जन आहार योजना – रेल्वेच्या प्रवाशांसाठी २० रुपयांत जेवण ! (Railway JAN Aahar Yojana)
उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली आहे. रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. अनेकांना आरक्षण मिळत नाही. जनरल डब्यातून लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागत आहे. आरक्षण डब्यात आणि एसी डब्यांमध्ये जेवण आणि पाणी भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कोरपोरेशन (आयआरसीटीसी) दिले जाते, परंतु जनरल डब्यात काहीच मिळत नाही. रेल्वेन जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा विचार केला आहे. जन आहार योजने (JAN Aahar Yojana) अंतर्गत जनरल डब्यात स्वस्तात जेवण आणि पाणी दिले जाणार आहे. 20 आणि 50 रुपयांत जेवण दिले जाणार असून तीन रुपयांत पाण्याचा ग्लास दिला जाणार आहे.
जन आहार योजना (JAN Aahar Yojana):
मेल-एक्स्प्रेसच्या सामान्य कोचने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने किफायतशीर दरात ‘जन आहार – JAN Aahar Yojana’ भोजनाची व्यवस्था केली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने आपल्या महत्त्वाच्या स्थानकांवर आणि प्रमुख टर्मिनसवर ‘जन आहार’ भोजनाचे काऊंटर सुरू केले आहेत. यातून प्रवाशांना २० आणि ५० रुपयांचे जेवणाचे पॅकेट दिले जात आहेत.
यामुळे खासगी विक्रेत्यांकडून भरमसाट किमतीत देण्यात येणारे निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आता रेल्वेतून हद्दपार होतील. उन्हाळी हंगाम सुरू झाल्याने मेल-एक्स्प्रेसना मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत आहे.
त्यातही किफायतशीर प्रवास म्हणून या एक्स्प्रेसच्या सामान्य कोचमधून प्रवास करण्याला सामान्य प्रवाशांकडून पसंती दिली जाते. या प्रवाशांना किफायतशीर दरात चांगले जेवण मिळावे यासाठी रेल्वेने भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनसोबत (आयआरसीटीसी) भागीदारीत जन आहार योजना सुरू केली आहे.
आरक्षित डब्यात आणि एसी डब्यांमध्ये जेवण आणि पाणी भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कोरपोरेशन (आयआरसीटीसी)कडून दिले जाते. परंतु जनरल डब्यांमध्ये अशी काहीच सुविधा नसते. त्यामुळे रेल्वेने जनरल डब्बा (General Coach)तून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा विचार केला आहे.
रेल्वेच्या जेवणात काय असणार?
जन आहार (JAN Aahar Yojana) दोन प्रकारांमध्ये देण्यात येत आहे. इकॉनॉमी जेवण २० रुपये, तर फराळाच्या जेवणाकरिता ५० रुपये दर आकारण्यात येतो. फलाटावर जेथे सामान्य डबा थांबतो, त्याठिकाणी हे काऊंटर सुरू करण्यात आले आहेत. गेल्यावर्षी ही सेवा ५१ स्थानकांवर देण्यात आली होती. यंदा देशातील १०० पेक्षा अधिक स्थानकांवर १५० काऊंटर उघडले आहेत.
२० रु. मध्ये जेवणात काय असणार?
- ७ पुरी (१७५) ग्रॅम,
- बटाट्याची सुकी भाजी (१५० ग्रॅम),
- लोणचे (१२ ग्रॅम)
५० रु. मध्ये जेवणात काय असणार?
- राजमा-छोले चावल /खिचडी /कुलचे- भटुरे छोले/पाव भाजी/मसाला डोसा.
३ रुपयांत पाणी मिळणार.
- ३ रुपयात १ ग्लास (२०० मिली) पाणी.
या महत्त्वाच्या स्थानकांवर असे स्टॉल उभारण्यात आले आहेत.
मध्य रेल्वे – इगतपुरी, कर्जत, मनमाड, खांडवा, बडनेरा, शेगाव, पुणे, मिरज, दौंड, साईनगर शिर्डी, नागपूर, वर्धा, सोलापूर, वाडी आणि कुर्दुवाडी.
पश्चिम रेल्वे – मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, भरूच, वडोदरा आणि चित्तौडगड स्थानक.
हेही वाचा – आता खाद्यपदार्थ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ऑनलाइन मागवता येणार : भारतीय रेल्वेने सुरू केली नवी सेवा !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!