आपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनावृत्त विशेषसरकारी कामेसरकारी योजना

पीएम किसान योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रोसेस !

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ((PM Kisan Mobile Number Update)) योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये ) रु. २०००/- प्रती हप्ता या प्रमाणे ३ हप्त्यात रू. ६०००/- प्रती वर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट (DBT द्वारे) जमा करण्यात येतात.

बऱ्याच जणांचे मोबाईल नंबर हे बंद झालेत किंवा नवीन नंबर घेतले आहे, त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे मॅसेज येत नाहीत किंवा योजने संदर्भात माहिती मिळत नाहीत ते आता खालील प्रोसेस नुसार पीएम किसान योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर (PM Kisan Mobile Number Update) अपडेट करू शकणार आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल – PM Kisan Yojana:

पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 2000/- रुपये तीन समान मासिक हप्त्यांमध्ये म्हणजे एकूण 6000/-रूपये इतका निधी दिला जातो. हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जातो.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादी मध्ये आपले नाव पहायचे असेल तर, पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे स्टेट्स, e-KYC इ. आपल्यासाठी सरकारने आता ह्या सुविधा ऑनलाईन प्रदान केल्या आहेत. त्याच प्रमाणे पीएम किसान योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची सुविधा देखील ऑनलाईन केली आहे.

पीएम किसान योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रोसेस – PM Kisan Mobile Number Update:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर (PM Kisan Mobile Number Update) अपडेट करण्यासाठी सर्वप्रथम खालील केंद्र सरकारच्या PM Kisan या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

https://pmkisan.gov.in

PM Kisan या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर, खाली Farmers Corner च्या बॉक्स मध्ये Update Mobile Number या पर्यायावर क्लिक करा.

PM Kisan Update Mobile Number
PM Kisan Mobile Number Update

इथे तुम्हाला तुमचा Registration No मध्ये नोंदणी क्रमांक किंवा Aadhaar No. मध्ये आधार कार्ड नंबर टाका व कॅप्चा कोड टाकून सर्च पर्यायावर क्लिक करायचे आहे.

Update Mobile Number
PM Kisan Mobile Number Update

सर्च पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढे Get Aadhar OTP वर क्लिक करून आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर OTP येईल तो OTP टाकून पुढे संमतीसाठी Consent वर क्लिक करा व Verify OTP वर क्लिक करा.

पुढे PM Kisan च्या लाभार्थ्यांची माहिती दाखवली जाईल व खालील Enter New Mobile No. मध्ये तुमचा नवीन मोबाईल नंबर टाकायचा आहे व Get OTP वर क्लिक करा व नवीन मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकून Verify OTP वर क्लिक करा.

पुढे Click for Update Mobile Number वर क्लिक करा.

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर (PM Kisan Mobile Number Update) अपडेट करू शकता, तसेच पीएम किसान पोर्टलवरील e-KYC करताना लाभार्थ्यास त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या मोबाईलवर येणाऱ्या OTP आधारे स्वत:चे -KYC पडताळणी करता येईल. यासाठी कोणतीही फी आकारणी केली जाणार नाही. तसेच सामाईक सुविधा केंद्र (CSC) मध्ये जाऊन लाभाची Biometric पद्धतीद्वारे e-KYC पडताळणी करून घेऊ शकतात. यासाठी सामाईक सुविधा केंद्राकडून रक्कम रू. १५/- प्रती लाभार्थी फी आकारणी करण्यात येईल.

PM Kisan योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2024

 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात ‘अशी’ करा तक्रार:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात म्हणजेच पीएम किसान योजनेच्या हप्त्याचे स्टेट्स, e-KYC, योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर (PM Kisan Mobile Number Update) किंवा लाभार्थ्यांच्या यादी मध्ये नाव इ. संदर्भात तक्रार करण्यासाठी सर्वात आधी आपल्या क्षेत्रातील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना त्याबद्दल माहिती द्यावी लागेल. जर हे लोक आपलं म्हणणं ऐकत नसतील, तर आपण त्यासंबंधित हेल्पलाइनवर देखील कॉल करू शकता.

तुम्ही सोमवार ते शुक्रवारच्या मध्ये पीएम किसान हेल्प डेस्कच्या PM KISAN Help Desk ई मेल (Email) pmkisan ict@gov.in वर संपर्क करू शकता.

इथेही काहीच प्रतिसाद न मिळाल्यास आपण 011 23381092 (Direct HelpLine) या हेल्पलाइन नंबरवरही संपर्क करू शकता. तुमच्या खात्यात 2 हजार जमा झाले नसतील तर ऑनलाईन तक्रार करण्यासाठी (Grievance PM Kisan) इथे क्लिक करा.

हेही वाचा – PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची OTP आधारित eKYC प्रोसेस घरबसल्या कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती (PMKisan OTP Based eKYC)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.