पोकरा योजनेअंतर्गत अर्ज सुरु २०२४ – POCRA Scheme
कृषि विभाग महाराष्ट्र शासन व जागतिक बँक सहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील हवामान बदलामुळे उदभवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतक-यांना सक्षम करणे, शेतक-यांना शेती पुरक व्यवसाय करण्यास सहाय्य करणे या उद्देशाने जिल्ह्यातील 282 गावांमध्ये सन 2018-19 पासून प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु आहे.
पोकरा योजनेअंतर्गत अर्ज सुरु २०२४ – POCRA Yojana:
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, बांबू लागवड, वृक्ष लागवड या घटकाची लागवडीसाठी अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत राहील. तदनंतर प्रकल्पांतर्गत या घटकाखाली अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.
सप्टेंबर अखेरपर्यंत एकूण प्राप्त अर्जावर निकषानुसार पुर्वसंमती मिळाल्यानंतर पात्र अर्जदारांनी प्रत्यक्ष लागवड नोव्हेंबर अखेरपर्यंत पुर्ण करणे आवश्यक आहे व सदर विषयी संबंधीत शेतक-याने हमीपत्र लिहुन देणे गरजेचे आहे.
प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, बांबू लागवड व वृक्ष लागवड या घटकांचा लाभ घेण्याकरिता प्रकल्प गावातील इच्छूक असलेले शेतकरी बांधवांनी प्रकल्पाने उपलब्ध करुन दिलेल्या संकेतस्थळावर (http://dbt.mahapocra.gov.in) नोंदणी करावी.
नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- संबंधीत शेतक-यांचे आधारकार्ड,
- सातबारा उतारा, व आठ-अ,
- मोबाईल क्र.
- अर्जदार अनुसुचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास सक्षम अधिका-याचे प्रमाणपत्र,
- अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र सादर करावे.
एकदा नोंदणी केल्यानंतर प्रकल्पातील समाविष्ठ फळबाग लागवड, बांबू लागवड व वृक्ष लागवड बाबीकरीता स्वतंत्र अर्ज करावा.
अधिक माहीतीसाठी प्रकल्प गावातील संबंधीत कृषि सहाय्यक किंवा समुह सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र कृषि विभागाने केले आहे.
हेही वाचा – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना – POCRA Yojana
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!