वृत्त विशेषकृषी योजनासरकारी योजना

प्रधानमंत्री किसान योजने संदर्भात तक्रार कशी आणि कुठे करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक तीन महिन्याने हप्त्याची २,०००/ रुपयांची रक्कम अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्यात येते. मात्र, एखाद्या शेतकऱ्याला या योजनेंतर्गत पैसे मिळाले नसतील, तर काळजीची काहीही गरज नाही.

सरकारच्या मार्फत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्या देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. मात्र, एखाद्या शेतकऱ्याला या योजनेंतर्गत पैसे मिळाले नसतील, तर काळजीची काहीही गरज नाही. कारण, आता तुम्ही याची तक्रार (PM Kisan Yojana Grievance) केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे करू शकता.

प्रधानमंत्री किसान योजने संदर्भात शेतकऱ्यांच्या खालील विविध तक्रारी:
  • प्रधानमंत्री किसान योजनेची नोंदणी केली तरी सुद्धा पैसे मिळाले नाहीत.
  • एकाच गावातील काही शेतकऱ्यांच्या प्रधानमंत्री किसान योजनेच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नाही.
  • काही लोकांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान योजनेचा पहिला हप्ता जमा झाला आहे मात्र दुसरा हप्ता नाही.

प्रधानमंत्री किसान योजने संदर्भात ऑनलाईन तक्रार करण्याची प्रोसेस – PM Kisan Yojana Grievance:

प्रधानमंत्री किसान योजने संदर्भातील कोणत्याही तक्रारीसाठी सर्वात आधी आपल्याला आपल्या क्षेत्रातील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना त्याबद्दल माहिती द्यावी लागेल. जर हे लोक आपलं म्हणणं ऐकत नसतील, तर आपण त्यासंबंधित खालील हेल्पलाइनवर कॉल करा किंवा ऑनलाईन Help-Desk पोर्टलवर तक्रार करू शकता.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या विविध तक्रारींसाठी खालील PM Kisan च्या Help-Desk पोर्टल ओपन करा.

https://pmkisan.gov.in/Grievance.aspx

आता एक “Query Form” ओपन होईल त्यामध्ये तक्रार नोंदविण्यासाठी “Register Query” निवडून खाली लाभार्थ्यांचा नोंदणी क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक, कॅप्चा कोड टाकून “Get OTP” वर क्लीक करा.

pmkisan Query Form
pmkisan Query Form

पुढे Query Form मध्ये लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती दाखवली जाईल. खालील विविध तक्रार प्रकार निवडून तक्रारीचे वर्णन करा आणि कॅप्चा कोड टाकून सबमिट करा.

तक्रार प्रकार
  • खाते क्रमांक बरोबर नाही.
  • ऑनलाईन अर्ज मंजुरीसाठी प्रलंबित आहेत.
  • हप्ता मिळाला नाही.
  • बँक व्यवहार अयशस्वी(Bank Transaction Failed)
  • आधार दुरुस्तीमध्ये समस्या, इत्यादी.
हेल्प डेस्क – PM Kisan Yojana Grievance Help Desk:

तुम्ही सोमवार ते शुक्रवारच्या मध्ये पीएम किसान हेल्प डेस्कच्या PM KISAN Help Desk ई मेल (Email) pmkisan ict@gov.in वर संपर्क करू शकता. इथेही काहीच प्रतिसाद न मिळाल्यास आपण 011 23381092 (Direct HelpLine) या हेल्पलाइन नंबरवरही संपर्क करू शकता.

पुढील लेख देखील वाचा!

  1. PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची OTP आधारित eKYC प्रोसेस घरबसल्या कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती (PMKisan OTP Based eKYC)
  2. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
  3. PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची OTP आधारित eKYC प्रोसेस घरबसल्या कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती!
  4. PMKisan अंतर्गत लाभार्थ्यांच्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा!
  5. पीएम किसान योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रोसेस !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

4 thoughts on “प्रधानमंत्री किसान योजने संदर्भात तक्रार कशी आणि कुठे करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती

  • shankar mane

    name not seen pm kisan yojana website apply to name correcation

    Reply
  • UKANDRAO JANU RATHOD

    Capcha code not accepted

    Reply
  • Vikas shamrao Patil

    मी फॉर्म भरून 4 वर्ष पूर्ण झाले आहे पण मला अजून एक हि हप्ता जमा झाले नाही

    Reply
    • प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 14व्या हप्त्याचे नुकतेच मा.प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यामध्ये राज्यातील पात्र 97 लाख शेतकऱ्यांपैकी 12 लाख शेतकरी चौदाव्या हप्त्यापासून वंचित राहिले आहेत. प्रामुख्याने भूमिअभिलेख नोंद अद्ययावत नसणे, ई-केवायसी केलेले नसणे, बँक खाते आधारशी संलग्न नसणे या काही अटींची पूर्तता न केल्याने हे 12 लाख शेतकरी वंचित राहिले आहेत.

      या सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा तसेच राज्य शासनाच्या नमो किसान सन्मान योजनेचा लाभ मिळावा यासाठी वरील तीनही अटींची पूर्तता करण्यासाठी तालुका स्तरावर तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व भूमिअभिलेख अधिकारी यांची संनियंत्रण समिती करण्यात आली आहे. त्यांच्या देखरेखीखाली गाव पातळीवर कृषी सेवक, तलाठी व ग्रामसेवक या अटींची पूर्तता प्रत्यक्ष लाभार्थींकडून करून घेतील, ही विशेष मोहीम 15 ऑगस्ट पर्यंत राबविण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांच्या वरील अटींची पूर्तता करण्याचे बाकी राहिले आहे त्यांनी संबंधित समितीशी संपर्क करून आपले भूमिअभिलेख अद्ययावत करणे, ई-केवायसी करणे, बँक खात्याशी आधार संलग्न करणे आदी अटींची पूर्तता करून आपले नाव निश्चित करून घ्यावे.

      🛑 PM Kisan Beneficiary Status : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स चेक करा
      👉 http://msdhulap.com/pm-kisan-sanman-nidhi-yojana-2000-installment-status/

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.