प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना – कृषि प्रक्रिया उद्योगांकरीता प्रोत्साहन योजना (PMFME)
केंद्र शासन सहाय्यित आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme. राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारच्या सहकार्याने अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने (एमओएफपीआय) अस्तित्वातील उन्नतीकरणासाठी आर्थिक, तांत्रिक आणि व्यवसाय सहाय्य करण्यासाठी अखिल भारतीय केंद्रीय पुरस्कृत पंतप्रधान औपचारिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्यम योजना (पीएम एफएमई योजना) सुरू केली आहे.
कृषि प्रक्रिया उद्योगांकरीता १ लाख ते १ कोटीपर्यंत प्रोत्साहन योजना आहे. एक जिल्हा एक उत्पादन “(ODOP – One District One Product) या आधारावर राबविली जाणार आहे. सदर योजनेंतर्गत स्थानिक उत्पादनांना (Vocal for Local) प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
योजनेचा उद्देश:
१. सध्या कार्यरत असलेले व नवीन स्थापित होणारे ODOP उत्पादनांवर आधारीत वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक गट/संस्था/कंपनी, स्वयं सहाय्यता गट व सहकारी उत्पादक संस्था यांची पतमर्यादा वाढविणे.
२. उत्पादनांचे बॅन्डींग व विपणन अधिक बळकट करुन त्यांना संघटीत अशा पुरवठा साखळीशी जोडणे.
३.महाराष्ट्रातील 21998 सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना औपचारिक रचनेमध्ये आणण्यासाठी सहाय्य करणे.
४. सामाईक सेवा जसे की सामाईक प्रक्रिया सुविधा, साठवणुक, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वंकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे.
५.अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण यावर भर देणे.
योजनेचे स्वरुप-
- केंद्र पुरस्कृत योजना
- केंद्र:राज्य निधी 60:40 या प्रमाणात
- एक जिल्हा एक उत्पादन ठरवणार व त्याप्रमाणे त्या उद्योगांना लाभ मिळणार.
समाविष्ट जिल्हे:
महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्हे (मुंबई शहर व मुंबई उपनगर सामाविष्ट)
पात्र लाभार्थी:
1) वैयक्तिक लाभार्थी – वैयक्तिक लाभार्थी, भागीदारी संस्था, बेरोजगार युवक, महिला, प्रगतशील शेतकरी, मर्यादित भागिदारी संस्था (LLP), भागिदारी संस्था इ.
- उद्योगामध्ये १० पेक्षा कमी कामगार कार्यरत असावेत.
- अर्जदाराचा उद्योगावर मालकी अधिकार (प्रोपायटरी/भागीदारी) असावा.
- अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे व शिक्षण किमान आठवी पास असावे. एका कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल.
- सदर उद्योगाला औपचारिक दर्जा प्राप्त करुन देण्याची तयारी असावी.
- पात्र प्रकल्प किंमतीच्या किमान 10-40% लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित बँक मुदत कर्ज घेण्याची तयारी असावी.
2) गट लाभार्थी- शेतकरीगट/ कंपनी/ संस्था, स्वयंसहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्था इ.
- एक जिल्हा एक उत्पादन” (ODOP) धोरणानुसार निवडलेल्या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये कार्यरत शेतकरी उत्पादक गट/कंपनी/संस्था/स्वयं सहायता गट/उत्पादक सहकारी संस्था यांना नवीन उद्योगाना प्राधान्य दिले जाईल.
- कंपनीची उलाढाल ही किमान रु.१ कोटी असावी.
- कंपनीच्या सध्याच्या आर्थिक उलाढालीपेक्षा अधिक किंमतीचा प्रस्ताव असू नये.
- कंपनीच्या सभासदांना हाताळल्या जाणाऱ्या उत्पादनाबाबत पुरेसे ज्ञान व अनुभव असावा, तसेच सदर उत्पादनाच्या बाबतीतील किमान ३ वर्षाचा अनुभव असावा.
- प्रकल्प किंमत व खेळत्या भांडवलासाठी 10-40% स्वनिधी भरण्यासाठीची तरतूद शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये असावी किंवा सदर रक्कमेची राज्य शासनाची हमी असावी.
प्रकल्प खर्चा मध्ये जमिनीचा खर्च समाविष्ट करण्यात येऊ नये. बांधकाम किंवा भाड्याने घेतलेले शेड याचा अंतर्भाव करता येईल. मात्र भाडे हे जास्तीत जास्त 3 वर्षा पर्यंतचेच प्रकल्प खर्चामध्ये अंतर्भूत करता येईल.
किती अनुदान मिळेल:
१) सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी मिळणारे अनुदान :-
प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के किंवा जास्तीत जास्त रु. 10 लाख इतके अनुदान मिळेल. प्रकल्प उभारणी साठी बँके कडून कर्ज घेणे आवश्यक आहे. कर्जा शिवाय प्रकल्पामध्ये लाभार्थिचा स्वत:चा हिस्सा म्हणून प्रकल्पाच्या किमान 10 टक्के रक्कम असणे आवश्यक आहे.
स्वयंसहायता गटाच्या सदस्यांनाही वरील प्रमाणे 35 टक्के किंवा जास्तीत जास्त रु. 10 लाख अनुदान मिळेल. त्याच बरोबर जे सदस्य हे अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये गुंतलेले आहेत अशाच सदस्यांना बीज भांडवल म्हणून प्रत्येक सदस्याला रु.40000 हे खेळते भांडवल तसेच छोटी उपकरणे खरेदी करण्यासाठी देय आहे. अशा प्रकारे एका गटाला बीज भांडवल हे जास्तीत जास्त रु. 4 लाख रु. मिळेल.
स्वयंसहायता गटातील सर्वच सदस्य हे अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधीत नसतील त्यामुळे बीज भांडवल हे स्वयं सहायता गटाच्या फेडरेशन ला देण्यात येईल.
२) मार्केटिंग व बँडिंगसाठी मिळणारे अनुदान : – पात्र प्रकल्पाच्या 50% अनुदान
शेतकरी उत्पादक संघ (FPO)/उत्पादकांच्या सहकारी संस्था/स्वयंसहायता गट किंवा सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग एसपीव्ही यांना उत्पादनाचे मार्केटिंग व ब्रँडिंग साठी लागणारे एकुण खर्चाच्या 50 टक्के अनुदान देय आहे. सदरचे उत्पादन हे एक जिल्हा एक उत्पादनाशी संबंधीत असावे. अंतीम उत्पादन हे ग्राहकांना किरकोळ विक्री पॅक मध्ये विकणे आवश्यक आहे. तसेच सदरच्या उत्पादनाचा टर्नओव्हर हा किमान रु.5 कोटी असावा.
३) सामायिक पायाभूत सुविधा निर्माण करणे साठी मिळणारे अनुदान : – पात्र प्रकल्पाच्या 35% अनुदान.
हे अनुदान शेतकरी उत्पादक संघ (FPO)/उत्पादकांच्या सहकारी संस्था/ स्वयंसहायता गट/कोणतीही शासकीय यंत्रणा किंवा खाजगी उद्योग यांना देण्यात येते.
यासाठी 35 टक्के अनुदान आहे. रु.10 लाख पेक्षा जास्त अनुदानाचे प्रस्ताव केंद्र शासनाच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडे पाठवावे लागतात.
या बाबी अंतर्गत शेतामध्ये असेइंग, संकलन, प्रतवारी, गोदाम, शीत गृह. सामायिक प्रक्रिया सुविधा (एक जिल्हा एक उत्पादन यावर प्रक्रिया करण्यासाठी) या सामायिक पायाभूत सुविधा उभारता येतात.
शेतकरी उत्पादक संघ (FPO)/उत्पादकांच्या सहकारी संस्था/ स्वयंसहायता गट यांना प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी प्रत्येक प्रकरणी रु.50000 इतके अर्थसहाय्य देण्यात येईल.
पात्र प्रकल्प
नाशवंत शेतीमाल जसे फळे व भाजीपाला, तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, मत्स्योत्पादन, मसाला पिके, दुग्ध व पशुउत्पादन, किरकोळ वनउत्पादने इ. मध्ये सद्यस्थितीत कार्यरत- ODOP/ Non ODOP उत्पादनांमध्ये कार्यरत सुक्ष्म अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे स्तरवृद्धी/ विस्तारीकरण/आधुनिकीकरण या लाभासाठी पात्र असतील. नविन स्थापित होणारे सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग केवळ ODOP पिकांमध्ये असावेत.
आर्थिक मापदंड
1. वैयक्तिक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडीत एकुण पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% जास्तीत जास्त रु. 10.00 लाखाच्या मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे. त्याकरिता www.pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावरील PMFME MIS PORTAL वर Online अर्ज सादर केले जातात.
2. शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संस्था/कंपनी, स्वयं सहाय्यता गट/उत्पादक सहकारी संस्था यांना सामान्य पायाभुत सुविधा व भांडवली गुंतवणुकीकरिता इ. करिता बँक कर्जाशी निगडीत एकुण पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% अनुदान देय आहे. याकरिता कमाल आर्थिक मर्यादा केंद्र शासनाकडून विहीत करण्यात येईल. या घटकासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर केले जातील.
3. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये कार्यरत स्वयं सहाय्यता गटातील सदस्यांना खेळते भांडवल छोटीमशिनरी घेण्याकरिता प्रती सदस्य रु. 40,000/ -बीज भांडवल रक्कम देण्यात येणार आहे.
प्रक्रियेसाठी कोणती उत्पादने येऊ शकतात:-
सागरी उत्पादने –
मत्स्य मासे लोणचे, सुकवलेले मासे, डबाबंद मासे, खारवलेले मासे, गोठवलेले मासे, चिप्स, वेफर्स, पापड, फिश Popcorn, नगेट्स, टिक्की, समोसा, पकोडा, इत्यादी.
नाचणी – पीठ, पापड, बिस्कीटे, कुकीज, नाचणी सत्व, चकली, इडली, शंकरपाळी, इत्यादी.
भगर – पीठ, भगर, इत्यादी.
चिकू – स्कॅश, पल्प, जाम, जेली, नेक्टर, स्लाईसेस, आईसक्रिम, कँडी, पावडर, ज्यूस, चॉकलेट, चॉकलेटबार, फुटबार, वडी, ड्रायफ्रूट बर्फी फ्लेक्स, इत्यादी.
आंबा – पल्प, जाम, जेली, मुरंबा, स्कॅश, नेक्टर, कोकटेल, स्लाईसेस, आईसक्रिम, ड्राइड स्लाईसेस, डबाबंद, ज्यूस, गोठवलेले, लोणचे, चटणी, फुटबार, लश, सॉस, कुंदा, सॉफ्टकँडी, अल्कोहल विरहित पेय, इत्यादी.
केळी – चिप्स, प्यूरो, पल्प, वाईन, पावडर, वेफर्स, Concentrate, Figs, Flour, फ्रोझन इत्यादी.
कांदा – फ्राईड कांदा, Dehydrated Onion Flakes, पेस्ट, पावडर, Strips, ऑईल, सॉस, लोणचे इत्यादी.
टोमॅटो केचअप, जाम, प्यूरी, सॉस, कॅन टोमॅटो, पेस्ट, टोमॅटो चटणी, RTE, सूप, ज्यूस, लोणचे, इत्यादी.
दुग्ध व दुग्धजन्य – बासुंदी, पनीर, लोणी, चीझ, आईसक्रिम, तूप, लस्सी, श्रीखंड, ताक, पेये, विप क्रिम, फॅट मिल्क, दही, दूध पावडर, व्हे प्रोटीन, खवा, मावा, छन्ना, संदेश, पेढा, कलाकंद, कुल्फी, रबडी, बर्फी, चक्का, श्रीखंड वडी, रसमलाई, रसगुल्ला, इत्यादी.
ज्वारी – Flakes, पिठ, पापड, माल्ट, कुकीज, स्टार्च, इत्यादी.
गहू – Flakes, पिठ, ब्रेड, माल्ट, बिस्कीट, कुकीज, स्टार्च, इत्यादी.
गुळ – गुळ पावडर, ज्यूस, यीस्ट, मॉलॅसेस, काकवी, इत्यादी.
द्राक्षे – बेदाणा, वाईन, ज्यूस, विनेगार, Sweet spreads, मनुका, वाईन स्वॅश, लोणचे, इत्यादी.
मका – कॉर्न सिरप, पीठ, Flakes, ऑईल, स्टार्च, Corn Stalk Fiddle, सॉस, पॉपकॉर्न इत्यादी.
मोसंबी – ज्यूस, पल्प, RTS पेय, सिरप, जाम, जेली, नेक्टर, सायट्रीक ऍसिड, Concentrate, Marmalade, ड्रायफ्रूट, इत्यादी.
सिताफळ – पल्प, जाम, जेली, पावडर, सीड ऑईल, आईसक्रिम, रबडी, बर्फी, ड्राइड स्नॅक्स, ज्यूस, कँडी, इत्यादी.
पेरू – ज्यूस, जाम, जेली, पल्प, नेक्टर, टॉफी, RTS पेय, वाईन, प्यूरी, चॉकलेट, चीज, फुटबार, टॉफीज, इत्यादी.
हरभरा – बेसन पीठ, नमकीन, फूटाणे, डाळ इत्यादी.
तुर – डाळ, पीठ, इत्यादी.
मूग – पापड, डाळ, पीठ इत्यादी.
हळद पावडर – डाईड रायझोम, इत्यादी.
मिरची – पावडर, ड्राईड मिरची, Flakes, लोणचे, डीहायड्रेशन, इत्यादी.
संत्रा ज्यूस, पल्प, RTS पेय, सिरप, जाम, जेली, नेक्टर, सायट्रीक ऍसिड, Mandarin Concentrate, Marmalade तेल – mandarin essential oil, Clementine Oil, इत्यादी.
सोयाबिन – तेल, टोफू, सोयामिल्क, सोयानट, सोयाचन्क, सोया प्रोटिन, सोया सॉस, सोया स्टिक, सोया चिप्स, पीठ, इत्यादी.
जवस -चटणी, तेल, इत्यादी.
भात. पोहा, मुरमुरे, पीठ, पापड, ऑईल, Parboiled Rice, Flakes, बिअर, इत्यादी.
किरकोळ वन उत्पादने – हिरडा पावडर, महुवा- तेल/पावडर/ केक/बिस्कीट कुकीस/लोणचे/ इत्यादी. मशरुम – सुकवलेले मशरुम/ बिस्कीट/कुकीस, मध, डिंक, इत्यादी.
योजनेचा कालावधी – सन 2020-21 ते 2024-25
ऑनलाईन अर्ज :
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील केंद्र सरकारच्या संकेतस्थळाला भेट द्या.
ऑनलाईन नोंदणी (Online Registration) दुव्यावर क्लिक करुन वापरकर्ता वेबसाइटवर नोंदणी करा.
कोणत्याही नवीन वापरकर्त्यास या योजनेत नोंदणी करण्यासाठी, कृपया साइन अप वर क्लिक करा.
पुढील अर्ज सबमिशन प्रक्रिया जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी पीएमएफएमई मार्गदर्शक तत्त्वे पाहण्यासाठी इथे क्लिक करा
हेही वाचा – पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी उद्योगांना ९० टक्के कर्ज; ऑनलाईन अर्ज सुरु
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
I want to join such food processing industry installation in Pune District in village KOREGAON BHIMA PUNE MAHARASHTRA STATE INDIA
I have 1 hector my own land on my 7/12certificate of reveiwnew department
So I want to join above loan scheme
Please help me for loan programme to me
9657297778