅरेंटेज टेस्ट) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर यांनी करणे बंधनकारक राहील.
सदरचा कार्यक्रम राज्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक त्या सविस्तर मार्गदर्शक सूचना आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांनी सर्व संबंधितांना तात्काळ निर्गमित करणार.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
Kadhi pasun chalu honar hai Gokul mishan……