आपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी मंत्रालयकृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

रब्बी पीक विमा योजना : १ रुपयात करा पीक विमा योजनेचा ऑनलाईन अर्ज !

रब्बी हंगामातही केवळ एक रुपयांत रब्बी पीक (Rabbi Pik Vima) विमा भरता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी १५ डिसेंबरची अंतिम मुदत देण्यात आली आहे. रब्बी हंगामात पिकांना विमा सरंक्षण मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीत विमा भरणे गरजेचे आहे.

रब्बी पीक विमा योजना – Rabbi Pik Vima:

रब्बी हंगामातही प्रति अर्ज एक रुपयांत पीक (Rabbi Pik Vima) विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे.

कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिकतेप्रमाणे योजनेत सहभागी होता येईल. पीक (Rabbi Pik Vima) विमा योजना अधिसूचित पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू राहणार आहे.

रब्बी हंगामात विविध पिके अधिसूचित करण्यात आली आहेत. मुदतीपूर्वी शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी व्हावे, यासाठी कृषी विभागाकडून गावस्तरावर जनजागृती केली जात आहे.

पीक विमा अ‍ॅप वरून करा ऑनलाईन अर्ज – Crop Insurance App:

शेतकऱ्यांनी गुगल प्‍ले स्‍टोअर वरुन Crop Insurance App डाउनलोड करा किंवा खालील लिंकवर क्लिक करून मोबाईल मध्ये Crop Insurance App डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/Crop_Insurance

Crop Insurane अ‍ॅप डाउनलोड झाल्यानंतर आपला मोबाईल नंबर, ओटीपी टाकून लॉगिन करायच आहे, अगोदर नोंदणी केली नसेल तर नोंदणीचे तपशील विचारला जाईल तो भरून नोंदणी करावी.

Crop Insurance App Login
Crop Insurance App Login

नोंदणी केल्यानंतर पुनः लॉगिन करून  Apply For These Insurance Schemes या पर्यायावर जायचे आहे. त्यानंतर आपलं राज्य, हंगाम – रब्बी, Scheme – PMFBY , वर्ष – २०२४ निवडायचे आहे व Submit & Next या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

यानंतर जी बँक आपण ऍड केलेली असेल ती बँक आपल्याला दाखवली जाईल. यांच्यामधून बँक आपल्याला सिलेक्ट करायची आहे आणि बँक सिलेक्ट करून Save & Next या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

यांच्यानंतर आपलं पासबुक वरती आपलं पासबुक वरती जे नाव असेल ते नाव आपल्याला या ठिकाणी एंटर करावं लागणार आहे. आधारच पासबुकचं नाव आपलं जमिनीच्या रेकॉर्डचं असलेलं नाव मॅच होणं गरजेचं आहे.

यानंतर नाव, आपला आधार नंबर, मोबाईल नंबर, वडिलांचं नाव, पूर्ण ऍड्रेस, कॅटेगरी, फार्मर कॅटेगरी, राहण्याचा पत्ता आहे तो या ठिकाणी दाखवला जाईल याच्यात काही ब्लॅंक असेल तर आपण भरू शकता परंतु आपण नवीन रजिस्ट्रेशन करत असताना सर्व भरलेली माहिती या ठिकाणी दाखवली जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला Next वरती क्लिक करायचं आहे.

Next वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पिकाची माहिती निवडायची आहे ज्याच्यामध्ये जिल्हा, तालुका, रेव्हेन्यू सर्कल, ग्रामपंचायत, गाव ही माहिती आपल्याला सिलेक्ट करायचे आहे आणि Proceed वरती क्लिक करायचं आहे.

Proceed वरती क्लिक केल्यानंतर पुढच्या पेज वरती पिकाची माहिती निवडायची आहे ज्याच्यामध्ये Crop Type मध्ये आपलं पीक Individual किंवा Mix आहे त्यावरती क्लिक करा. Individual वरती क्लिक केल्यावर पिके दाखवली जातील त्यातील पीक सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर लागवडीची तारीख, Ownership मध्ये स्वतः मालक आहात का ते सिलेक्ट करा, सर्वे नंबर व खाते नंबर टाकून Proceed वरती क्लिक करायचं आहे.

यानंतर जमिनीची माहिती दाखवली जाईल यामध्ये जी जमीन व्हेरिफाय होत आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे व Proceed वरती क्लिक करायचं आहे.

यानंतर आपली एकूण जमीन दाखवली जाईल आता याच्यामध्ये तुम्ही जर पूर्वी पीक विमा भरलेला असेल तर किती जमीन तुम्ही पिक विमा (Rabbi Pik Vima) भरण्यासाठी वापरली आहे ते दाखवलं जाईल व किती शिल्लक जमीन आहे ते या ठिकाणी दाखवले जाईल ती सर्व माहिती पाहून Proceed वरती क्लिक करायचं आहे.

Proceed वरती क्लिक केल्यानंतर आपण निवडलेली जी काही पिकासाठी जमीन आहे ती एकत्रित दाखवली जाईल याच्या मधून जेवढी जमीन आपल्याला पिक विमा (Rabbi Pik Vima) साठी भरायची आहे तेवढी त्या ठिकाणी टाकायची आहे त्यानुसारचा हप्ता आपल्याला दाखवला जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे.

त्यानंतर आपल्याला पेमेंट संदर्भातील माहिती दाखवली जाईल त्या माहितीला पाहायचे आहे, अजून पिक ॲड करायचं असेल तर पिक ॲड करू शकता नसेल तर Proceed वरती क्लिक करायचं आहे. Proceed वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बँक पासबुक, जमिनीचा सातबारा आणि पीक पेरा प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे व Submit पर्यायावर क्लिक करायचे आहे.

Submit केल्यानंतर पेमेंट करायचं आहे पेमेंट करण्यापूर्वी तुम्ही जी भरलेली पॉलिसी आहे त्याचा एक Preview दाखवला जाईल हा Preview पूर्णपणे पहायचा आहे आणि प्रोसेस वरती क्लिक करायचं आहे यानंतर आपली पॉलिसी जनरेट झाल्याचा मेसेज या ठिकाणी येईल.

यानंतर ऑनलाइन पेमेंट आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, क्यू आर कोड अशा वेगवेगळ्या माध्यमातून करू शकता.

सामूहिक CSC सेवा केंद्रावर भरता येईल ऑनलाईन अर्ज:

पीक (Rabbi Pik Vima) विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना सहजपणे अर्ज करता यावा, यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज संकेतस्थळावर स्वतः तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र यांच्यामार्फत अर्ज करता येतो.

मुदतीपूर्वी विमा भरावा.

पिकांना विमा संरक्षण असल्यास नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास भरपाई म्हणून विमा कंपनीकडे मोबदला मागता येतो. त्यासाठी रब्बी हंगामात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतीपूर्वी अर्ज करणे गरजेचे आहे.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for Rabbi Pik Vima) : 1 रुपयात पीक (Rabbi Pik Vima) विम्याचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

पीक विमा अ‍ॅप (Rabbi Pik Vima App): पीक विमा अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

विमा कंपनी संपर्क: विमा कंपनी संपर्क यादीसाठी इथे क्लिक करा.

सामायिक सुविधा केंद्राच्या (CSC) माध्यमातून विमा अर्ज (Crop Insurance Application) भरताना शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपया प्रमाणे शुल्क देणे अपेक्षित आहे. यासाठी शेतकऱ्याने स्वतःचा सातबारा आठ अद्ययावत उतारा व इतर कागदपत्रे बरोबर घेऊन जाणे अपेक्षित आहे.

याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्काची मागणी सामायिक सुविधा केंद्र चालकाने केल्यास याबाबत तक्रार खालील टोल फ्री क्रमांक वर करण्यात यावी, याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे कळविण्यात आले आहे.

सीएससी गव्हर्नर सर्विसेस इंडिया लिमिटेड

टोल फ्री क्रमांक :- १४५९९/१४४४७

व्हाट्सअप क्रमांक :- ९०८२६९८१४२

तक्रार नोंद क्रमांक :- ०११- ४९७५४९२३ /४९७५४९२४

खालील लेख देखील वाचा!

  1. PMFBY Crop insurance : फळपिक विमा योजना सुरु २०२४!
  2. नैसर्गिक संकटात शेतीचं नुकसान झालंय? मग पीक विम्याचा दावा करताना या गोष्टी लक्षात ठेवल्यास नुकसान भरपाई मिळू शकते ! – Crop Insurance Claim
  3. सर्वसमावेशक पीक विमा योजना : “एक रुपयात पीक विमा”
  4. आंबिया बहार फळ पीक विमा योजना : फळ पीक विमा योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
  5. या अपात्र शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याची रक्कम !
  6. आधार कार्ड व सातबारा उताऱ्यावरील नावात अल्प बदल असेल तरी पीक विमा अर्ज स्वीकारणार!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.