PoCRA Yojana 2.0 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २०२४ ( पोकरा योजना टप्पा -२)
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा मंजुरीचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करावा असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनच्या (PoCRA Yojana 2.0) आढाव्यासाठी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये अंदाजित सहा हजार कोटी किंमतीचा दुसरा टप्पा राबविण्यास शासनाने जून २०२३ मध्ये तत्वतः मान्यता दिलेली आहे. पहिल्या टप्प्यात 5284 गावांचा समावेश होता तर दुसऱ्या टप्प्यात 6,959 गावांचा समावेश असेल. यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २०२४ ( पोकरा योजना टप्पा -२) – PoCRA Yojana 2.0:
या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात (PoCRA Yojana 2.0) शासनाने निश्चित केलेले शेती उत्पादकता वाढविणे, पाण्याचा कार्यक्षम वापर, शेतीमध्ये कर्बग्रहण वाढविणे हे उद्देश साध्य करावेच. शिवाय शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले धान्य प्रक्रिया करून साठवणूक करण्याची यंत्रणा उभी करावी. अल्पभूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी संशोधन व्हावे. तसेच शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणाऱ्या व विद्यापीठांनी विकसित केलेला छोट्या यंत्रांचा वापर होण्यासाठी सुद्धा या प्रकल्पातून प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा यावेळी मंत्री श्री. मुंडे यांनी व्यक्त केली.
या बैठकीस नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंह, कृषी आयुक्त रावसाहेब भागडे, कृषी उपसचिव संतोष कराड यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.
विविध पोकरा अनुदान योजना:
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत पंप संच व पाईप अनुदान, परसातील कुक्कुटपालन, नवीन विहीर, विहीर पुनर्भरण, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन अनुदान, हरितगृह/शेडनेटगृह उभारणी, मधुमक्षिका पालन, गांडूळ खत /नाडेप / सेंद्रिय निविष्ठा उप्तादन युनिट, शेततळे, रुंद वाफा व सरी पेरणी यंत्र (बीबीएफ यंत्र) अनुदान, अशा विविध पोकरा अनुदान योजना राबविण्यात येतात.
नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- संबंधीत शेतक-यांचे आधारकार्ड,
- सातबारा उतारा, व आठ-अ,
- मोबाईल क्र.
- अर्जदार अनुसुचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास सक्षम अधिका-याचे प्रमाणपत्र,
- अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र सादर करावे.
पोकरा योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज – Apply Online for POCRA Yojana:
पोकरा अनुदान (PoCRA Yojana) लाभार्थी यादी:
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत हवामान अनुकूल शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची गावातील पोकरा अनुदान लाभार्थी यादी आता एका क्लिकवर पाहता येणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची माहिती सर्वांसाठी पारदर्शकपणे खुली झाली आहे.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प संपर्क :
अधिक माहीतीसाठी प्रकल्प गावातील संबंधीत कृषि सहाय्यक किंवा समुह सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र कृषि विभागाने केले आहे.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, ३० A/B आर्केड, वर्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई-४००००५
संकेतस्थळ : https://mahapocra.gov.in ईमेल : mahapocra@gmail.com / pmu@mahapocra.gov.in
फोन : 022 – 22163351
हेही वाचा – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना – POCRA Yojana
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
Jalan