आपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी मंत्रालयकृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

PM किसान व नमो शेतकरी योजनांच्या लाभा पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी!

PM किसाननमो शेतकरी (PM Kisan Namo Shetkari Yojana) योजनांच्या लाभा पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यामध्ये दि. ०१.०२.२०१९ पासून राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाना रु. २०००/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात रु. ६०००/- प्रति वर्षी लाभ देण्यात येतो. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देण्यात येणा-या प्रति वर्ष, प्रति शेतकरी रु. ६०००/- या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रु. ६०००/- इतक्या निधीची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना राबविण्यासाठी शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. तसेच, पी.एम. किसान योजनेची सुरळीतपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रस्तुत योजनेच्या कार्यपध्दतीमध्ये सुधारणा करण्यास्तव शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

PM किसान व नमो शेतकरी योजनांच्या लाभापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी! PM Kisan Namo Shetkari Yojana:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत उत्तरप्रदेश या राज्यानंतर नोंदणीकृत लाभार्थ्यांची सर्वाधिक संख्या असलेले महाराष्ट्र राज्य हे देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे केंद्र शासनास प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Namo Shetkari Yojana) योजनेची महाराष्ट्र राज्यात प्रभावी अंमलबजावणी होणे अभिप्रेत आहे.

योजनांची प्रभावी अंमलबजावणी:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Namo Shetkari Yojana) योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो. तथापि, किमान मनुष्यबळाच्या अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याने, ४११ मनुष्यबळ वाढवून PM किसान व नमो शेतकरी (PM Kisan Namo Shetkari Yojana) योजनांच्या लाभा पासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना; या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल व पात्र लाभार्थ्याला लाभ मिळवून दिला जाईल.

  1. स्वयंनोंदणीकृत लाभार्थीना मान्यता प्रदान करणे,
  2. पोर्टलवरील विविध दुरुस्त्या अभावी लाभापासून वंचित लाभार्थी ई-केवायसी प्रमाणिकरण,
  3. बँक खाती आधार संलग्न करणे व भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत करणे,
  4. लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे,
  5. चुकीने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे,
  6. मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंद घेणे,
  7. मयत लाभार्थ्यांच्या वारसाची नव्याने नोंदणी करणे,

स्वयंनोंदणीकृत लाभार्थ्यांना तपासणीअंती मान्यता प्रदान करणे/नाकारणे याबाबी प्रलंबित असल्याने, केंद्र शासनाकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. PM किसान व नमो शेतकरी (PM Kisan Namo Shetkari Yojana) योजनांच्या कामाची व्याप्ती व प्राथमिकता पाहता, तसेच, क्षेत्रिय स्तरावर मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेले पदे विचारात घेता, योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या ४११ मनुष्यबळाच्या सेवा बाह्ययंत्रणद्वारे उपलब्ध करुन घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्याची विनंती पत्रान्वये संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांनी केली होती.

सदर विनंतीस अनुसरुन सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास, मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग व प्रधान सचिव (व्यय), वित्त विभाग यांच्या उपसमितीच्या दि. १०.१०.२०२४ रोजी पार पडलेल्या बैठकीत मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी (PM Kisan Namo Shetkari Yojana) महासन्मान निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या ४११ मनुष्यबळाच्या सेवा, बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

४११ मनुष्यबळाच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो (PM Kisan Namo Shetkari Yojana) शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या खालीलप्रमाणे ४११ मनुष्यबळाच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.

अ. क्र.नियुक्ती करण्यात येणा-या कार्यालयाचे नावपदनामआवश्यक पदसंख्या
अवर सचिव, (कक्ष ११ ) कृषि व पदुम विभाग, मंत्रालय मुंबईकार्यालयीन सहाय्यक
संगणक चालक
एन.आय.सी. मुंबईतंत्र सहाय्यक
पी.एम. किसान राज्यस्तरीय अंमलबजावणी कक्ष कृषि आयुक्तालय पुणेसॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनिअर
तंत्र सहाय्यक
कार्यालयीन सहाय्यक
संगणक चालक
शिपाई
जिल्हा नोडल अधिकारी, पी.एम. किसान तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय सर्व (मुंबई व मुंबई शहर वगळून)संगणक चालक३४
तालुका नोडल अधिकारी पी. एम. किसानतथा तालुका कृषि अधिकारी कार्यालय सर्व (मुंबई व मुंबई शहर मधील तालुके वगळून)संगणक चालक३५५
एकूण४११
अटी:

सदर बाह्य यंत्रणेमार्फत घ्यावयाच्या पदांस खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे:-

१. PM किसान व नमो शेतकरी (PM Kisan Namo Shetkari Yojana) योजनांच्या अंमलबजावणीसाठी बाह्य यंत्रणेमार्फत भरावयाच्या प्रस्तावित एकूण ४११ मनुष्यबळासाठी आवश्यक खर्च प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून प्रशासकीय खर्चासाठी प्राप्त होणा-या निधीमधून प्राथम्याने खर्च करण्यात येईल. तसेच, सदर योजनेंतर्गत निधी कमी पडल्यास नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत प्रशासकीय खर्चासह बाह्यस्थ संस्थेद्वारे घ्यावयाच्या मनुष्यबळासाठी उपलब्ध होणा-या वार्षिक तरतुदीच्या १ टक्के इतक्या निधीतून भागविण्यात येईल.

२. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत चालू वर्षी अंदाजे रु. ७.५० कोटी निधी प्रशासकीय खर्चासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसेच, नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत चालू निधी मूळ तरतूद रु. ६०६० कोटी असून प्रशासकीय खर्चासाठी १ टक्केप्रमाणे रु. ६०.६० कोटी निधी उपलब्ध होईल. सदर प्रशासकीय खर्चासाठी उपलब्ध तरतूदीतून उपरोक्त मनुष्यबळावरील चालू वर्षाचा खर्च भागविण्यात येईल.

३. या प्रस्तावाने मान्यता देण्यात येणा-या मनुष्यबळामार्फत कृषि विभागाच्या इतर योजनांचे काम देखील करुन घेण्यात यावे, जेणेकरुन ते पूर्ण वेळ कार्यरत राहतील.

४. बाह्ययंत्रणेमार्फत घ्यावयाच्या संगणक चालकांचे मानधन NIC येथे कार्यरत संगणक चालकांना दिलेल्या मानधनापेक्षा जास्त असणार नाही.

बाह्य यंत्रणेमार्फत सेवा घेताना वित्त विभागाच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची दक्षता आयुक्त (कृषि) यांनी घ्यावी. सदर मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेमार्फत संबंधीत विभागीय कृषी सहसंचालक यांच्या स्तरावरुन घेण्यात याव्यात. तसेच, राज्य स्तरावर नियुक्त करावयाच्या मनुष्यबळाबाबत कार्यवाही कृषि सहसंचालक, ठाणे व कृषी आयुक्तालय स्तरासाठी आवश्यक मनुष्यबळाबाबत कार्यवाही कृषि सहसंचालक, पुणे यांच्या स्तरावरुन करण्यात यावी. सदर पदे ही केवळ योजनांच्या कालावधीकरीता निर्माण करण्यात येत असून, योजना कालावधी नंतर सदर सर्व पदे आपोआप निरसित होतील.

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग शासन निर्णय:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या 411 मनुष्यबळाच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यास मान्यता देणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पुढील लेख देखील वाचा!

  1. PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची OTP आधारित eKYC प्रोसेस घरबसल्या कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती (PMKisan OTP Based eKYC)
  2. पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांची बायोमेट्रिक eKYC CSC सेंटर मधून करण्याची प्रोसेस !
  3. प्रधानमंत्री किसान योजने संदर्भात तक्रार कशी आणि कुठे करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
  4. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
  5. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
  6. पीएम किसान योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रोसेस !
  7. PM-Kisan अंतर्गत लाभार्थ्यांच्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा!
  8. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
  9. योजनांच्या लाभासाठी बँक खाते आधार नंबरला ऑनलाईन/ऑफलाईन लिंक करण्याची सविस्तर प्रोसेस !
  10. ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.