प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी CSC लॉगिन मधून ऑनलाईन शेतकरी नोंदणी कशी करायची? – PM-KISAN Farmer Registration
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan) मध्ये शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचे ३ हप्ते मिळतात. या PM-Kisan योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास नोंदणी करणं आवश्यक आहे, ही नोंदणी आता पुन्हा सुरु झाली आहे. आपण या लेखा मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी CSC लॉगिन मधून ऑनलाईन नोंदणी कशी करायची? हे सविस्तर जाणून घेणार आहोत.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी नाव नोंदवायचं असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना 3 पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
- CSC म्हणजेच कॉमन सव्हिस सेंटर मध्येही शेतकरी नावाची नोंदणी करू शकतो. मात्र इथं नोंदणी करायची असल्यास त्यासाठी ठरावीक शुल्क आकारलं जातं.
- शेतकरी स्वत: PM-Kisan पोर्टलवर जाऊन नाव नोंदणी करू शकतात.
- या योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी शेतकरी आपली कागदपत्रं गावातील तलाठी/तहसील कार्यालयात जमा करू शकतो.
PM-KISAN Farmer Registration : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी CSC लॉगिन मधून ऑनलाईन नोंदणी करण्याची प्रोसेस:
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी CSC लॉगिन मधून ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी खालील अधिकृत PM-Kisan च्या CSC लॉगिनच्या लिंकवर क्लिक करून पोर्टल मध्ये लॉगिन करा किंवा जर तुम्ही अगोदरच CSC लॉगिन केलेले असाल तर थेट PM-Kisan CSC Dashboard पेज ओपन होईल.
https://exlink.pmkisan.gov.in/RedirecttoCSC.aspx
मी अगोदर पासून CSC लॉगिन मध्ये असल्यामुळे इथे माझे लॉगिन मध्ये थेट PM-Kisan CSC Dashboard पेज ओपन झाले आहे.
CSC Dashboard च्या मुख्य मेनू मध्ये आपण खालील विविध पर्याय पाहू शकता. यामध्ये आपण नवीन शेतकरी नोंदणी करण्यासाठी Farmer Registration वर क्लिक करणार आहोत.
- Correct Aadhaar number (आधार क्रमांक बरोबर करा).
- Farmer Registration (शेतकरी नोंदणी).
- Edit Farmer Detail (शेतकरी तपशील संपादित करा).
- Know the Beneficiary Status (लाभार्थी स्थिती जाणून घ्या).
- Make Payment (पेमेंट करा).
- Status Registered Farmer (स्थिती नोंदणीकृत शेतकरी).
- Report (अहवाल).
शेतकऱ्याचे वैयक्तिक तपशील – Farmer Personal Details:
Farmer Registration वर क्लिक केल्यानंतर इथे सर्व प्रथम शेतकऱ्याचे वैयक्तिक तपशील भरा.
शेतकऱ्याचे वैयक्तिक तपशील मध्ये राज्य, जिल्हा, उप जिल्हा, ब्लॉक, गाव, शेतकऱ्याचे नाव, लिंग, श्रेणी, शेतकरी प्रकार, आधार कार्ड नंबर, बँकेचे नाव, IFSC कोड, खाते क्रमांक, मोबाईल क्र., पत्ता, पिन कोड, वडिलांचे/आईचे/पतीचे नाव, जमीन नोंदणी आयडी (Land Registration ID), शिधापत्रिका क्र., जन्मतारीख, मालकी (जमीन धारण), अनुक्रम क्रमांक सर्वेक्षण/खाते क्रमांक/खसरा क्रमांक, क्षेत्र इ. माहिती भरणे गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे:
वरील शेतकऱ्याचे वैयक्तिक तपशील भरल्यानंतर खालील आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- जमिनीचा सातबारा.
- आधार कार्ड.
- बँक पासबुक.
- रेशन कार्ड
- वारसा हक्काने जमीन मिळाली असल्यास आधीच्या मालकाचा आधार कार्ड क्रमांक, मृत्यु दिनांक.
कागदपत्रे अपलोड केल्यानंतर Self Declaration Form वर क्लिक करून सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म वाचा आणि नंतर त्या बॉक्स मध्ये क्लिक करून Save बटनवर क्लिक करा.
ऑनलाईन नोंदणी अर्ज सेव्ह केल्यानंतर तुमचे रेकॉर्ड सेव्ह होईल आणि तुमचा फार्मर आयडी पाहायला मिळेल. तसेच PM-KISAN च्या पुढील मंजूरीसाठी ही माहिती तालुका, जिल्हा स्तरावरून राज्य सरकारकडे पाठवली जाईल. ही माहिती समाधानकारक असेल, तर योजनेसाठी तुमचा विचार केला जाईल, अन्यथा तुमचा अर्ज नाकारला जाईल. एकदा फॉर्म भरून झाला की काही दिवसांच्या अंतरानं तुम्ही तुमच्या PM-KISAN फॉर्मचं स्टेटस पाहू शकता.
राज्य नोडल अधिकाऱ्यांचे संपर्क तपशील:
- राज्य नोडल ऑफिसरची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- राज्य आणि जिल्हा नोडल संपर्क तपशील पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
पीएम-किसान हेल्प डेस्क क्रमांक: ०११-२४३००६०६,१५५२६१
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!