वृत्त विशेषमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी योजना

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना !

विद्यार्थ्यांना अपघातामुळे पोहोचलेल्या क्षतीची काही प्रमाणात नुकसान भरपाई व सुरक्षा कवच देण्याच्या दृष्टीने राज्यातील इयत्ता १ ली ते १२ पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना “विमा कंपन्यामार्फत संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक २० ऑगस्ट, २००३ पासून राबविण्यात येत होती. यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे विम्याचे हप्ते एकत्रितरित्या शासनाकडून अदा करण्यात येत होते.

विमा कंपन्या विविध कारणे सांगून विद्यार्थ्यांना भरपाई देण्याबद्दल टाळाटाळ करीत होत्या किंवा उशिर लावत होत्या. विद्यार्थ्यांच्या अपघाताचे दावे लवकर निकाली लागत नसल्याबाबत विमा कंपन्यामार्फत योजना बंद करून त्या ऐवजी “सानुग्रह अनुदान योजना” प्रायोगिक तत्वावर राबविण्याचा निर्णय शासनाने संदर्भाधिन शासन निर्णय दि. ११ जुलै २०११ अन्वये घेतला. सदर योजना दि. २७/०८/२०१० ते दि. २६/०८/२०१२ पर्यंत राबविण्यात आली.

प्रायोगिक तत्त्वावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत राबविण्यात आलेल्या वरील योजनेची प्रभावीरित्या अंमलबजावणी झाली असून मोठ्याप्रमाणावर विदयार्थ्यांना व त्यांच्या पालकांना दिलासा मिळालेला आहे. या योजनेची फलश्रुती लक्षात घेता ही योजना दि. २७ ऑगस्ट २०१२ पासून नियमित स्वरुपात सुरु करण्यात आली आहे. सन २०१३ पासून वाढलेली महागाई व विद्यार्थ्यांचे अपघाताचे वेगवेगळे स्वरूप यानुषंगाने प्रस्तुत योजना सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे:

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना – Rajiv Gandhi Student Accident Sanugrah Grant Scheme:

१. शासन निर्णय क्रमांक पीआरई/२०११/प्र.क्र.२४९/ प्राशि -१, दि. १ ऑक्टोबर, २०१३ अन्वये राबविण्यात आलेल्या राजीव गांधी विदयार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना “खालील सुधारणांसंह नियमित स्वरुपात राबविण्यात यावी.

२. सदरची योजना इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणा- या सर्व मुला/मुलींना लागू राहील.

३. सदर योजनेमध्ये विद्यार्थ्यांचा अपघात/जखमी झाल्यास अनुज्ञेय सानुग्रह अनुदान व त्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे राहतील.

अ.क्र.अपघाताची बाबसानुग्रह अनुदानाची रक्कम रूपयेप्रस्तावासोबत ३ प्रतीत सादर करावयाची कागदपत्रे
1विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यूरू.१,५०,०००/-१. प्रथम खबरी अहवाल
२. स्थळ पंचनामा
३.इन्क्वेस्ट पंचनामा
४. सिव्हील सर्जन यांनी प्रति स्वाक्षरीत
केलेले मयत विद्यार्थ्यांच्या बाबतीत
शवविच्छेदन अहवाल. किंवा
मृत्यू दाखला (सिव्हील सर्जन यांनी
प्रति स्वाक्षरीत केलेले
2अपघातामुळे कायमचे अपंगत्व
(२ अवयव/दोन डोळे किंवा १
अवयव व १ डोळा निकामी)
रु.१,००,०००/-अपंगत्वाच्या कारणाबाबतचे डॉक्टरांचे
अंतिम प्रमाणपत्र सिव्हील सर्जन यांच्या
प्रति स्वाक्षरीसह (कायम अपंगत्वाचे
प्रमाणपत्र)
3अपघातामुळे कायमचे अपंगत्व
(१ अवयव किंवा १ डोळा
कायम निकामी)
रू. ७५,०००/-अपंगत्वाच्या कारणाबाबतचे डॉक्टरांचे
अंतिम प्रमाणपत्र सिव्हील सर्जन यांच्या
प्रति स्वाक्षरीसह (कायम अपंगत्वाचे
प्रमाणपत्र)
4विद्यार्थ्यास अपघातामुळे शस्त्रक्रिया
करावी लागल्यास
प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त रू.१,००,०००/-शस्त्रक्रियेबाबतचे  हॉस्पिटलचे
प्रमाणपत्र सिव्हील सर्जन यांच्या
प्रति स्वाक्षरीसह
5विद्यार्थी आजारी पडून, सर्पदंशाने
किंवा पोहताना मृत्यू झाल्यास
रु.१,५०,०००/-सिव्हील सर्जन यांनी प्रति स्वाक्षरीत
केलेले मयत विद्यार्थ्यांच्या बाबतीत
शवविच्छेदन अहवाल. किंवा
मृत्यू दाखला
6विद्यार्थी कोणत्याही कारणाने
जखमी झाल्यास (क्रीडा स्पर्धेत
खेळताना, शाळेतील जड वस्तू पडून,
आगीमुळे, विजेचा धक्का,
वीज अंगावर पडून)
प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त रू.१,००,०००/-हॉस्पिटलचे उपचारा बाबतचे प्रमाणपत्र
सिव्हील सर्जन यांच्या प्रति स्वाक्षरीसह

४. विदयार्थ्यांच्या सानुग्रह अनुदानाचे प्रस्ताव तयार करण्याची जबाबदारी विदयार्थ्यांचे पालक व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक/गट शिक्षणाधिकारी/शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक)/शिक्षण निरिक्षक यांची राहील.

५. या योजनेमध्ये खालील बाबींचा सामवेश राहणार नाही.

  • आत्महत्येचा प्रयत्न करणे.
  • आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करुन घेणे.
  • गुन्हयाच्या उद्देशाने कायदयाचे उल्लंघन करताना झालेला अपघात.
  • अंमली पदस्थ्यांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात.
  • नैसर्गिक मृत्यू
  • मोटार शर्यतीतील अपघात

६. या योजनेतंर्गत विद्यार्थ्यांचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदानाची रक्कम पुढील प्राधान्य क्रमानुसार अदा करावीत.

  • विद्यार्थ्याची आई.
  • विद्यार्थ्याची आई हयात नसल्यास वडील.
  • विदयार्थ्याची आई वडील हयात नसल्यास १८ वर्षावरील भाऊ किंवा अविवाहीत बहीण किंवा पालक

७. या योजनेतील प्रस्ताव निकाली काढण्यासाठी खालीलप्रमाणे प्रत्येक जिल्हयात समिती गठित करण्यात येत आहे.

  • जिल्हाधिकारी अध्यक्ष : सदस्य
  • मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद)/महापालिका उप आयुक्त
  • पोलीस अधिक्षक/पोलीस उपायुक्त : सदस्य
  • शिक्षणाधिकारी (माध्यमिक)/प्रशासन अधिकारी (शिक्षण)/ शिक्षण निरिक्षक : सदस्य
  • जिल्हा आरोग्य अधिकारी/सिव्हील सर्जन/सक्षम वैद्यकीय अधिकारी : सदस्य
  • शिक्षणाधिकारी (प्राथमिक/शिक्षण निरिक्षक)/प्रशासन अधिकारी (शिक्षण) : सदस्य सचिव

८. वरिल समितीसमोर इयत्ता १ ली ते ८ वी व ९ वी ते १२ वी मध्ये शिकणाऱ्या मुला/मुलींकरिता प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी अनुक्रमे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची राहील. बृहन्मुंबई शहराकरीता संबंधित शिक्षण निरिक्षक यांनी प्रस्तावांची छाननी करून समितीसमोर सादर करावेत,

योजनेची कार्यपध्दती व संबंधितांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या:

१) पात्र विद्यार्थ्याच्या पालकांने सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव ३ प्रतीत (विवरणपत्र – अ) संबंधित मुख्याध्यापकांमार्फत इयत्ता १ ली ते ८ वी व ९वी ते १२ वी पर्यंतच्या मुला/मुलींकरिता अनुक्रमे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद यांच्याकडे सादर करावे. मात्र, बृहन्मुंबई शहराकरिता सदर प्रस्ताव संबंधित विभागाचे शिक्षण निरिक्षक (पश्चिम/उत्तर/दक्षिण) यांच्याकडे संबंधीत पालकाने दाखल करावे. सदर अर्जाची छाननी शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक)/शिक्षण” निरिक्षक यांनी करावी आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीपुढे निरिक्षक यांनी बैठकीच्यावेळी सादर करावी.)

२. सदर समितीची बैठक आवश्यकतेप्रमाणे तथापि, महिन्यातून किमान एकदा घेण्यात यावी.

३. या योजने अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने सर्व बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा. समितीने प्रस्ताव नाकारल्यास संबंधित पालकांना लेखी स्वरुपात कारणासह कळवावे.

४) समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावांची रक्कम संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक)/शिक्षण निरिक्षक यांनी संबंधित संस्थेच्या मुख्याध्यापकांमार्फत एकाच हफ्त्यात धनादेशाव्दारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ७ दिवसात जमा करावे.

५) या योजनेच्या अंमलबजावणीकरिता आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक)/शिक्षण निरिक्षक यांना आहरण व संवितरण अधिकारी (DDO) म्हणून घोषित करण्यात येत आहे.

६) या योजनेची प्रभावी अंमलबजावणीची सर्व जबाबदारी शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांची राहील. शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी हया योजनेची योग्य ती प्रसिध्दी कराची, वेळोवेळी सर्व संबंधितांचा आढावा घ्यावा व दर महिन्याला शासनाला सविस्तर अहवाल सादर करावा.

दाव्यासाठी करावयाचा अर्ज नमुना: राजीव गांधी विदयार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दाव्यासाठी करावयाचा अर्ज नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय: इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणा-या विद्यार्थ्यांसाठीच्या राजीव गांधी विदयार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत सुधारणा करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत सुधारणा

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.