कृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे ५ ऑक्टोबरला वितरण !

पीएम किसान सन्मान निधी योजनानमो शेतकरी महासन्मान निधी (PM Kisan Namo Shetkari Installment) या योजनांचे माहे ऑगस्ट 2024 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीतील अनुक्रमे 18 वा व पाचवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार 05 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 10.00 वा. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी (ता.मानोरा) येथील निधी वितरण समारंभात करण्यात येणार आहे.

या समारंभास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यवतमाळ -वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे ५ ऑक्टोबरला वितरण ! PM Kisan Namo Shetkari Installment:

शेतक-यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी, 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रू. 6000/- त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रीय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहेत. पी. एम. किसान योजने अंतर्गत दिनांक 30 सप्टेंबर, 2024 अखेर राज्यातील जवळपास 1.20 कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यावर एकूण 17 हप्त्यांमध्ये सुमारे रू. 32000 कोटीचा लाभ जमा झालेला आहे.

पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात सन 2023-24 पासून नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यापासून पुढील प्रत्येक हप्ता वितरणावेळी लाभ देण्यात आलेल्या राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ अदा करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाने 2023-24 व 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण चार हप्त्यांमध्ये एकूण 91.45 लाख शेतकरी कुटुंबाना रक्कम रु. 6949.68 कोटी लाभ अदा करण्यात आला आहे. जून 2023 पासून आयोजित गावपातळीवरील विशेष मोहिमांद्वारे पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पूर्तता झाल्याने देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांची संख्या आज रोजी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरली आहे.

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याच्या लाभ वितरणावेळी राज्यातील भूमि अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या, बॅंक खाती आधार संलग्न केलेल्या व ईकेवायसी पूर्ण केलेल्या एकूण 91.52 लाख शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात रू. 1900 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ तर राज्याच्या योजनेमधून रू. 2000 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे.

या समारंभामध्ये पी. एम. किसान योजने अंतर्गत रू. 2000/ तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत रू. 2000/ असा एकूण 4000 रुपये चा लाभ प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते राज्यातील सुमारे 91.52 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात थेट जमा होईल.

पी. एम. किसान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या लाभ वितरण समारंभात https://pmindiawebcast.nic.in  या लिंकआधारे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी  सहभागी व्हावे, असे आवाहन कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.

पुढील लेख देखील वाचा!

  1. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
  2. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
  3. PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची OTP आधारित eKYC प्रोसेस घरबसल्या कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती!
  4. प्रधानमंत्री किसान योजने संदर्भात तक्रार कशी आणि कुठे करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
  5. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
  6. PMKisan अंतर्गत लाभार्थ्यांच्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा!
  7. पीएम किसान योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रोसेस !
  8. बँक खाते आधार नंबरला ऑनलाईन/ऑफलाईन लिंक करण्याची सविस्तर प्रोसेस !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.