पंचायत निहाय घरकुल यादी, हप्त्याचा तपशील व FTO ट्रॅकिंग या ॲपवर चेक करा !
आपण जर ग्रामीण आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला असेल तर आता सरकारनं लाभार्थ्यांची (Gharkul Yadi) नावं जाहीर करायला सुरुवात केली आहे. आपल्या घरकुलासाठी केलेल्या ज्या अर्जांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे, त्या त्या लाभार्थ्यांची नावे जाहीर केली जात आहेत. जसं जसं लाभार्थ्यांची नावं मंजूर होतील, तसंतशी त्यांची नावं या यादीत समाविष्ट केली जाणार आहेत.
या लेखा मध्ये आपण ग्रामीण लाभार्थ्यांची पंचायत निहाय PWL यादी (Gharkul Yadi), हप्त्याचा तपशील, FTO ट्रॅकिंग, नागरिक तपशील आणि एककेंद्राभिमुखता तपशील, इत्यादी माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत.
घरकुल यादी, हप्त्याचा तपशील व FTO ट्रॅकिंग या ॲपवर चेक करा ! Gharkul Yadi:
सर्वप्रथम आपल्याला मोबाईल मध्ये प्लेस्टोर मधून किंवा खालील लिंक वर क्लिक करून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) आणि राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभाग, केंद्र सरकारचे UMANG ऍप इन्स्टॉल करायचे आहे.
https://play.google.com/store/apps/UMANG
UMANG ऍप इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करून आपली भाषा निवडायची आहे आणि I Agree to terms येथे क्लिक करुन Next वरती क्लिक करायचे आहे.
पुढे आपल्यासमोर Register आणि Log-in हे दोन पर्याय पाहायला मिळतील. प्रथम तुम्हाला Register या पर्यायावर क्लिक करून आपले अकाउंट रजिस्टर करा. जर आपले अकाउंट आधीपासूनच रजिस्टर असेल तर मोबाईल नंबर व MPIN टाकून लॉगिन करा.
PMAY या पर्यायावर क्लिक केल्यानंतर प्रथम आपली मराठी भाषा निवडा. पुढे आपल्याला विविध पर्याय पाहायला मिळतील.
- FTO ट्रॅकिंग.
- पंचायत निहाय PWL यादी.
- हप्त्याचा तपशील.
- नागरिक तपशील.
- एककेंद्राभिमुखता तपशील.
घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची पंचायत निहाय PWL यादी –Gharkul Yadi :
घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचा हप्त्याचा तपशील:
घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचा हप्त्याचा तपशील पाहण्यासाठी प्रथम पंचायत निहाय PWL यादी पहा आणि त्यामधील नोंदणी नंबर घेऊन हप्त्याचा तपशील या पर्यायामध्ये नोंदणी नंबर टाकून हप्त्याचा तपशील पहा.
घरकुल योजनेतील लाभार्थी FTO ट्रॅकिंग:
घरकुल योजनेतील लाभार्थी FTO ट्रॅकिंग करणे म्हणजेच निधी हस्तांतरण ऑर्डर (Fund Transfer Order) चेक करणे होय, ते पाहण्यासाठी हप्त्याचा तपशील मधील FTO नंबर घेऊन या FTO ट्रॅकिंग पर्यायामध्ये निधी हस्तांतरण ऑर्डर (Fund Transfer Order) चेक करा.
अशा प्रकारे नागरिक तपशील आणि एककेंद्राभिमुखता तपशील घरकुल योजनेतील लाभार्थी यादी (Gharkul Yadi) मधील नोंदणी नंबर टाकून आपण या ऍप मध्ये पाहू शकतो.
हेही वाचा – ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची घरकुल यादी ऑनलाईन पोर्टलवर कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
प्रधानमंत्री आवास योजने मध्ये नवीन फॉर्म भरता येतो का?नवीन अर्ज स्वीकारणे चालू आहे का?
PMRDA अंतर्गत घरकुल अर्ज चालू आहेत का?