रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी ‘या’ दिवसापासून सुरू होणार !
राज्यात रब्बी हंगाम २०२४ पासून ई-पीक पाहणी (Rabbi EPik Pahani) डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करावयाची आहे. दिनांक १ डिसेंबर २०२४ पासून राज्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम २०२४ सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पात शेतकरी स्तरावरून व सहायक स्तरावरून मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंद करण्यात येणार आहे.
रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी – Rabbi EPik Pahani:
खालील प्रमाणे रब्बी हंगाम २०२४ करिता ई-पीक (Rabbi EPik Pahani) पाहणीसाठी कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे.
शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी | सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी | ||
हंगाम | कालावधी | हंगाम | कालावधी |
रब्बी | १ डिसेंबर २०२४ ते १५ जानेवारी २०२५ | रब्बी | १६ जानेवारी २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२५ |
सुरवातीला शेतकरी स्तरावरून Mobile App द्वारे ई-पीक पाहणी (Rabbi EPik Pahani) नोंद करण्यात येते व शेतकरी स्तरावरील कालावधी संपल्यानंतर सहायकांमार्फत उर्वरित शेतकऱ्यांची पीक पाहणी Mobile App द्वारे नोंदवण्यात येते.
तसेच डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मध्ये गटाच्या हद्दीवर आधारित Geo Fencing बंधनकारक करण्यात आलेली आहे म्हणजेच जोपर्यंत संबधित खातेदार/सहायक निवडलेल्या गटात जाऊन पीक(Rabbi EPik Pahani) पाहणी करत नाही तो पर्यत पिकांचे छायाचित्र काढता येत नाही व पीक (Rabbi EPik Pahani) पाहणी upload करता येत नाही.
Geo Fencing बंधनकारक असल्यामुळे गाव नकाशे अद्यावत असल्याची खात्री भूमी अभिलेख कार्यालयामार्फत करून घेणे आवश्यक आहे. शेतकरी स्तरावरून नोंदवलेल्या ई-पीक (Rabbi EPik Pahani) पाहणी पैकी १०% तपासणी साठी ग्राम महसुल अधिकारी यांना उपलब्ध करून देण्यात येईल.
शेतकरी स्तरावरील कालावधीत १०% ई-पीक (Rabbi EPik Pahani) पाहणी तपासणी करणे ग्राम महसुल अधिकारी यांची जबाबदारी आहे. शेतकरी स्तरावरील कालावधी संपल्यानंतर १० % तपासणी प्रलंबित असलेली ई-पीक (Rabbi EPik Pahani) पाहणी ग्राम महसुल अधिकारी यांना तपासता येणार नाही.
ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करा (EPik Pahani App): ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
ई-पीक पाहणी संबंधीत खालील महत्वपूर्ण लेख वाचा !
- ई-पीक पाहणी ॲपद्वारे खातेदार नोंदणी कशी करायची? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!
- ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पाहणी नंतर 48 तासांच्या आत केव्हा ही दुरुस्त किंवा रद्द करता येणार !
- ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची माहिती कशी नोंदवावी? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!
- ई-पीक पाहणी ॲपद्वारे कायम पड/चालू पड क्षेत्राची माहिती कशी नोंदवावी? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!
- ई-पीक पाहणी ॲपद्वारे आपल्या शेताच्या बांधावरील झाडे कशी नोंदवावी? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!
- ई-पीक पाहणी पीक नोंदणी सारांश अहवाल ऑनलाईन कसा पाहायचा? सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा!
- पिकांची नोंद करतानाच आता मिळणार जीआयएस नकाशा, एकाच ॲपमधून होणार नोंदणी !
- E-Peek Pahani FAQ : ई-पीक पाहणी मोबाईल ॲप वापरताना नेहमी उद्भवणाऱ्या प्रश्नांची उत्तरे !
- ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रियेतील तरतुदींमध्ये सुधारणा !
- ई-पीक पाहणी बाबत मार्गदर्शक सूचना – E-Peek Pahani Guidelines
- पिकांची नोंद करतानाच आता मिळणार जीआयएस नकाशा, एकाच ॲपमधून होणार नोंदणी !
- ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- गाव नमुना सातबारा (७/१२) उतारा म्हणजे काय? सातबारा उताऱ्या विषयीची संपूर्ण माहिती !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!