PoCRA Yojana : पोकरा योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम होणार पूर्ण !
राज्यात राबविण्यात आलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा – PoCRA Yojana) पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पोकरा – PoCRA प्रकल्पाच्या विविध टप्प्यांवरील कामांना अंतिम स्वरूप देण्यात येत असून, या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम ३० जून रोजी संपत आहे. प्रकल्पातील कंत्राटी मनुष्यबळाच्या सेवाही संपुष्टात येणार आहेत.
PoCRA Yojana : पोकरा योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम होणार पूर्ण !
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा – PoCRA Yojana) जागतिक बँकेच्या आर्थिक सहाय्याने विदर्भ-मराठवाड्यातील 16 जिल्ह्यांमध्ये कृषी व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला.
POCRA 2.0 – पोकरा-२ची अंमलबजावणी:
सुरुवातीला सहा वर्षांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा – PoCRA Yojana) प्रकल्प जाहीर करण्यात आला होता. आता पोकर 0.2 नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्प दुसऱ्या टप्प्यात राबविण्यात येणार आहे.
प्रकल्प संचालक परिमल सिंग यांनी गेल्या आठवड्यात जारी केलेल्या पत्रानुसार, ग्राम कृषी संजीवनी समिती, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या स्तरावर कार्यालयीन अभिलेख अद्ययावत व हस्तांतरण, जड संकलन रजिस्टर अद्ययावत व हस्तांतरण, प्रकल्पातील सर्व संगणकावरील माहितीचा बॅकअप घेणे, प्रकल्पांतर्गत सर्व प्रलंबित पत्रांवर प्रक्रिया करणे, ग्राम कृषी संजीवनी समितीचे बँक खाते बंद करणे, लेखापरीक्षण करणे, लेखापरीक्षणात उपस्थित झालेल्या मुद्यांचा ठराव अहवाल संबंधित लेखापरीक्षकांना सादर करणे आदी सूचना , इ.
या प्रकल्पात कंत्राटी स्वरूपात नेमलेले मनुष्यबळ ३० जून २०२४ पर्यंत कार्यालयात उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर त्या सर्वांच्या सेवा समाप्त होत आहेत. याबाबत कार्यवाही करून त्याचा प्राथमिक अहवालही परिमल सिंह यांनी १५ मेपर्यंत सादर करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
विविध पोकरा अनुदान योजना:
हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर विपरीत परिणाम दिसून येत असून, भविष्यात देखील सदर परिणामांची व्याप्ती वाढणार असल्याचे राज्याच्या हवामान बदला विषयक कृती आराखडयामध्ये नमूद केले आहे. मराठवाडा व विदर्भातील शेतक-यांना गेल्या काही वर्षांपासून मोठया दुष्काळास सामोरे जावे लागत असून भू-गर्भातील पाणीसाठयावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे. तसेच पूर्णा नदीच्या खो-यातील भू-भाग हा निसर्गतः क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहेत. या प्रतिकूल परिस्थीती मध्ये अल्पभू-धारक शेतक-यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थीतीशी जुळवून घेण्यास शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत पंप संच व पाईप अनुदान, परसातील कुक्कुटपालन, नवीन विहीर, विहीर पुनर्भरण, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन अनुदान, हरितगृह/शेडनेटगृह उभारणी, मधुमक्षिका पालन, गांडूळ खत /नाडेप / सेंद्रिय निविष्ठा उप्तादन युनिट, शेततळे, रुंद वाफा व सरी पेरणी यंत्र (बीबीएफ यंत्र) अनुदान, अशा विविध पोकरा अनुदान योजना राबविण्यात येतात.
नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- संबंधीत शेतक-यांचे आधारकार्ड,
- सातबारा उतारा, व आठ-अ,
- मोबाईल क्र.
- अर्जदार अनुसुचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास सक्षम अधिका-याचे प्रमाणपत्र,
- अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र सादर करावे.
पोकरा योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज – Apply Online for POCRA Yojana:
पोकरा अनुदान (PoCRA Yojana) लाभार्थी यादी:
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प संपर्क :
- नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, ३० A/B आर्केड, वर्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई-४००००५
- संकेतस्थळ : https://mahapocra.gov.in
- ईमेल : mahapocra@gmail.com / pmu@mahapocra.gov.in
- फोन : 022 – 22163351
हेही वाचा – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना – POCRA Yojana
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!